मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Garlic Benefits : पोट वाढलंय? व्यायामाशिवाय वजन कमी करायचंय? मग अशा पद्धीतीने खा लसूण

Garlic Benefits : पोट वाढलंय? व्यायामाशिवाय वजन कमी करायचंय? मग अशा पद्धीतीने खा लसूण

लसणाच्या साहाय्याने तुम्ही तुमचे वाढलेले वजन कमी करू शकता. लसूण (Garlic For Weight Loss) कमी वेळेत शरीरातील चरबी काढून टाकण्यासाठी उत्तम मानले जाते.

लसणाच्या साहाय्याने तुम्ही तुमचे वाढलेले वजन कमी करू शकता. लसूण (Garlic For Weight Loss) कमी वेळेत शरीरातील चरबी काढून टाकण्यासाठी उत्तम मानले जाते.

लसणाच्या साहाय्याने तुम्ही तुमचे वाढलेले वजन कमी करू शकता. लसूण (Garlic For Weight Loss) कमी वेळेत शरीरातील चरबी काढून टाकण्यासाठी उत्तम मानले जाते.

मुंबई, 25 जून : सध्याचा काळात धावत्या जीवनशैलीमुळे जंक फूड (Junk Food) किंवा फास्ट फूड (Fast Food) आपल्या आहाराचा एक मोठा भाग बनले आहे. काही लोकांसाठी दिवसभराचे जेवण हे फास्ट फूड असते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. अशा स्थितीत पोटाची चरबी वाढणे स्वाभाविक आहे. अनियंत्रित आहारामुळे ही चरबी वाढतच जाते. वजन वाढणे (Weight Gain) थांबवणे खूप कठीण आहे. मग काय करायचं? एक पर्याय असा असू शकतो की, तुम्ही तुमच्या आहारात घरगुती अन्नाचादेखील समावेश करा आणि व्यायाम (Weight Loss Exercise) देखील करा. त्याचबरोबर दुसरा पर्याय म्हणजे तुमच्या आहारात वजन कमी करण्याच्या पद्धतींचा समावेश करणे.

असाच एक पर्याय आज आम्ही तुम्हाला सुचवणार आहोत. तो पर्याय अगदी सोपा आणि आपल्याला सहज उपलब्ध होणारा आहे. तो पर्याय म्हणजे लसूण (Garlic Benefits). होय, लसणाच्या साहाय्याने तुम्ही तुमचे वाढलेले वजन कमी करू शकता. लसूण (Garlic For Weight Loss) कमी वेळेत शरीरातील चरबी काढून टाकण्यासाठी उत्तम मानले जाते. लसूण व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन सी, फायबर, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, लोह आणि सोडियमने समृद्ध आहे. हे आरोग्यासाठी चांगले असतात.

वजन का मी करण्यासाठी असा खावा लसूण

- वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या 2-3 पाकळ्या ठेचून त्या पाण्यासोबत घ्याव्या.

- 3-4 चमचे लसणाचा रस 1 चमचे मधात मिसळून प्या. तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. काही दिवसात तुमची चरबी कमी होईल.

- लसणाच्या 3-4 पाकळ्या क्रश करा आणि त्यातून एक चमचा रस काढून प्या. यानेही तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.

बॉडी-माईंड रिलॅक्सेशनसोबत हवे आहे सौंदर्य? तर या 4 ब्युटी टिप्स वापरून पाहा

लसूण खाण्याचे इतर फायदे

- लसणात अजोइनचे प्रमाण जास्त असते, हा पदार्थ रक्ताच्या गुठळ्या होण्यास प्रतिबंध करतो.

- लसूण वजन कमी करण्यासोबतच शारीरिक कमजोरी दूर करण्याचेही काम करते. शरीरात जमा झालेले वाईट कोलेस्टेरॉल काढून टाकण्यासाठीही हे खूप उपयुक्त आहे.

- लसणाच्या पाकळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात आणि त्याचे नियमित सेवन केल्याने केवळ सुरकुत्या तयार होत नाहीत तर ते त्वचा निरोगी ठेवण्यासही मदत करते.

Piles Problem : मूळव्याधीचा त्रास नकोच असेल तर आहाराची आजपासूनच घ्या अशी काळजी

- हृदय तंदुरुस्त ठवण्यासाठी आपल्या आहारात लसणाचा समावेश करावा. यामुळे तुमचे हृदय मजबूत होते.

- लसूण शरीराला डिटॉक्स करण्यासाठीही खूप उपयुक्त आहे. म्हणजेच शरीरातील घाण लसणाच्या सेवनाने बाहेर काढता येते.

- शरीरात वेदना होता असताना लसूण-तेल वापरल्यास यापासून खूप आराम मिळेल.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Superfood, Weight, Weight loss