नवी दिल्ली, 30जून : घरातील अडगळीची जागा असेल किंवा स्वयंपाक घर (Kitchen) तिथे झुरळं (Cockroach) हमखास दिसतातंच. झुरळ दिसलं की अनेकांची घाबरगुंडीही उडते. घरात दिसणारं झुरळ पाहिलं की, त्याला तेवढ्यापुरतं घालवण्यासाठी प्रयत्न केला जातो. पण झुरळांची संख्या जास्त असेल तर अन्नातून विषबाधेसारखा प्रकार होऊन धोका वाढू शकतो. झुरळांपासून सुटका करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे महागडे कॉक्रोच पेस्ट कंट्रोल (Cockroach Pest Control) जेल, स्प्रे (Spray) मिळतात. पण त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी घरगुती उपाय पण आहेत. याबद्दल ‘झी न्यूज हिंदी’ने वृत्त दिलं आहे. आजघडीला भारतातील एकही असं घर नसेल जिथे स्वयंपाघरात झुरळं दिसणार नाही. झुरळांपासून सुटका मिळवणं वाटते तितकं सोपं नाही. ज्या स्वयंपाक घरांत झुरळांची संख्या जास्त असते त्या कुटुंबातील सदस्य आजारी पडण्याचा धोका सर्वाधिक असतो. घर पुसताना रॉकेलचा वापर करावा घरातील फरशी, फर्निचर पुसताना झुरळांना हद्दपार करण्यासाठी काही प्रमाणात रॉकेलचा (Kerosene) वापर करावा. रॉकेलचा वास अत्यंत उग्र असतो. त्यामुळे झुरळ त्याच्या आसपासही येणार नाहीत. घरात जिथं पुसता येणं शक्य नाही तिथे रॉकेल शिंपडावं. फक्त असं करताना एखाद्या जागी आग लागण्याची भीती तर नाही ना? याची खात्री करून घ्यायला हवी. हेही वाचा - स्त्रियांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा धोका जास्त का? अशाप्रकारे घ्या काळजी तमालपत्राचा वापर प्रभावी ठरतो स्वयंपाकातील चव वाढवण्यासाठी बहुतांश वेळी मसाल्यांचा वापर केला जातो. पण झुरळांना मसाल्याचा गंध बिलकुलही सहन होत नाही. त्यामुळे घरात ज्या ठिकाणी झुरळं जास्त येतात, अशा ठिकाणी तमालपत्राचा वापर करायला हवा. तमालपत्राचे तुकडे करून ते एका जागी ठेवलं तर त्याच्या गंधानेच झुरळं घरात येणार नाहीत. झुरळांसाठी लवंगही परिणामकारक बहुतांश जणांना लवंगाचे फायदे चांगल्याप्रकारे माहिती आहेत. लवंगाचं सेवन करणं आरोग्याच्या दृष्टीने बरंच फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं; पण झुरळांना घालवण्यासाठीही लवंगाचा फायदा आहे. जिथे जास्त झुरळं येतात तिथे चार ते पाच लवंग ठेवले तर त्या जागी ते परत कधीच येऊ शकत नाही. ज्या घरांमध्ये अस्वच्छता अधिक असते तेथे झुरळांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे स्वयंपाकघरात वेळोवेळी स्वच्छता हा एक प्रभावी उपाय आहे. दरम्यान, सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे आधीच साथीच्या रोगाचं प्रमाण वाढलेलं असतं. त्यातच स्वयंपाकघरात फिरणाऱ्या झुरळांमुळे अन्नातून विषबाधा होण्याचा प्रकारही घडू शकतो. त्यामुळे वरील घरगुती उपाय करून झुरळांपासून मुक्तता मिळवता येऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







