advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / या 7 कारणांमुळे तरुणांनाही येतोय हार्ट अटॅक! तुम्ही या चुका तर करत नाही ना?

या 7 कारणांमुळे तरुणांनाही येतोय हार्ट अटॅक! तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Heart Attack Factor in Youngsters: अलीकडील काही वर्षात मोठ्या प्रमाणात तरुणही ह्रदयविकाराचे बळी ठरत आहे.

01
मंगळवारी कोल्हापूरमध्ये एका 23 वर्षीय पैलवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. याआधी एका तरुणाचा गरबा खेळताना असाच जीव गेला. तर गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या झटक्याने अनेक सेलिब्रिटींना आपला जीव गमवावा लागला आहे. चिंतेची बाब म्हणजे यातील काही लोक 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडत आहेत. यापैकी बहुतेक लोक 40-50 वर्षांच्या आसपास आहेत. तज्ज्ञांच्या मते, आता सर्व वयोगटातील लोकांना हृदयविकाराचा धोका आहे. जीवनशैली बदल आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवल्यासच हा धोका टाळता येऊ शकतो.

02
अनेकांना हृदयविकाराच्या मोठ्या धोक्यांचीही जाणीव नसते. अपोलो हॉस्पिटल्स, नवी दिल्ली येथील कार्डिओलॉजिस्ट डॉ. वनिता अरोरा यांच्याकडून हृदयविकाराच्या सर्वात सामान्य कारणांबद्दल जाणून घेणार आहोत. हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत हे देखील आपल्याला माहिती हवे.

03
मधुमेह: हृदयविकाराच्या सर्वात मोठ्या कारणांमध्ये मधुमेह पहिल्या क्रमांकावर आहे. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी धोकादायक पातळीपर्यंत पोहोचल्यास ते हृदयविकाराचे कारण बनते. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवला पाहिजे.

04
तणाव आणि नैराश्य: बहुतेक लोक तणावाच्या समस्येशी झुंजत असतात. तणावाचा अतिरेक झाला की त्याचे रूपांतर नैराश्यात होते. नैराश्य आणि तणावामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका लक्षणीय वाढतो.

05
उच्च रक्तदाब: रक्तदाबाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. रक्तदाब नियंत्रणात नसेल तर ते हृदयविकाराचे कारण बनते.

06
धूम्रपान: आजच्या युगात सिगारेट ओढणे ही एक फॅशन बनली आहे. मात्र, त्याच्या धुरामुळे हृदयाला गंभीर धोका निर्माण होतो. सिगारेटमुळे अनेकांना हृदयविकाराचा झटका येतो. त्यामुळे सिगारेट ताबडतोब सोडून द्यावी.

07
फॅमिली हिस्ट्री: काही लोकांच्या कुटुंबात हृदयविकाराची हिस्ट्री असते. यामुळे तरुणही हृदयविकाराचे बळी ठरतात. जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचा कौटुंबिक इतिहास असेल, तर नक्कीच एखाद्या तज्ञाशी संपर्क साधा.

08
हाय कोलेस्टेरॉल : कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले की ते रक्ताच्या नसांमध्ये जमा होते आणि हृदयाकडे जाणारे रक्त थांबते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा कार्डियक अरेस्ट येतो. कोलेस्ट्रॉल नेहमी नियंत्रणात असावे.

09
लठ्ठपणा: तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की लठ्ठपणा आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. लठ्ठपणामुळेही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रित ठेवावे.

10
डॉ. वनिता अरोरा यांच्या मते, जर तुम्हाला हृदयविकाराचा झटका किंवा इतर हृदयविकार टाळायचे असतील तर तुम्हाला तुमचा रक्तदाब, साखरेची पातळी आणि वजन नियंत्रित ठेवावे लागेल. खाण्यापिण्याबाबत काळजी घ्यावी लागेल, रोज व्यायाम करावा लागेल आणि धूम्रपानापासून पूर्णपणे दूर राहावे लागेल.

11
कमी तेलात घरी शिजवलेले अन्न खावे, जेणेकरून कोलेस्ट्रॉल आणि कार्बोहायड्रेट्स कमी करता येतील. निरोगी लोकांनी देखील नियमित तपासणी केली पाहिजे. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी वेळेवर औषधे घ्यावीत. समस्या असल्यास, विलंब न करता हृदयरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा.

  • FIRST PUBLISHED :
  • मंगळवारी कोल्हापूरमध्ये एका 23 वर्षीय पैलवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. याआधी एका तरुणाचा गरबा खेळताना असाच जीव गेला. तर गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या झटक्याने अनेक सेलिब्रिटींना आपला जीव गमवावा लागला आहे. चिंतेची बाब म्हणजे यातील काही लोक 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकांपर्यंत हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडत आहेत. यापैकी बहुतेक लोक 40-50 वर्षांच्या आसपास आहेत. तज्ज्ञांच्या मते, आता सर्व वयोगटातील लोकांना हृदयविकाराचा धोका आहे. जीवनशैली बदल आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवल्यासच हा धोका टाळता येऊ शकतो.

    MORE
    GALLERIES