मुंबई, 22 जून : सलग बराच वेळ काम केल्यावर आपण ताजेतवाने होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. परंतु खूप प्रयत्न करूनही आपल्याला हवी तशी विश्रांती मिळत नाही किंवा फ्रेशनेस मिळत नाही. चिंता आणि तणाव यांचा परिणाम केवळ आपल्या मेंदूवरच होत नाही तर आपल्या त्वचेवरदेखील होतो. तणावामुळे शरीरात असे काही हार्मोन्स तयार होतात. जे आपल्या त्वचेवर वृद्धत्व वाढवण्याचे काम करतात. याशिवाय आपले केसही झपाट्याने गळू लागतात.
अशा परिस्थितीत, आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वतःची काळजी घेणे आणि जाणीवपूर्वक थोडा आराम करणे आवश्यक असते. आज आम्ही तुम्हाला सौंदर्य (Beauty Tips) आणि नवा आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला मानसिक आराम तर मिळेलच (Beauty Care With Self Relaxation) पण त्याचबरोबर तुमचे सौंदर्य वाढण्यासही मदत होईल.
अशा प्रकारे आराम करण्यासोबत मिळावा सौंदर्य
केसांना तेल लावणे
दररोज 10 मिनिटे केसांना तेलाने मसाज (Oil Hair Massage) केल्यास केस तर मजबूत होतातच पण डोकेदुखी, मायग्रेन अशा अनेक समस्यांपासून आराम मिळतो. शरीर आणि मन दोघांनाही आराम (Body-Mind Relaxation) देण्यासाठी उपाय शतकानुशतके वापरण्यात आला आहे. यासाठी तुम्ही खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल, बदाम तेल किंवा कोणत्याही प्रकारचे तेल वापरू शकता.
Eye Care : डोळ्यांना खाज आल्यावर चोळू नका; घरच्या घरी करा हे सोपे उपाय
फेस शीट मास्क वापरा
जर तुम्हाला स्पा सारखा आराम हवा असेल तर फेस शीट मास्क (Use Face Sheet Mask) वापरून पहा. ते फक्त चेहऱ्यावर लावा आणि आरामात बसा किंवा झोपा. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार फेस शीट मास्क निवडा आणि रात्री झोपण्यापूर्वी वापरा.
स्पा पद्धतीने अंघोळ करा
स्पा बाथप्रमाणे तुम्ही आंघोळ करण्यासाठी थोडा जास्त वेळ घ्या (Bath Like Spa) आणि ड्राय ब्रश किंवा गरम शॉवर, काही मेणबत्त्या इत्यादी गोष्टी वापरून पहा. तुम्ही काही वेळ गरम शॉवरमध्ये आरामात बसा. त्या बसर्व वातावरणात तुम्हाला बरे वाटेल.
Skin And Hair Care : त्वचा आणि केसांचा तेलकटपणा घालवते तुरटी? वाचा आश्चर्यचकित करणारे फायदे
तेल मालिश
तेल स्पा मसाजसाठी प्रथम एका भांड्यात थोडेसे बॉडी ऑइल घ्या. हवे असल्यास त्यात दोन थेंब लॅव्हेंडर तेल टाका. आता खाली बसून या तेलाने आपले पाय, हात आणि खांदे (Body Massage) पूर्णपणे मसाज करा. तुमच्या शरीराला मसाज केल्याने थकवा कमी होईल आणि तुम्हाला आराम वाटेल. तुम्हाला हवे असल्यास रात्री हे करा आणि त्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करून झोपा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle, Skin care