रात्री फास्ट फूड खाल्ल्यानं आरोग्यावर होतो गंभीर परिणाम? अजिबात खाऊ नका 'हे' पदार्थ
फायनान्शिअल एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, सरकार या लसीला लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करण्याचा विचार करत आहे. या अंतर्गत 9 ते 14 वयोगटातील मुलींना कॅन्सरपासून (Cancer) वाचवण्यासाठी या लसी दिल्या जाऊ शकतात. सध्या सर्व्हायकल कॅन्सरची लस फक्त खासगी रुग्णालयांमध्ये (Private Hospitals) उपलब्ध असून ती खूप महाग आहे. त्याच्या एका डोसची किंमत 4 हजार रुपयांपर्यंत आहे. शिवाय सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनतेमध्ये फार जागरुकता नाही. त्यामुळे बऱ्याचदा सामान्यांना या कॅन्सरबद्दल फार उशिरा कळतं.सर्व्हायकल कॅन्सर हा महिलांना होणारा एक मोठा आजार आहे. भारतात 15 ते 44 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरनंतर (Breast Cancer) हा दुसरा सर्वांत जास्त होणारा कॅन्सर आहे. यामुळे महिलांच्या सर्व्हिक्स पेशींचे नुकसान होते. सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाच्या खाली असलेला छोटा भाग. गर्भाशयाच्या ग्रीवामधील कॅन्सर हा सामान्यतः ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे (HPV) होतो. भारतात दरवर्षी सर्व्हायकल कॅन्सरचे सुमारे 80-90 हजार रुग्ण आढळत आहेत. तसंच जगभरातील सर्वाधिक सर्व्हायकल कॅन्सरचे रुग्ण भारतात आढळतात.
गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून 'हा' व्यक्ती पाळतोय गाढवं; करतोय लाखोंची कमाई
या वर्षाच्या अखेरीस ही स्वदेशी सर्व्हायकल लस बाजारात आणली जाऊ शकते, अशी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला आशा आहे. दरम्यान, लसीच्या मंजुरीसाठी Drug Controller General of India (DCGI) यांना अर्ज केला असल्याचं, सीरम इन्स्टिट्यूटच्या सरकारी आणि नियामक प्रकरणांचे संचालक प्रकाश कुमार सिंह यांनी सांगितलं. ते म्हणाले की, या लसीचं नाव CERVAVAC असेल. तसंच चाचणीदरम्यान या लसींचा खूप चांगला परिणाम झाला आहे. या लसीचा अँटिबॉडी रिस्पॉन्स सर्व वयोगटांतील स्त्रियांमधील सर्व HPV व्हायरसवर बेसलाइनपेक्षा 1000 पट जास्त असल्याचं दिसून आलं आहे. या लसीला मान्यता मिळाल्यानंतर जर ती सामान्य महिलांना स्वस्त दरांत मिळाली तर खरोखरच महिलांच्या दृष्टीने ती मोलाची गोष्ट असेल.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cancer, Vaccination