Home /News /lifestyle /

Piles Problem : मूळव्याधीचा त्रास नकोच असेल तर आहाराची आजपासूनच घ्या अशी काळजी

Piles Problem : मूळव्याधीचा त्रास नकोच असेल तर आहाराची आजपासूनच घ्या अशी काळजी

मुळव्याधीची समस्याही काही प्रमाणात खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवून बरी होऊ शकते आणि त्यामुळे होणारा त्रास टाळता येतो. जाणून घेऊया मूळव्याधीमध्ये कोणते पदार्थ खाणे (Piles Problem) टाळावे.

    मुंबई, 23 जून : मूळव्याध हा एक असा त्रासदायक आजार आहे की, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला बसून देखील अस्वस्थ वाटतं. यामध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास देखील सुरू होतो. बद्धकोष्ठता असेल आणि बसण्यासही त्रास होत असेल तर मूळव्याध असू शकतो. या समस्येमध्ये स्टूलमध्ये रक्तस्त्राव होण्याची समस्या असते. यावर वेळीच उपचार न केल्यास प्रकृती बिघडू शकते. NIDDK संशोधनानुसार, गंभीर बद्धकोष्ठतेमध्ये फायबर कमी असलेल्या पदार्थांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला (Piles diet tips) जातो. परंतु, या परिस्थितीत आहाराचीही मोठी भूमिका असते. त्यामुळे कोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे माहीत असायला हवे. मुळव्याधीची समस्याही काही प्रमाणात खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवून बरी होऊ शकते आणि त्यामुळे होणारा त्रास टाळता येतो. जाणून घेऊया मूळव्याधीमध्ये कोणते पदार्थ खाणे (Piles Problem) टाळावे. तळलेले पदार्थ - तळलेले पदार्थ आरोग्यासाठी चांगले नाहीत. यामुळे पोटात जळजळ होऊ शकते. या गोष्टी खूप जड असतात आणि पचायला खूप वेळ लागतो. त्यामुळे पचनाच्या समस्यांशी संबंधित असलेल्या रुग्णांनीही या गोष्टींपासून दूर राहावे. मसालेदार पदार्थ - मूळव्याध झाल्यास मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. त्यामुळे मल पास करताना वेदना होऊ शकतात. त्यामुळे जास्त मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. यामुळे IBS चा धोका देखील लक्षणीय वाढू शकतो. दारू पिणे - अल्कोहोलच्या सेवनाने पचनसंस्थेवरही परिणाम होतो. याचाही विपरीत परिणाम पोटावर होतो. त्यामुळे पचनासही उशीर होतो आणि मल बाहेर पडण्याच्या समस्या दिसून येतात. यामुळे खूप वेदना होऊ शकतात. हे वाचा - Skin And Hair Care : त्वचा आणि केसांचा तेलकटपणा घालवते तुरटी? वाचा आश्चर्यचकित करणारे फायदे कच्ची फळे खाणे - फळे चांगली पक्व होईपर्यंत त्यांचे सेवन करू नये. कच्च्या फळांमध्ये अशी संयुगे असतात जी पोटात जळजळ करतात, ज्यामुळे वेदना आणखी वाढू शकतात. त्यामुळे फळे चांगली पक्व झाल्यावरच खावीत. हे वाचा - Eye Care : डोळ्यांना खाज आल्यावर चोळू नका; घरच्या घरी करा हे सोपे उपाय आयरन के सप्लीमेंट - आयर्न सप्लिमेंट्सचाही आहारात समावेश केल्यास मुळव्याध होण्याचा धोका आणखी वाढू शकतो. काही प्रकारची औषधे आणि लोह सप्लिमेंट्सचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेशी संबंधित इतर दुष्परिणाम होऊ शकतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या