मुंबई, 14 डिसेंबर : एरवी खोकला (Cough) झाला तरी साधा समजून बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करायचे. घरच्या घरी काहीतरी उपाय करायचे. पण आता मात्र खोकला झाला की आपल्याला कोरोना तर झाला नाही ना अशीच भीती वाटते. पण खोकला येणं (Reason of Cough) म्हणजे फक्त कोरोना झाला असावा असं नव्हे तर कोरोनासारखा आणखी एखादा महाभयंकर आजारही असू शकतो. खोकला हा कॅन्सरचं लक्षणही असू शकतो (Cough is symptoms of cancer).
खोकला येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. वातावरणात बदल झाला की सर्वांनाच खोकला येतो आणि कधी-कधी औषध न घेता तो काही दिवसांत बरा होतो. मात्र, फुफ्फुसाचा कॅन्सर असलेल्या रुग्णांचा खोकला हा सामान्य खोकल्यापेक्षा वेगळा असतो. सतत खोकला येणे हे फुफ्फुसाच्या कॅन्सरचं (Lung Cancer) एक लक्षण आहे (Symptoms of Lung Cancer).
फुफ्फुस (Lung) आपल्या शरीरातील महत्त्वपूर्ण अवयव आहे. श्वसनयंत्रणेत फुफ्फुसांचं काम अतिशय महत्त्वाचं असतं. यामुळे फुफ्फुस मजबूत असणं महत्त्वाचे आहे. पण, सध्याची जीवनशैली, प्रदूषणासह वेगवेगळ्या कारणांमुळे फुफ्फुसामध्ये संसर्ग होऊ आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. यावर वेळीच निदान न झाल्यास रुग्णाला वाचवणे अवघड होते. त्यामुळे जर काळजी घेतली तर फुफ्फुसाचा कॅन्सर पहिल्या टप्प्यात ओळखला जाऊ शकतो. म्हणून या आजाराची लक्षणं (Symptoms of Lung Cancer) माहिती असणं गरजेचे आहे.
हे वाचा - Alert! तुम्हालाही रात्री होतोय का असा त्रास? हे ओमिक्रॉनचं लक्षण, दुर्लक्ष नको
फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्यास खोकल्यानंतर रुग्णाच्या छातीत कफ (Cough Is Lung Cancer Symptoms) जमा होतो. खोकताना रक्त पडतं आणि श्वासोच्छवासास त्रास होतो. याशिवाय, खोकल्याचा आवाजही बदलतो. काही काळ गेल्यानंतर रुग्णाला बोलताना आणि खोकताना त्रास होतो. तसेच भूक न लागणं, वजन कमी होणं, सतत थकवा येणं अशी लक्षणं दिसतात. जर ही लक्षणं दिसली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तपासणी करा.
धूम्रपानाची (Smoking) सवय ही फुफ्फुसाचा कॅन्सर होण्यामागील मुख्य कारण आहे. धूम्रपानामुळे लोक कर्करोगाला बळी पडतात. धूम्रपान हे फुफ्फुसांसाठी विषाप्रमाणेच असते. धूम्रपान करत नाहीत ते देखील फुफ्फुसाच्या कर्करोगाचे बळी ठरू शकतात.
हे वाचा - जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहता?, वेळेआधीच ओळखा त्यामागचे दुष्परिणाम
सध्या जगभरात कोरोनाने (Coronavirus ) थैमान घातलेले आहे. या परिस्थितीमध्ये आरोग्याची काळजी घ्या. खाण्या-पिण्याच्या या सवयी बदला. कारण, पौष्टिक आहार केल्यास फुफ्फुसांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमितपणे सकाळी योग व प्राणायाम करावा. यामुळे फुफ्फुसं मजबूत होतील. निरोगी शरीर हाच खरा दागिना असून आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.