Home /News /lifestyle /

Cancer नंतर आता HIV वरही रामबाण उपचार सापडला; लशीचा फक्त एक डोस करणार व्हायरसचा खात्मा

Cancer नंतर आता HIV वरही रामबाण उपचार सापडला; लशीचा फक्त एक डोस करणार व्हायरसचा खात्मा

फोटो सौजन्य - Shutterstock

फोटो सौजन्य - Shutterstock

संशोधकांना अशी स तयार करण्यात यश मिळालं आहे, ज्याचा एकच डोस एचआयव्ही विषाणूचा (Virus) नाश करू शकतो.

तेल अवीव, 15 जून : कॅन्सर अर्थात कर्करोगानंतर (Cancer) आता एचआयव्ही-एड्स (HIV-AIDS Vaccine) या असाध्य आजारावरचा संभाव्य उपचार (HIV Treatment) शोधून काढण्यात संशोधकांना यश मिळालं आहे. संशोधकांना अशी एक लस (Vaccine) तयार करण्यात यश मिळालं आहे, ज्याचा एकच डोस एचआयव्ही विषाणूचा (Virus) नाश करू शकतो. या संशोधनामुळे एचआयव्ही-एड्सवर लवकरच उपचार उपलब्ध होतील, अशी आशा निर्माण झाली आहे. एड्स हा आजार एचआयव्ही म्हणजेच ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी विषाणूमुळे (Human immunodeficiency virus) होतो. हा विषाणू शरीरातल्या रोगप्रतिकारशक्तीवर हल्ला करतो. त्यावर वेळेवर उपचार झाले नाहीत, तर एड्स होण्याची शक्यता असते. एका आकडेवारीनुसार, 2020मध्ये जगभरातल्या सुमारे 3.7 कोटी व्यक्तींना हा आजार झाला होता. हा आजार प्रामुख्यानं असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित रक्तचा प्रसार किंवा दूषित सीरिंज वापरल्यामुळे होतो. तसंच एचआयव्हीग्रस्त गर्भवती मातेकडून तिच्या बाळालाही हा आजार होतो. एचआयव्ही-एड्सवर अद्याप कोणतेही ठोस उपचार उपलब्ध नाहीत. तथापि, औषधांद्वारे रोगाचा प्रसार रोखला जाऊ शकतो आणि एचआयव्हीबाधित व्यक्ती दीर्घकाळ जगू शकते. पण आता  इस्रायलच्या तेल अवीव विद्यापीठातल्या (Tel Aviv University) संशोधकांनी यावर लस तयार केली आहे. या लशीचे लॅब रिझल्ट खूप चांगले आले आहेत. संशोधकांनी शरीरातल्या टाइप-बी पांढऱ्या रक्त पेशींच्या (Type-B White Blood Cells) जनुकांमध्ये काही बदल केले आणि त्यामुळे एचआयव्ही विषाणूचा नाश झाल्याचं दिसून आलं. हे वाचा - पुण्याच्या 'सीरम'चं मोठं यश; Cervical cancer वर पहिली स्वदेशी लस तयार या पेशी आपल्या शरीरातले विषाणू आणि धोकादायक बॅक्टेरियाशी लढण्याकरिता अ‍ॅंटीबॉडीज (Antibodies) तयार करतात. या पांढऱ्या पेशींची निर्मिती बोन मॅरो (Bone Marrow) अर्थात अस्थिमज्जा या भागात होते. या पेशी परिपक्व झाल्यावर रक्ताच्या माध्यमातून त्या शरीरातल्या विविध अवयवांपर्यंत पोहोचवल्या जातात. संशोधकांनी या बी पेशींच्या जनुकांमध्ये बदल करून एचआयव्ही विषाणूच्या काही भागांशी त्यांचा संपर्क घडवून आणला. यामुळे त्यात काही बदल दिसून आले. त्यानंतर या तयार झालेल्या बी पेशी आणि एचआयव्ही विषाणू यांच्यात संघर्ष घडवून आणला गेला असता त्यात विषाणू नष्ट होत असल्याचं दिसून आलं. या बी पेशींमध्ये एक विशेष गोष्टदेखील दिसली. एचआयव्ही विषाणूची ताकद वाढल्यास या पेशी त्यांची क्षमता वाढवून विषाणूसोबत लढा देत असल्याचं दिसून आलं. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार,  हे संशोधन करणारे डॉ. बर्जेल यांनी सांगितलं की, "ज्या मॉडेल्सच्या आधारे या उपचाराची प्रयोगशाळेत चाचणी केली गेली, त्यात खूप चांगले रिझल्ट्स दिसून आले आहेत. यामुळे मॉडेल्सच्या शरीरातल्या अ‍ॅंटीबॉडीजची संख्या लक्षणीय वाढली आणि त्या एचआयव्ही विषाणू नष्ट करण्यात यशस्वी झाल्या" हे वाचा - बापरे! फक्त हात लावताच चिमुकलीची भयंकर अवस्था; तुमच्या आजूबाजूलाही हे झाड तर नाहीये ना?? या संशोधनाविषयीचा लेख नेचर नियतकालिकात (Nature Magazine) प्रकाशित करण्यात आला आहे. आपल्या निष्कर्षात या नियतकालिकाने या अ‍ॅंटीबॉडीज सुरक्षित, शक्तिशाली आणि कार्यक्षम असल्याचं सांगितलं आहे. हे उपचार केवळ संसर्गजन्य रोगांवरच नव्हे, तर कॅन्सर आणि ऑटोइम्युन आजारांवरही प्रभावी ठरू शकतात, असं सांगितलं जात आहे. कॅन्सरचे रुग्ण जादुई औषधामुळे झाले बरे काही दिवसांपूर्वी रेक्टल कॅन्सरचं (Rectal cancer) निर्मूलन करणाऱ्या औषधाची चाचणी यशस्वी झाली होती. आता एचआयव्हीविरुद्धच्या युद्धात यशाची अशीच आशा दिसून आली आहे. अमेरिकेत डॉस्टरलिमॅब नावाचं औषध 6 महिन्यांसाठी दर तीन आठवड्याच्या अंतरानं 12 रुग्णांना दिलं गेलं. यामुळे सर्व रुग्णांचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाला असून, औषधाचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत, असा दावा करण्यात आला आहे.
First published:

Tags: Health, Lifestyle, Serious diseases

पुढील बातम्या