अनेक कंपन्यांमध्ये रात्रपाळीही करावी लागते. नाइट शिफ्ट करणं ही सध्या फार सामान्य गोष्ट झाली आहे. पण सतत रात्रपाळी केल्याने आरोग्याचं खूप नुकसान होतं. एका संशोधनात हे सिद्ध झालं आहे की, सतत नाइट शिफ्ट केल्यामुळे अनेक प्राणघातक आजार होऊ शकतात.
संशोधनानुसार, रात्रपाळी करणाऱ्यांमध्ये कमकूवत डीएनए दुरूस्त करणारे जे जीन असतात ते व्यवस्थित काम करत नाहीत. त्यातच रात्रीची झोप न मिळाल्यामुळे ही परिस्थिती अजून बिकट होते.
जी व्यक्ती रात्रभर काम करते त्यांना क्षय रोग होण्याच्या धोका इतरांच्या तुलनेत 30 टक्क्यांनी जास्त वाढतो. यामुळे कर्करोग, हृदय रोग, श्वसनाशीसंबंधीत अनेक आजार आपसूक होतात आणि शरीर आतून निकामी होत जाते.
अॅनेस्थेशिया अकॅडमिक जर्नलमध्ये प्रदर्शित झालेल्या शोधानुसार, थेट डीएनएवर हल्ला म्हणजे डीएनएच्या मुलभूत संरचनेत होणारा बदल. म्हणजे नवा डीएनए जेव्हा तयार होतो तेव्हा तो कमकूवतच तयार होतो. त्यात हवी तेवढी ताकद नसते.
शोधात 28 ते 33 वयाच्या सुदृढ डॉक्टरांच्या रक्ताची चाचणी केली. या डॉक्टरांना तीन दिवस पुरेशी झोप मिळाली नव्हती. तसेच अशाही डॉक्टरांच्या रक्ताची चाचणी केली ज्यांनी पुरेशी झोप घेतली होती.
संशोधनात हे सिद्ध झालं की, ज्यांना पुरेशी झोप मिळाली नाही त्यांचे डीएनए कमकूवत होतात आणि अनेक आजारांना बळी पडतात.