Home /News /lifestyle /

Hair Smoothening Treatment नंतर होतेय केस गळती? अशी घ्या केसांची काळजी

Hair Smoothening Treatment नंतर होतेय केस गळती? अशी घ्या केसांची काळजी

हेअर स्‍मूदनिंग ट्रीटमेंट घेतल्यावर त्याचा परिणाम तुमच्या केसांवर 6 ते 8 महिन्यांपर्यंत दिसतो. अशा परिस्थितीत केसांची अधिक चांगल्या पद्धतीने काळजी घेतली तर दीर्घकाळ तुमचे केस मऊ राहतात. स्मुदनिंगमुळे तुमचे केस रुक्ष दिसत नाहीत आणि दीर्घकाळ मुलायम राहतात.

पुढे वाचा ...
  मुंबई, 16 जून : सध्या हेअर स्मूदनिंग (Hair Smoothening Treatment) खूप ट्रेंडमध्ये आहे. हेअर स्मूदनिंग केसांवर नैसर्गिक तेज आणते आणि केसांना सिल्की-स्मूद बनवते. ब्‍यूटी पार्लरमध्ये ही हेअर स्मुदनिंगची ट्रीटमेंट घेतली जाते. एकदा केसांवर हेअर स्‍मूदनिंग ट्रीटमेंट घेतली तर त्याचा प्रभाव केसांवर 6 ते 8 महिन्यांपर्यंत राहतो. हे या ट्रीटमेंटचे वैशिष्ठ्य आहे. ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर केसांची योग्य पद्धतीने काळजी घेतली गेली तर केसांवर दीर्घकाळ याचा प्रभाव टिकून राहतो. स्मूदनिंग केल्यामुळे केस निर्जीव आणि रुक्ष दिसत नाहीत आणि ते अनेक महिने सॉफ्ट राहतात. मात्र या स्मूदनिंगमुळे अनेकदा केसांचे नुकसानदेखील होऊ शकते (Hair Loss After Hair Smoothing Treatment). या ट्रीटमेंटमध्ये काही केमिकल्स वापरले जातात. त्यामुळे केसांची योग्य काळजी न घेतल्यास या केमिकल्समुळे केस निर्जीव आणि रुक्ष होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया स्मूदनिंगनंतर केसांची काळजी कशी घ्यावी. तीन दिवस असतात महत्वाचे केस स्मूद झाल्यानंतर सुरुवातीचे तीन दिवस केसांमध्ये पाणी किंवा कोणत्याही प्रकारचे हेअर प्रोडक्ट वापरू नका. एवढेच नाही तर केसांमध्ये कोणत्याही प्रकारची क्लिप किंवा रबर इत्यादी लावण्यासही मनाई आहे. तसेच तुमचे केस सरळ राहणे गरजेचे आहे. रुंद दात असलेला कंगवा वापरा केस विंचरण्यासाठी नेहमी रुंद दात असलेला कंगवा वापरा. ब्रशच्या मदतीने केस विचारल्यास ते जास्त चांगले राहील.

  Cancer नंतर आता HIV वरही रामबाण उपचार सापडला; लशीचा फक्त एक डोस करणार व्हायरसचा खात्मा

  स्मुदनिंग शॅम्पूचाच वापर करा केसांवर स्मुदनिंग ट्रीटमेंट घेतल्यानंतर 3 दिवस शॅम्पू करू नये. त्यानंतरही जेव्हा शॅम्पू करायचा असेल तेव्हा स्मुदनिंग शॅम्पूच वापरावा. यामुळे तुमच्या केसांचे स्मुदनिंग जास्त काळ टिकून राहते. हेअर केअर एक्सपर्टचे मत अनेकवेळा केसांचे तज्ञ आपल्याला केसांच्या स्मुदनिंगबद्दल सर्व माहिती देतात. परंतु कधीकधी आपण त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्या आवडीचे शॅम्पू, कंडिशनर आणि सीरम वापरण्यास सुरवात करतो. मात्र असे अजिबात करू नका. ट्रिमिंग आवश्यक आहे केस स्मूद केल्यानंतर दर दोन ते तीन महिन्यांनी एकदा केस ट्रिमिंग करा. असे केल्याने केसांची मेंटेन राहतात.

  पुण्याच्या 'सीरम'चं मोठं यश; Cervical cancer वर पहिली स्वदेशी लस तयार

  धूळ आणि सूर्यप्रकाशापासून केसांचे संरक्षण करा स्मुदनिंग ट्रीटमेंट घेतल्यानंतर धूळ आणि सूर्यप्रकाशापासून केसांचे संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे स्कूटी किंवा बाइकवर बसण्यापूर्वी केस व्यवस्थित झाकून घ्या. या गोष्टी टाळा स्मुदनिंग ट्रीटमेंट घेतल्यानंतर चार महिने केसांमध्ये मेहंदी किंवा हेअर कलर वापरू नये. असे केल्यास केसांचा पोत खराब होतो आणि मुलायमपणा कमी होतो. हेअर स्पा करणे आवश्यक स्मुदनिंग केल्यानंतर महिन्यातून एकदा हेअर स्पा करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घरच्या घरीही नैसर्गिक हेअर स्पा करू शकता.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Lifestyle, Woman hair

  पुढील बातम्या