मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /प्लास्टिक सर्जरीवर भारतात लो बजेट पर्याय सापडला; 25 जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली

प्लास्टिक सर्जरीवर भारतात लो बजेट पर्याय सापडला; 25 जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली

पश्चिम बंगालमध्ये सरकारी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी एकत्रितपणे शेळीच्या मदतीने प्लास्टिक सर्जरीचा स्वस्त पर्याय शोधला आहे.

पश्चिम बंगालमध्ये सरकारी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी एकत्रितपणे शेळीच्या मदतीने प्लास्टिक सर्जरीचा स्वस्त पर्याय शोधला आहे.

पश्चिम बंगालमध्ये सरकारी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी एकत्रितपणे शेळीच्या मदतीने प्लास्टिक सर्जरीचा स्वस्त पर्याय शोधला आहे.

नवी दिल्ली, 16 जून : कधी जन्मजात तर कधी काही अपघातामुळे अनेक लोकांचा चेहरा विद्रुप होतो. चेहऱ्यावर अपघाताच्या खूणा राहतात. तेथील त्वचा खराब दिसते. अपघातात कान तुटल्याचीही अनेक प्रकरणे समोर येतात. अशा परिस्थितीत यावर प्लास्टिक सर्जरी शिवाय पर्याय नसतो. ती करणं प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसते. पण, आता डॉक्टरांनी एक स्वस्त उपचार शोधून काढला आहे. मात्र, यासाठी पुन्हा एका प्राण्याच्या जीवावर अवलंबून राहावं लागणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये सरकारी रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी एकत्रितपणे शेळीच्या मदतीने प्लास्टिक सर्जरीचा स्वस्त पर्याय शोधला आहे. या नवीन संशोधनात डॉक्टरांनी दावा केला आहे की, शेळीच्या कानाचा भाग (कार्टिलेज) विद्रुप मानवी नाक, कान, तोंड दुरुस्त करण्याचे काम करेल, जे आतापर्यंत प्लास्टिक सर्जरीनेच केले जात आहे. त्याची 25 जणांवर चाचणीही करण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे.

बकरी असेल तारणहार!

पं. बंगालमधील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे डॉक्टर आणि पश्चिम बंगाल युनिव्हर्सिटी ऑफ अॅनिमल अँड फिशरी सायन्सेसच्या शास्त्रज्ञांनी बकरीच्या कानाचा वापर मायक्रोटिया वापरण्यासाठी केला. त्यामुळे तुटलेल्या कानाची समस्या जी जन्मजात आहे. तसेच तुटलेल्या ओठांबरोबरच अपघातांमुळे आलेले विद्रुपिकरण. इतर शारीरिक विकृती दूर करण्यासाठी नवीन उपचार शोधण्यात आले आहेत. ज्यामध्ये बकरीच्या कानाची कूर्चाच्या मदतीने ती बरी केली जाईल. सर्वात फायदेशीर म्हणजे या उपचाराचा खर्च कमी आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार कमी होईल.

हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

डॉक्टरांच्या या नव्या संशोधनाची यशस्वी चाचणीही झाली आहे. प्रत्येक उत्पादनाप्रमाणे याची चाचणी देखील प्रथम प्राण्यांवर झाली, त्यानंतर नाक, कानाशी संबंधित समस्या असलेल्या अशा सुमारे 25 लोकांची त्यांच्या परवानगीने चाचणी करण्यात आली. या चाचण्या पूर्णपणे यशस्वी झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. रूप नारायण भट्टाचार्य म्हणाले की, मानवाच्या बाह्य शारीरिक विकृती ज्याला मायक्रोशिया म्हणतात, त्या दुरुस्त करण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करावी लागते. जे आता शेळीच्या कूर्चाच्या मदतीने दुरुस्त करता येऊ शकते.

First published:
top videos

    Tags: Health, Operation