नवी दिल्ली, 14 डिसेंबर: सकाळच्या वेळी चहाचा ( tea ) किंवा कॉफीचा (coffee) घोट घेतल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरू होत नाही. तुम्ही ग्रीन टीबद्दल ( green tea ) तर अनेकदा ऐकलं असेल. वजन कमी (weight lose) करायचे असेल, तर बऱ्याचदा ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्ही कधी ग्रीन कॉफीबद्दल (green coffee) बद्दल ऐकले आहे का ? ग्रीन टी प्रमाणेच ग्रीन कॉफी पिण्याचे अनेक फायदे ( benefits ) आहेत. टीव्ही 9 हिंदी ने याबाबत वृत्त दिले आहे.
एक कप गरम कॉफी तुम्हाला उत्साही ठेवण्यास मदत करते. बाजारात कॉफीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारा असाच एक कॉफीचा प्रकार म्हणजे ग्रीन कॉफी. मेटॅबॉलिझम वाढवणं, तणाव कमी करणं, वजन कमी करणं यासह तुम्हाला उत्साही ठेवण्याचं काम ही कॉफी करते. या कॉफीच्या बिन्स भाजल्या जात नाहीत, त्या पूर्णपणे कच्च्या असतात. या कॉफीमध्ये क्लोरोजेनिक ॲसिड नावाचं रसायन मोठ्या प्रमाणात असते. त्यात रेग्युलर कॉफीपेक्षा कमी कॅफिन असतं. चला जाणून घेऊया ग्रीन कॉफीचे आरोग्यासाठी फायदे काय आहेत....
- हाय ब्ल्ड प्रेशर (blood pressure) नियंत्रित ठेवण्यास ग्रीन कॉफी मदत करते. ही कॉर्टिसोल या तणाव संप्रेरकाची पातळी कमी करते. हे संप्रेरक ब्लड प्रेशर वाढवण्यासाठी ओळखले जाते. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवायचे असेल तर दररोज ही कॉफी पिणे खूप फायदेशीर आहे.
- या कॉफीच्या बिन्स नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करतात. ते शरीरातून टॉक्सिन, अतिरिक्त चरबी आणि कोलेस्टेरॉल काढून टाकण्यास मदत करतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही ही कॉफी फायदेशीर ठरते.
हेही वाचा- असा खोकला म्हणजे साधासुधा नव्हे बरं का; एका महाभयंकर आजाराचं लक्षण, वेळीच सावध व्हा
- या कॉफीच्या नियमित सेवनाने मेटॅबॉलिझम गतिमान होतं. त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. कारण यामधील क्लोरोजेनिक ॲसिड हे चरबी बर्न करण्यास मदत करते.
- ग्रीन कॉफी बिन्स मध्ये क्लोरोजेनिक ॲसिड असते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. टाईप २ मधुमेहाचा धोकाही कमी होतो. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि ग्रीन कॉफीसारख्या आरोग्यदायी पेयांचे सेवन यामुळे रक्तातील साखरेची पातळी मोठ्या प्रमाणात संतुलित राहू शकते.
हेही वाचा- तुम्हीही उभं राहून पाणी पिता का? जरा थांबा; आधी जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.