Home /News /lifestyle /

Hair Care : केसांच्या प्रकारानुसार वापरा वेगवगेळे शॅम्पू, केस होतील सुंदर आणि मजबूत

Hair Care : केसांच्या प्रकारानुसार वापरा वेगवगेळे शॅम्पू, केस होतील सुंदर आणि मजबूत

आपली त्वचा जशी व्यक्तीपरत्वे वेगळी असते, त्याचप्रमाणे केसांचेही प्रकार, पोत आणि जाडी वेगवेगळी असते. काहींचे केस तेलकट असतात तर काहींचे टाळू पूर्णपणे कोरडे झालेले असतात.

    मुंबई, 4 जुलै : काहीवेळा आपले केस छान शॅम्पूने (Shampoo) धुणे हे आपल्यासाठी खूप गरजेचे होते. कारण खूप थकवलेले असल्यावर केस धुतल्याने आपला थकवा नाहीसा होतो. शॅम्पू केसांना स्वच करतो त्याबरोबरच सुगंधही देतो. त्यामुळे ते निरोगी आणि उत्कृष्ट दिसतात. परंतु, केवळ सुगंध चांगला आहे म्हणून तो केसांसाठी तो शॅम्पू फायदेशीर असतो असे नाही. आपली त्वचा जशी व्यक्तीपरत्वे वेगळी असते, त्याचप्रमाणे केसांचेही प्रकार, पोत आणि जाडी वेगवेगळी असते. काहींचे केस तेलकट असतात तर काहींचे टाळू पूर्णपणे कोरडे झालेले असतात. बर्‍याच जणांच्या केसांना फाटेही फुटलेले असतात आणि काहींचे केस खूपच नाजूक असतात. यामुळे प्रत्येकाने त्यांच्या केसांच्या प्रकारानुसार (Right Shampoo For Hair Type) योग्य प्रकारचा शॅम्पू निवडणे महत्वाचे आहे. केसांचे प्रकार आणि त्यांच्यासाठी उत्तम काम करणारे शॅम्पू कोरडे केस (Dry Hair) तुमचे केस जास्त कोरडे आणि निस्तेज असतील. तर तुम्ही मॉइश्चरायझिंग आणि कंडिशनिंग गुणधर्म देणारा शैम्पू निवडण्याची आवश्यकता आहे. आयुर्वेद तज्ज्ञ अर्चना सुकुमारन यांच्या मते, जर एखाद्याचे केस कमकुवत असतील आणि त्याचे टोक फुटलेले असेल म्हणजेच केसांना फाटे फुटलेले असतील. तर वात-प्रकारचे केस मानले जातात. डॉक्टरांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, “तुम्ही केसांना मोठ्या प्रमाणात व्हॉल्युम देणाऱ्या शॅम्पूपासून दूर राहिले पाहिजे. कारण ते तुमच्या केसांचा ओलावा म्हणजेच मॉइश्चरायझेशन आणखी कमी करतात. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोरोना काळात भारतीयांनी खाल्ले 3 लाख टन काजू, मागणीमुळे आता दर वाढणार तेलकट केस (Oily Hair) तुमचे केस धुतल्यानंतरही स्वच्छ वाटत नसतील आणि ते निस्तेज दिसत असतील. तर याचे कारण केवळ प्रदूषणच नाही. तर तुमच्या टाळूवर जे नैसर्गिक तेल जमा होत आहे हे देखील असते. या प्रकारच्या केसांना कफा-प्रकारचे केस म्हणतात आणि अशा व्यक्तींनी त्यांच्या केसांसाठी सिलिकॉन-आधारित शॅम्पू (Silicone-Based Shampoos) टाळले पाहिजेत. शॅम्पूमधील सिलिकॉनमुळे केस अधिक तेलकट आणि निस्तेज दिसतात. Business Idea : 8000 रूपये क्विंटल दर असलेल्या 'या' गव्हाची शेती करा आणि व्हा मालामाल! निस्तेज केस (Dull Hair) धुतल्यानंतरही तुमचे केस स्वच्छ वाटत नसतील आणि ते निस्तेज दिसत असतील. तर व्हॉल्यूमाइजिंग आणि मजबूत करणारे गुणधर्म असलेल्या शॅम्पूचा वापर करावा लागेल. हे तुमच्या केसांमधील घाण काढून टाकण्यास मदत करतील आणि त्यांना अधिक परिपूर्ण आणि निरोगी दिसण्यास मदत करतील. कोंडा काढून टाकण्यासाठी अशा व्यक्तींनी विशिष्ट प्रकारचे शॅम्पू वापरावे. जे विशिष्ट घटकांचा वापर करून फ्लॅकी स्कॅल्पला निरोगी बनवतात.
    Published by:Pooja Jagtap
    First published:

    Tags: Lifestyle

    पुढील बातम्या