Home /News /agriculture /

Business Idea : 8000 रूपये क्विंटल दर असलेल्या 'या' गव्हाची शेती करा आणि व्हा मालामाल!

Business Idea : 8000 रूपये क्विंटल दर असलेल्या 'या' गव्हाची शेती करा आणि व्हा मालामाल!

बाजारात या गव्हाला प्रतिक्विंटल 8,000 रुपयापर्यंत भाव मिळतो. या तुलनेत साधारण गव्हाचे प्रतिक्विंटलचे दर 2,000 रुपयांच्या जवळपास आहेत.

    मुंबई, 2 जुलै : निसर्गाची साथ मिळाली आणि पीक चांगलं आलं तरी त्या पिकाला बाजारात चांगला भाव मिळेलच याची शाश्वती कधी नसते. पण परंपरागत शेती करताना नवे प्रयोग केले तर याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. काळे गहू (Black Wheat) हे त्यापैकी एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. सध्या काळ्या गव्हाच्या शेतीवरून सकारात्मक चर्चा होत आहे. साधारण गव्हापेक्षा काळ्या गव्हाला बाजारात तब्बल चौपट भाव मिळत असल्याने याकडे उत्तम पर्याय म्हणून पाहिलं जाऊ शकतं. काळ्या गव्हाची शेती करण्यासाठी उत्पादन खर्च जास्त आहे. पण याच्या उत्पादनातून नफाही मोठ्या प्रमाणात मिळू शकतो. मीडिया रिपोर्टनुसार, बाजारात काळ्या गव्हाला प्रतिक्विंटल 7,000 ते 8,000 रुपयांचा भाव मिळतो. या तुलनेत साधारण गव्हाचे प्रतिक्विंटलचे दर 2,000 रुपयांच्या जवळपास आहेत.  पेरणी कधी करावी? रब्बी हंगामात काळ्या गव्हाची शेती केली जाते. पेरणीसाठी नोव्हेंबरचा महिना चांगला मानला जातो. काळ्या गव्हाच्या पेरणीसाठी शेतात ओलावा अत्यंत आवश्यक असतो. नोव्हेंबर महिना उलटून गेल्यानंतर काळ्या गव्हाची पेरणी केली गेली तर उत्पादनात घट होण्याची शक्यता अधिक असते. साधारण गहू आणि काळ्या गव्हामध्ये फरक काय? काळ्या गव्हामध्ये अ‍ॅन्थोसायनीन पिंगमेंटचं (Anthocyanin pigment) प्रमाण जास्त असल्याने या गव्हाला काळा रंग येतो. साध्या गव्हात अ‍ॅन्थोसायनीन पिंगमेंटचं प्रमाण 5 ते 15 पीपीएम असतं. हेच प्रमाण काळ्या गव्हात 40 ते 140 पीपीएम असतं. काळ्या गव्हामध्ये अ‍ॅन्थोसायनीन (Natural Anti Oxidant and Antibiotic ) जास्त असतं. हृदयरोग (Heart Attack), कर्करोग (Cancer), मधुमेह (Diabetes), मानसिक विकार, गुडघ्याचे दुखणं, अ‍ॅनिमिया या आजारांवर हे अ‍ॅन्थोसायनीन खूप फायदेशीर ठरतं. काळ्या गव्हाचे फायदे कोणते? काळ्या गव्हामध्ये अनेक पोषक घटक असल्याने शरीराला याचे अनेक फायदे मिळतात. यात लोहाचं (Iron) प्रमाण अधिक असतं. कर्करोग, रक्तदाब, स्थुलत्व, मधुमेह अशा आजारांसाठी काळा गहू वरदान ठरतो. याशिवाय काळ्या गव्हाचा आहारात समावेश केला तर उत्तम दृष्टीसाठीही हे फायदेशीर ठरतं. काळ्या गव्हातून उत्पन्न अधिक साधारण गव्हाच्या तुलनेत काळ्या गव्हाचं उत्पादन अधिक मिळू शकतं. एका अभ्यासानुसार, अर्धा एकर क्षेत्रावर 1000 ते 1200 किलोपर्यंत काळ्या गव्हाचं उत्पादन मिळू शकते. क्विंटलचा दर 8000 गृहित धरला तर जवळपास 9 लाख रुपयांपर्यंत काळ्या गव्हापासून उत्पन्न मिळवता येतं. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोरोना काळात भारतीयांनी खाल्ले 3 लाख टन काजू, मागणीमुळे आता दर वाढणार दरम्यान, शेती करणं म्हणजे एकप्रकारे जुगार खेळल्यासारखं आहे. बहुतांश वेळा उत्पादन खर्च अधिक आणि नफा मात्र काहीच मिळत नाही अशी परिस्थिती शेतकऱ्याची होते त्यामुळेच त्याची जुगाराशी तुलना केली. अशा वेळी शेतीतील नवीन प्रयोगाला चालना मिळणं अत्यंत आवश्यक आहे. काळ्या गव्हाचं उत्पादन घेऊन कमी जागेत जास्तीतजास्त उत्पन्न मिळवण्याची संधी मिळू शकते. शिवाय आरोग्याच्या दृष्टीनेही काळा गहू चांगला असल्याने दुहेरी हेतू साध्य करता येतो.
    First published:

    Tags: Agriculture, Business

    पुढील बातम्या