Home /News /lifestyle /

सज्ञान जोडप्याला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा हक्क; 21 वर्षांच्या तरुणीला 19 वर्षांच्या बॉयफ्रेंडबरोबर संरक्षण देण्याचे आदेश

सज्ञान जोडप्याला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा हक्क; 21 वर्षांच्या तरुणीला 19 वर्षांच्या बॉयफ्रेंडबरोबर संरक्षण देण्याचे आदेश

तरुणीच्या घरच्यांकडूनच या जोडप्यावर दबाव आहे आणि एकमेकांवर प्रेम करणारे सज्ञान असल्याने त्यांना संरक्षण द्यावं, असा निर्णय हायकोर्टाने दिला आहे.

अमृतसर, 12 जुलै: आज जग जसं आधुनिक होतंय तसाच आधुनिकपणा नात्यांमध्येही येऊ लागला आहे. आजचे तरुण-तरुणी विवाहापेक्षा लिव्ह-इन-रिलेशनमध्ये (Live In Relationship) राहण्यास अधिक प्राधान्य देत आहेत. याला काही सामाजिक, अर्थिक कंगोरे आहेत. अनेकवेळा हे रिलेशन यशस्वी ठरते तर काहीवेळा या माध्यमातून अडचणी निर्माण होताना दिसतात. या सर्व पार्श्वभूमीवर नुकताच पंजाब, हरियाणा उच्च न्यायालयाने (Punjab, Haryana High Court) एक निर्णय दिला असून कायदेशीरदृष्ट्या सज्ञान जोडप्याला लिव्ह-इन-रिलेशनमध्ये राहण्याचा हक्क असल्याचे त्यात म्हटलं आहे. सज्ञान असल्याने लिव्ह–इन–रिलेशनशिपमध्ये राहण्याचा जोडप्याला अधिकार असल्याचं नमूद करत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने 21 वर्षीय तरुणी आणि 19 वर्षीय तरुणास संरक्षण दिलं आहे. लाइव्ह लॉ डॉट इनने दिलेल्या वृत्तानुसार, लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने तरुणीच्या कुटुंबापासून संरक्षण मिळावे म्हणून उच्च न्यायालयात याचिका (Petition) दाखल केली होती. या तरुणीचे कुटुंब तिचे लग्न अन्य व्यक्तीशी करु इच्छित होते. कौटुंबिक प्रतिष्ठेसाठी या जोडप्यास कुटुंबाकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. यात याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते की या तरुणाचे सध्या वय 19 वर्ष आहे. त्यामुळे विवाहयोग्य वय झाले की आम्ही दोघे लग्न करु. या लिव्ह-इन- रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याने वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना पत्र लिहून आम्हाला संरक्षण द्यावे अशी मागणी केली होती. परंतु, त्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. या विषयावरील संबंधित निकालवर अवलंबून राहून न्यायालयाने या जोडप्याला संरक्षण देण्याचे निर्देश पोलिसांना दिले. लग्न लागता लागता निघाला नवरीचा मेकअप; पाहताच नवऱ्याने मग काय केलं पाहा VIDEO या प्रकरणात याचिकाकर्ते सज्ञान असल्यानं त्यांना लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहण्याचा कायदेशीर हक्क आहे. त्यामुळे प्रतिवादी क्रमांक 4 आणि 5 यांच्याकडून कोणताही त्रास होणार असेल किंवा जीवाला धोका असेल तर त्यासाठी आणि स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी मदत मागण्याचा अधिकारही या तरुण जोडप्याला आहे, असं न्यायमूर्ती अरुणकुमार त्यागी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं. उच्च न्यायालयाने काय म्हटलं आहे वरील चर्चेच्या पार्श्वभूमीवर याचिकाकर्ता क्रमांक 2 मोहाली जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी याचिकाकर्त्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यावर लक्ष द्यावे, असे निर्देश देत उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. तसेच दिनांक 2-07-2021 रोजी प्राधान्याने व्यक्त करण्यात आल्यानुसार त्यांचे (तरुण जोडप्याचे) जीवन आणि स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी योग्य परिस्थितीनुरुप कार्यवाही करावी अशेही स्पष्ट केले. गेल्या महिन्यात अशाच प्रकारच्या एका प्रकरणात उच्च न्यायालयाने लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 18 आणि 19 वर्षीय एक तरुणी आणि तरुणास पोलिस संरक्षण देण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात दोन्ही याचिकाकर्त्यांचे वय हे 18 वर्षांपेक्षा अधिक आहे. परंतु, तरुणाचे वय विवाहयोग्य नाही. सध्याच्या काळात लिव्ह-इन-रिलेशनशिप ही काही नवी घटना नाही. परंतु, असं नातं असल्यास आश्चर्य व्यक्त करण्यापलीकडे जात ते स्वीकारण्याची समाजाची मानसिकता अजून विकसित झालेली नाही. योगी बाबाचा हायप्रोफाइल फ्रॉड, ज्वेलर्सच्या पत्नीला घालत होता असा गंडा माननीय सर्वोच्च न्यायालय तसंच अनेक उच्च न्यायालयांनी लिव्ह-इन-रिलेशनशिप हे नातं स्वीकारलं आहे. अशा जोडप्यांच्या संरक्षणासाठी भारतीय घटनेच्या अनुच्छेद 21 चा वापर केला गेला आहे. याचिकाकर्त्याने उपस्थित केलेला मुद्दा हा त्यांच्या लिव्ह-इन-रिलेशनशिप आणि जीवन तसेच स्वातंत्र्याचा मुलभूत अधिकार भारतीय घटनेच्या अनुच्छेद 21 अंतर्गत येतो. परंतु, घटनेच्या अनुच्छेद 21 अंतर्गत न्यायालयाचा संबंध केवळ त्या जोडप्याच्या अधिकारांशी निगडीत आहे असंही कोर्टाने स्पष्ट केलं.
First published:

Tags: High Court, Relationship

पुढील बातम्या