मुंबई, 31 मे : सध्याच्या धावपळीच्या काळात आपल्या तब्येतीकडे नकळत दुर्लक्ष होत आहे. धावपळीदरम्यान अनेकदा आपण पौष्टिक अन्न न खाता फास्ट खातो. त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होतात. त्याचबरोबर अपूर्ण झोप, व्यायामाचा अभाव यामुळे शरीर आणखी समस्यांना आमंत्रण देते. म्हणून कायम आहाराकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश केल्याने बऱ्याच आजारांपासून आपण दूर राहतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका आरोग्यवर्धक पदार्थाविषयी सांगणार आहोत. याच्या योग्य सेवनाने तुम्हाला अनेक फायदे होतात (Benefits of Ghee).
आरोग्यवर्धक पदार्थांपैकी एक असलेला हा पदार्थ म्हणजे तूप (Ghee Or Butter). होय तुम्ही बरोबर ऐकले. अनेक आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आपल्या आहारात समाविष्ट होण्यायोग्य पदार्थांपैकी तूप हे सर्वात आवश्यक आहे. तूप रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. तूपामुळे हाडे मजबूत राहतात आणि पचनप्रक्रिया सुधारते (Ghee For Good Metabolism). त्याचबरोबर दृष्टी आणि मज्जासंस्थेसाठीही तूप चांगले असते. तुपाचे फायदे केवळ शरीराचे आतील आरोग्य राखण्यासाठीच होतात असे नाही. तर तूपाचे फायदे तुमच्या त्वचेला आणि केसांनाही होतात. जाणून घेऊया कसे ...
केस आणि त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असते तूप...
तूप आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर असते (Ghee Is Very Useful For Skin And Hair). अतिशय पौष्टिक आणि नैसर्गिक असणारे तूप तुमच्या चेहऱ्यावरील पुरळ, मुरूम किंवा डागांची समस्या सुधारण्यासाठी अधिक प्रभावी आहे. तूपाचे अनेक सौंदर्यवर्धक फायदे आहेत. तूप थेट चेहऱ्यावर लावता येऊ शकते (Benefits Of Applying On Face)किंवा घरी तूपाचे एखादे मास्क आणि स्क्रब तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते. तुपामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येते. तूप तुमच्या डोळ्यांखालची काळी वर्तुळं मिटवण्यासाठी सीरम म्हणून वापरले जाऊ शकते. त्याचबरोबर फाटलेल्या आणि कोरड्या ओठांसाठी बाम म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. तूप कोरड्या त्वचेसाठी कंडिशनर म्हणून काम करते आणि निस्तेज त्वचेला चमकदार आणि मुलायम बनवते.
हेही वाचा... नॅचरल पद्धतीनं बॉडी डिटॉक्स करण्याची ही आहे सर्वात सोपी पद्धत; जाणून घ्या फायदे
त्वचेप्रमाणेच तूप केसांसाठीदेखील तितकेच उपयुक्त ठरते. तूप ओमेगा 3 चा समृद्ध स्त्रोत आहे. ज्यामध्ये फॅटी ऍसिड आणि जीवनसत्त्वे असतात. हे सर्व पेशींच्या वाढीस चालना देतात. तुपामध्ये आढळणारे निरोगी आणि समृद्ध फॅटी ऍसिड तुमच्या केसांना पोषण देतात, ज्यामुळे केस मऊ, चमकदार आणि निरोगी बनतात. तूप केसांना लावल्यास ते केसांच्या वाढीस चालना देते. केसांना हायड्रेट करते आणि पोषण देत. तुपाच्या वापराने तुम्ही केसांमधी कोंडा आणि खाज सुटण्याच्या समस्येपासूनही मुक्त होऊ शकता.
एखाद्या जुन्या आजारामुळे किंवा अॅलर्जीमुळे शरीरात होणारी जळजळ कमी करण्यासाठी तूप फायदेशीर ठरते. तूपामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. त्वचेला बरे करणे, दुरुस्त करणे आणि पुनर्संचयित करणे, कोलेस्टेरॉल कमी करणे, पचनास मदत करणे आणि बद्धकोष्ठता दूर करणे यासाठी तूप उपयुक्त ठरते. त्याचप्रमाणे भरपूर पोषक आणि सॅच्युरेटेड फॅट्स असलेले तूप मेंदू, हाडे, हृदय आणि मज्जासंस्थेच्या निरोगी कार्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. दररोज मर्यादित प्रमाणात याचे सेवन करणे मेंदूसाठी देखील खूप फायदेशीर आहे. हे स्मरणशक्ती सुधारते आणि मेंदूचे कार्य मजबूत करते. किंबहुना गाईच्या तुपाच्या सेवनाने बुद्धीही वाढते असे म्हणतात.
हेही वाचा... Milk store tips: दूध नेहमी अशा भांड्यामध्ये ठेवायचं; उन्हाळा असला तरी खराब नाही होणार
महिलांना मासिक पाळीदरम्यान देखील तूपाचा खूप फायदा होतो. पीएमएस आणि अनियमित मासिक पाळी यांसारख्या समस्यांना तोंड देत असलेल्या महिलांसाठी तूप खूप उपयुक्त आहे. नियमितपणे तुपाचे सेवन केल्याने तुम्हाला अनियमित मासिक पाळीपासून आराम मिळेल. कारण तूप तुमच्या शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवते. तुपाचे अनेक फायदे आहेत. मात्र याचे प्रमाणात आणि योग्य प्रकारे सेवन केले तरच हे फायदे मिळतात. तुपाचे तिसेवन देखील शरीरासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे तूप नक्की खावे मात्र प्रमाणात.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ghee, Health, Health Tips, Lifestyle