जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Overthinking : वारंवार एकच विचार करणं असू शकतं आजाराचं लक्षण, मेंदूवर होतो परिणाम

Overthinking : वारंवार एकच विचार करणं असू शकतं आजाराचं लक्षण, मेंदूवर होतो परिणाम

Overthinking : वारंवार एकच विचार करणं असू शकतं आजाराचं लक्षण, मेंदूवर होतो परिणाम

Overthinking Effects: बऱ्याचदा मनात एखादा विचार वारंवार येत असतो. परंतु वारंवार एकाच गोष्टीचा विचार करणे हे आजारपरणाचे लक्षण असू शकते. यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

**मुंबई, 30 जून :**अनेकांना एकच विचार वारंवार करण्याची सवय (Overthinking Habit) असते किंवा एक विचार वारंवार आपल्या मनात डोकावत असतो. असेच काही विचार करून वारंवार मनात आल्याने त्याचा स्वतःवर मोठा परिणाम (Overthinking Effects) होतो. याला वैज्ञानिक भाषेत ओवरथिंकिंग (Overthinking) म्हणतात. अशा स्थितीत आपण एखाद्या छोट्या गोष्टीचा वारंवार (Frequent Thinking) विचार करून मनात खूप मोठी करतो. वारंवार विचार करणे आणि काळजी करणे हा आजार असू शकतो. हे असे होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. यामुळे मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम (Negative Effects Of Overthinking) होऊ शकतो. अतिविचारामुळे शारीरिक आरोग्याशी संबंधित काही लक्षणे दिसू शकतात. तुम्हीही एका गोष्टीचा वारंवार विचार करत असाल तर त्यावर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेणे महत्वाचे (Health Tips) आहे. अन्यथा त्याचा तुमच्या मनावर खोलवर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला असाच एखादा विचार भेडसावत असेल तर शक्य तेवढ्या लवकर त्यावर उपाय करणे महत्वाचे आहे. या आजाराचा जीवनावर कसा परिणाम (Overthinking Negative Effects) होतो ते जाणून घेऊया. अतिविचाराचा मनावर आणि शरीरावर कसा होतो परिणाम? - हेल्थ शॉट्सनुसार कोणताही निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी खूप अडचणी येतात. - भावनिकदृष्ट्या खूप रिकामे आणि एकटे वाटत राहते. - सतत झोप येते आणि कोणत्याही कामात मन रमत नाही. - खूप चिडचिड होऊ शकते आणि कठोरपणे वागू शकतात, यामुळे इतरांशी - असलेल्या संबंधांवर देखील परिणाम होऊ शकतो. स्त्रियांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा धोका जास्त का? अशाप्रकारे घ्या काळजी - वेगवेगळ्या दृष्टीकोनातून गोष्टी समजून घेण्यात अडचण येते. - खूप जास्त ताणाव दिसून येऊ शकतो. - वारंवार विचार केल्याने रात्री झोपेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. - कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे कठीण होऊ शकते. - यामुळे चिंता, नैराश्य आणि स्वतःबद्दल वाईट विचारही होऊ शकतो. - याचा दैनंदिन कामावर मोठा परिणाम होतो. कार्यशक्ती देखील कमी होते. - या स्थितीत इतरांशी असलेले चांगले संबंधही बिघडू लागतात.

झुरळांमुळे अन्नातून विषबाधेचा धोका; पेस्ट कंट्रोल करण्याऐवजी हे घरगुती उपाय ठरतील प्रभावी

- याचा सर्वाधिक परिणाम भूक आणि झोपेवर होतो. त्यामुळे शारीरिक आरोग्य बिघडू शकते. - यामुळे मेंदूच्या पेशींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. - यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि आपल्याला काहीतरी होईल अशी शंका मनात येऊ लागते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात