Home /News /lifestyle /

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोरोना काळात भारतीयांनी खाल्ले 3 लाख टन काजू, मागणीमुळे आता दर वाढणार

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोरोना काळात भारतीयांनी खाल्ले 3 लाख टन काजू, मागणीमुळे आता दर वाढणार

देशात ज्या प्रमाणात काजूची मागणी आणि विक्री वाढली आहे तेवढ्या प्रमाणात काजूचं उत्पादन मात्र वाढलेलं नाही ( No Increase In Cashew Production). त्यामुळे ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आफ्रिकेमधून कच्च्या काजूची आयात (Raw Cashew Import From Africa) केली जाते.

पुढे वाचा ...
मुंबई 02 जुलै : कोविड-19 (Covid-19) च्या महामारीच्या साथीत आपली प्रतिकारशक्ती वाढवणं (Boost Immunity) हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. कोरोनामुळे आरोग्याबद्दल जागरुकताही वाढली आहे. त्यामुळेच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक उपाय जवळपास प्रत्येकजणच करत होता. म्हणूनच ड्रायफ्रूट आणि अन्य आरोग्यादायी उत्पानांचा खप वाढला आहे. महामारीच्या काळानंतर काजूची विक्री जवळपास दीडपटींनी वाढल्याची माहिती आहे. काजूची वाढती मागणी आणि विक्री (Demand For Cashew) लक्षात घेता देशातील स्थानिक उत्पाकदांनीही (Local Producer) स्थानिक बाजारपेठेवरच लक्ष केंद्रीत केलं आहे, अशी माहिती काजू आणि कोकोआ विकास संचालनालयनं दिली आहे, असं मनीकंट्रोलच्या वृत्तात म्हटलं आहे. देशात आता काजूचा वार्षिक खप भरपूर वाढला आहे. आता वर्षभरात आपल्या देशात काजूचा खप जवळपास 3 लाख टनांपर्यंत पोहोचला आहे. कोरोना लाटेच्या आधी हीच विक्री 2 लाख टनांपर्यंत होती. एका वर्षभरातच ब्रँडेड काजूच्या विक्रीतही 30-40 टक्के वाढ झाली आहे. 'फिट' व्हायचंय? व्यायाम करताना 'या' चुका टाळाच, नाहीतर.... देशात ज्या प्रमाणात काजूची मागणी आणि विक्री वाढली आहे तेवढ्या प्रमाणात काजूचं उत्पादन मात्र वाढलेलं नाही ( No Increase In Cashew Production). त्यामुळे ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आफ्रिकेमधून कच्च्या काजूची आयात (Raw Cashew Import From Africa) केली जाते. काजूच्या मागणीपैकी 60 टक्के मागणी फक्त आयातीतूनच पूर्ण होते. 2021-22 मध्ये भारतात 7.5 लाख टन काजूचं उत्पादन झालं होतं. तर याच काळात कच्च्या काजूची आयात 9.39 लाख टन होती. अर्थात, ज्या वेगाने ही मागणी वाढत आहे ती पाहता लवकरच आयात 10 लाख टनाच्याही पलीकडे जाऊ शकते. देशात काजूवरील प्रक्रियेची क्षमताही (Processing Capacity) 18 लाख टनापर्यंत पोहोचली आहे. एक वर्षभरापूर्वी ही क्षमता 15 लाख टन इतकी होती. काजूला जास्त मागणी उद्योगक्षेत्रातून आहे, तर 10-15 टक्के मागणी ही वैयक्तिक वापरासाठीची आहे. सप्टेंबरपासून काजू महागण्याची शक्यता काजुच्या मागणीनुसार आता त्याच्या किंमतीत जास्त वाढ दिसत नाही. पण ऑगस्ट सप्टेंबरपासून देशात विविध सणांचा हंगाम सुरु होतो. त्यादरम्यान या किंमती वाढू शकतात. सध्या 700-850 रुपये प्रतिकिलो विकला जाणारा प्रीमियम काजू सिझनमध्ये 950-1,200 प्रतिकिलो दराने विकला जातो. तर सर्वसाधारण काजूचा भाव सध्या 550- 650 रुपये प्रतिकिलो इतका आहे. आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत काजूच्या दरात वाढ होईल असा उत्पादकांचा अंदाज आहे. भारताच्या काजू निर्यातीत 50 टक्क्यांनी घट कोरोना महामारीनंतर काजूची देशांतर्गत मागणी वाढल्यानं निर्यातीत मात्र घट (Decrease In Cashew Export) झाली आहे. व्हिएतनामसारख्या देशांनी काजूची निर्यात वाढवली आहे, हेही यामागचं एक कारण आहे. आठ वर्षांपूर्वीपर्यंत भारत 1,00,000 टन काजूची निर्यात करत होता. मात्र 2021-22 मध्ये ही निर्यात कमी झाली आणि आता ती 51,908 टन इतकी झाली आहे. याउलट व्हिएतनाममध्ये काजूच्या स्थानिक मागणी आणि विक्रीमध्ये घट झाली आहे आणि तिथली निर्यात वाढली आहे. व्हिएतनाम सध्या जगातील सर्वात मोठा काजू निर्यातदार देश झाला आहे. भारतातून एका वर्षभरात जितक्या काजूची निर्यात होते तितकी निर्यात व्हिएतनाम एका महिन्यातच करतो. डायबेटिज रुग्णांनी असा फणस खायला हवा; ब्लड शुगर कमी करण्यासाठी ठरेल रामबाण भारताच्या काजू निर्यातीत घट होण्यामागची दोन प्रमुख कारणं आहेत, असं निर्यातदारांचं म्हणणं आहे. एक म्हणजे काजूला स्थानिक बाजारपेठेतच मागणी वाढली आहे. त्यामुळे आता त्यांना बाहेर जास्त माल पाठवण्याची गरज नाही. जर आम्ही 20 फुटांचे कंटेनर स्थानिक बाजारपेठेत विकले तर त्यामध्ये साधारणपणे 15 टन काजू असतात. त्यातून आम्हाला 5-8 लाख रुपये जास्त मिळतात, असं निर्यातदारांचं म्हणणं आहे. तर कच्च्या काजूच्या आयातीवर 10 टक्के शुल्क लावल्यामुळे आता ते महाग झाले आहेत. तर निर्यातीवरील इन्सेंटिव्ह 6 टक्के होता तो कमी करून आता 2.15 टक्के इतकाच आहे. अशा परिस्थितीत भारत आता जागतिक बाजारपेठेतील (Global Market) मुख्य स्पर्धक राहिलेला नाही. आपल्या काजूला जागतिक बाजारपेठेत 3.59 डॉलर प्रति पाउंड इतकी किंमत मिळते. तर व्हिएतनामच्या काजूला 2.8 डॉलर प्रति पाउंड किंमत आहे. स्थानिक बाजारपेठेतील वाढत्या मागणीमुळे काजू उत्पादक आणि निर्यातदारांनी तिकडेच लक्ष केंद्रित केले आहे.
First published:

Tags: Coronavirus, Health Tips

पुढील बातम्या