आता हळूहळू फणसाचा सिझन सुरू होईल. फणस तब्येतीला खूपच चांगला असतो. त्यात व्हिटॅमिन ए, सी, थाइमिन, पोटॅशियम, कॅल्शियम आणि आयर्न असतं. फणसाच्या गऱ्यांचं एकजीव मिश्रण करून पाण्यात उकळवा. हे पेय हृदयरोग असलेल्यांना दिलं जातं. थाॅयराॅईड असलेल्यांनी फणस खावा. त्यात असलेले खनिज आणि काॅपर थायराॅईडला नियंत्रणात ठेवतं. फणसाच्या सेवनानं हाडं मजबूत होतात. फणसात भरपूर फायबर असतं. त्यामुळे नियमित सेवनानं बद्धकोष्ठता जाते. पचनाच्या समस्या संपतात.