जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / रात्री बाथरूमसाठी सतत उठावं लागतं, वेळीच व्हा सावध; या आजाराला पडू शकता बळी

रात्री बाथरूमसाठी सतत उठावं लागतं, वेळीच व्हा सावध; या आजाराला पडू शकता बळी

रात्री बाथरूमसाठी सतत उठावं लागतं, वेळीच व्हा सावध; या आजाराला पडू शकता बळी

पाणी जास्त प्यायल्याने लघवी जास्त होते असा अनेकांचा समज असतो. पण यामुळे येणारा थकवा आणि निरुत्साहाकडे कोणाचं लक्ष जात नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

अनेकांना रात्री बाथरूमला जायची सवय असते. सतत लघवीला जावं लागल्यामुळे पूर्ण झोपही मिळत नाही. ही कितीही सामान्य गोष्ट वाटत असली तरी असं नाहीये. जर तुम्हाला रात्री दोनपेक्षा जास्तवेळा बाथरूमला जाण्यासाठी उठावं लागत असेल तर हे आजारपणाचं लक्षण आहे. पाणी जास्त प्यायल्याने लघवी जास्त होते असा अनेकांचा समज असतो. पण यामुळे येणारा थकवा आणि निरुत्साहाकडे कोणाचं लक्ष जात नाही. तज्ज्ञांच्यामते, रात्री दोनपेक्षा जास्तवेळा लघवीला जावं लागलं तर ही मधुमेह, रक्तदाब, प्रोस्टेट कर्करोग किंवा अन्य मोठा आजाराची लक्षणं आहेत. याशिवाय डॉक्टरांच्यामते, जेवणाच्या सवयींमध्ये बदल केल्यावरही यापासून सुटका होऊ शकते. जर तुम्हाला आधीच एखादा आजार असेल आणि त्यावर उपचार सुरू असतील तरीही सारखं लघवीला होऊ शकतं. तुम्ही रक्तदाबावर उपचार घेत असाल तर तुम्हाला रात्री वारंवार लघवीला जावं लागू शकतं. कारण या आजारात घेण्यात येणाऱ्या गोळ्यांमुळे जास्त लघवी होते. यासोबतच गरोदर महिलांनाही वारंवार लघवीला होतं. याचं मुख्य कारण की गरोदरपणात यूरेटस मोठं होत असतं, यामुळे ब्लॅडरवर ताण पडतो. ज्यामुळे गरोदर महिलांना सतत लघवीला जावं लागतं. जर तुम्ही कोणत्याही कारणाशिवाय सतत लघवीला जात असाल तर याचा सरळ परिणाम मूत्रपिंडावर होऊ शकतो. यासाठी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही रात्री साधं जेवण जेवायला प्राधान्य दिलं पाहिजे. मसालेदार पदार्थ, मद्यपान आणि कॅफीनसारखे पदार्थ खाणं पूर्ण बंद केलं पाहिजे. याशिवाय पेल्विक प्लोर मसल्स आणि ब्लॅडरला सशक्त करणारे व्यायाम केले पाहिजेत. टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा. बापरे! बर्फात गोठलेल्या मांजराला असं मिळालं नवं आयुष्य! फणस खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत नसतील, एकदा जाणून घ्या! पार्टनरच्या घोरण्याने तुम्ही त्रस्त आहात.. या घरगुती उपायांनी मिळवा आराम तुम्ही नाइट शिफ्ट तर करत नाही ना.. कारण हा आजार होण्याची आहे सर्वाधिक शक्यता

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात