मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Earth Day 2022: आपण सगळे करू शकतो, पृथ्वीला वाचवू शकतो! या फक्त 5 गोष्टी आजपासून करूया, परिणाम दिसेल

Earth Day 2022: आपण सगळे करू शकतो, पृथ्वीला वाचवू शकतो! या फक्त 5 गोष्टी आजपासून करूया, परिणाम दिसेल

Earth Day 2022 : आपल्याकडे मर्यादित नैसर्गिक साधनसंपत्ती (Natural Resources) असूनही त्याचे अतिशोषण होत आहे आणि ही प्रक्रिया अव्याहतपणे सुरू आहे. निसर्गाच्या सततच्या छेडछाडीचा परिणाम आता ग्लोबल वॉर्मिंग, भूकंप आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या रूपानेही समोर येत आहे.

Earth Day 2022 : आपल्याकडे मर्यादित नैसर्गिक साधनसंपत्ती (Natural Resources) असूनही त्याचे अतिशोषण होत आहे आणि ही प्रक्रिया अव्याहतपणे सुरू आहे. निसर्गाच्या सततच्या छेडछाडीचा परिणाम आता ग्लोबल वॉर्मिंग, भूकंप आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या रूपानेही समोर येत आहे.

Earth Day 2022 : आपल्याकडे मर्यादित नैसर्गिक साधनसंपत्ती (Natural Resources) असूनही त्याचे अतिशोषण होत आहे आणि ही प्रक्रिया अव्याहतपणे सुरू आहे. निसर्गाच्या सततच्या छेडछाडीचा परिणाम आता ग्लोबल वॉर्मिंग, भूकंप आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या रूपानेही समोर येत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 22 एप्रिल : पृथ्वी दिन (Earth Day 2022) दरवर्षी 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश नैसर्गिक संसाधने वाचवणे आणि लोकांमध्ये जागृती करणे हा आहे. आपल्या झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे गेल्या एका शतकात जगाचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. मर्यादित नैसर्गिक साधनसंपत्ती (Natural Resources) असूनही त्याचे अतिशोषण होत आहे आणि ही प्रक्रिया अव्याहतपणे सुरू आहे. निसर्गाच्या सततच्या छेडछाडीचा परिणाम आता ग्लोबल वॉर्मिंग, भूकंप आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या रूपानेही समोर येत आहे. अशा परिस्थितीत आता आपण सर्वांनी मिळून आपल्या सवयींमध्ये काही मोठे बदल करणे आवश्यक आहे. जेणेकरून पृथ्वीचे संरक्षण होईल आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांना हिरवीगार आणि आनंदी पृथ्वी मिळेल.

या सवयी लावूयाच -

1. शाश्वत जीवनशैली (Sustainable lifestyle) – गेल्या एका शतकात जगात झालेली प्रगती गेल्या हजार वर्षात झालेल्या प्रगतीपेक्षा जास्त आहे. आपल्या या प्रगतीमुळे आपले भौतिक जीवन सुकर झाले आहे, पण प्रगतीच्या या झगमगाटात आपण निसर्गावर होणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष केलं आहे. याचा फटका आता आपल्यालाच सहन करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत आता पृथ्वीला वाचवण्याची वेळ आली आहे. यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचे अतिशोषण करण्याऐवजी वस्तूंचा पुनर्वापर आणि अपसायकलिंगचा अवलंब करण्याची वेळ आली आहे. यासोबतच आपल्या स्वत:पासून होणारा कचरा कमी करणे, सेंद्रिय पदार्थाकडे वळणे, जीवनशैलीत पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करणे आवश्यक झाले आहे.

2. जलसंधारण - अलीकडच्या काळात जगात स्वच्छ पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पृथ्वीवरील तिसरे महायुद्ध पाण्यामुळेच होईल, असे अनेकांचे मत आहे. यावरून पाण्याचे महत्त्व समजू शकते. अशा परिस्थितीत आता पाणी वाचवण्यासाठी प्रत्येकाने जागरूक होण्याची वेळ आली आहे. पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी आपल्या छोट्या-छोट्या सवयी बदला. नळ व्यवस्थित बंद करा. विनाकारण पाण्याचा अपव्यय करू नका. पाणी व्यवस्थित वापरा.

3. हरित ऊर्जा - आता आपल्याला ऊर्जा उत्पादनाच्या पारंपरिक साधनांपासून दूर हरित ऊर्जेकडे जाण्याची गरज आहे. पारंपारिक साधनांमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढते. आपला देश जगातील तिसऱ्या क्रमांकाचा वीज ग्राहक आहे. यासाठी आपण कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायूंवर अवलंबून आहोत. यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होतं. ज्याचा आपल्याच मुलांवर घातक परिणाम होत आहे. आपण जितकी वीज वाया घालवू तितकी निसर्गाची हानी होईल. अशा परिस्थितीत हरित ऊर्जेकडे वेगाने वाटचाल करायची असेल, तर वीज वाया घालवण्याच्या सवयीत बदल घडवून आणण्याची गरज आहे. शक्य असेल त्यांनी सौर उर्जा वापरावी.

हे वाचा - कोणत्या वयात लोक असतात सर्वांत आनंदी? रिसर्चमधून समोर आलं उत्तर

4. वायू प्रदूषण – वायू प्रदूषणाच्या बाबतीतही आपण पुढे आहोत. देशाच्या राजधानीसह अनेक मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषणाचे प्रमाण खूपच जास्त आहे. त्यामुळे मोकळ्या हवेत श्वासही घेता येत नाही. त्याचा थेट परिणाम आपल्या पर्यावरणावरही होत आहे. अशा परिस्थितीत आपण खासगी वाहनांचा कमीत-कमी वापर करणे गरजेचे आहे. सार्वजनिक वाहतुकीवर लक्ष केंद्रित करा आणि गरज असेल तेव्हाच खासगी वाहने वापरा. सायकलचा वापर जवळच्या ठिकाणांसाठी करा, त्यामुळे आरोग्यही चांगले राहील.

हे वाचा - यासाठी उन्हाळ्यात रात्रीसुद्धा अंघोळ करा; कित्येक प्रॉब्लेम्स होण्यापूर्वीच टाळा

5. कचरा व्यवस्थापन - आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळं पृथ्वीवरील एकही जागा राहिलेली नाही जिथे मानवनिर्मित कचरा पोहोचलेला नाही. जमिनीबरोबरच समुद्रही कचऱ्याचे डंपिंग केंद्र बनत आहेत, ज्यामुळे संपूर्ण सागरी परिसंस्था बिघडत आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्याकडून निर्माण होणारा कचरा कसा कमी होईल आणि पुनर्वापर करता येईल अशा गोष्टींचा वापर करणे आवश्यक आहे. यासोबतच वायू प्रदूषण, जलप्रदूषण रोखणे, ओला व सुका कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे, आपली स्वत:ची जबाबदारी आहे.

First published:

Tags: Air pollution, Earth