जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तुम्हीही उभं राहून पाणी पिता का? जरा थांबा; आधी जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत

तुम्हीही उभं राहून पाणी पिता का? जरा थांबा; आधी जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत

जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत

जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पद्धत

पाणी पिताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि चुकीच्या पद्धतीने (How to Drink Water) पाणी प्यायल्यास काय परिणाम होतात, हे जाणून घेऊ

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 13 डिसेंबर:  पाणी (Water) म्हणजे जीवन. आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी नियमित व पुरेसं पाणी पिणं आवश्‍यक आहे. शरीराच्या सर्वच क्रियांसाठी पाणी अत्यावश्‍यक असतं. पाणी शरीरातल्या विषारी पदार्थांना बाहेर फेकते. त्यामुळे पाणी पिणं फार गरजेचं आहे; मात्र पाणी चुकीच्या पद्धतीने प्यायलं, तर नुकसान होतं. पाणी पिण्याची योग्य पद्धत (Right Way to Drink Water) तुम्हाला माहिती आहे का? पाणी कधीही उभं राहून पिऊ नये. उभं राहून पाणी पिणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे पाणी पिताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि चुकीच्या पद्धतीने (How to Drink Water) पाणी प्यायल्यास काय परिणाम होतात, हे जाणून घेऊ या. ‘झी न्यूज हिंदी’ने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात ऑफिसला जाताना किंवा प्रवासात अनेक जण उभे (Never Drink Water While Standing) राहूनच पाणी पितात. हे अत्यंत चुकीचं आहे. शरीराच्या प्रत्येक भागाला पाण्याची गरज असते; मात्र उभं राहून पाणी प्यायल्यास पाणी अन्ननलिकेतून थेट वाहून जातं आणि त्याचा शरीराला विशेष फायदा होत नाही. म्हणून पाणी बसून प्यावं. बसून पाणी प्यायल्यास जास्त आराम पडतो आणि प्रत्येक अवयवाला पाण्याचा लाभ मिळू शकतो. आयुर्वेदात पाणी पिण्याची पद्धत अतिशय तपशीलवार सांगण्यात आली आहे. आपली पचनक्रिया सुरळीत राहावी, यासाठी जेवणादरम्यान कधीही पाणी पिऊ (Drinking Water while Eating) नये. असं केल्याने लठ्ठपणा येतो. आयुर्वेद सांगतो, की अन्नामुळे पोटात उष्णता/अग्नी निर्माण होतो आणि शीतलता हा पाण्याचा गुणधर्म असतो. त्यामुळे जेवणादरम्यान पाणी प्यायल्याने अग्नी शमतो आणि यामुळे पचन नीट होत नाही आणि विविध रोग होतात. ऐकावं ते नवलंच! प्लास्टिकच्या बाटल्यांपासून व्हॅनिला आइस्क्रीमचा फ्लेवर मिळणार जेवण्यापूर्वी आणि जेवणानंतर लगेचच पाणी पिऊ नये. जेवण्यापूर्वी आणि नंतर पाणी पिण्यासाठी नेहमी किमान 30 मिनिटांचं अंतर ठेवावे. यामुळे जठरातला पाचक रस पातळ होत नाही आणि अन्नपचनात अडथळा येत नाही. जेवणापूर्वी किंवा नंतर ताबडतोब पाणी प्यायल्याने पाचन संस्थेला त्रास होतो आणि पचनक्रिया बिघडते. म्हणून अशा वेळेत अगदी आवश्यक असेल तरच एक किंवा दोन घोट पाणी प्यावं. जेवण झाल्यानंतर (Drinking Water After Eating) अर्ध्या तासाने थंड पाणी पिण्यापेक्षा कोमट पाणी प्यावं. यामुळे अन्न लवकर पचतं. तसेच पाणी घटाघट न पिता, हळूहळू घोट-घोटाने प्यावं. एकाच दमात ग्लास भरून पाणी पिणं चुकीचं आहे. निरोगी राहण्यासाठी दिवसभरात प्रत्येक व्यक्तीला किमान तीन ते चार लिटर पाणी पिण्याची गरज असते; मात्र तहान लागेल तेव्हाच पाणी प्यावं, उगाचच पाणी पिऊ नये. पाणी पिताना या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात