मुंबई, 25 मार्च : आपल्यापैकी प्रत्येकानं असा अनुभव अनेकदा घेतला असेल की,आपण एखादी गोष्ट आणण्यासाठी किंवा काही कामासाठी म्हणून खोलीत जातो आणि तिथं गेल्यावर मात्र विसरून (Forget) जातो की आपण कशासाठी इथं आलो. काही केल्या आपल्याला ते काम आठवत नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही म्हातारे होत आहात किंवा तुमची स्मरणशक्ती (Memory) कमजोर झाली आहे. असं फक्त तुमच्याबाबातीतच होतं असंही नाही. या परिणामाला ‘डोअर वे इफेक्ट’(Doorway Effect) किंवा लोकेशन अपडेटिंग इफेक्ट(Location Updating Effect) म्हटलं जातं. ज्यात लोक एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाईपर्यंत काय काम आहे ते विसरून जातात. 2011 मध्ये नोत्रेदेम युनिव्हर्सिटीतर्फे (UNIVERSITY OF NOTRE DAME) करण्यात आलेल्या एका अभ्यासानंतर या एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाईपर्यंत काम विसरण्याच्या प्रक्रियेला ‘लोकेशन अपडेटिंग इफेक्ट’ नाव देण्यात आलं. याबाबतीत अलीकडेच बीएमसी सायकोलॉजी जर्नलमध्ये (BMC Psychology effect) प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात असं नमूद करण्यात आलं आहे की, जोपर्यंत तुमचा मेंदू कठोर परिश्रम घेत असतो तोपर्यंत अशा प्रक्रिया घडत नाहीत. प्रत्यक्षात एखाद्या खोलीतून दुसरीकडे जाण्याची कृती असो किंवा एका डेस्कटॉप विंडोवरून दुसऱ्या डेस्कटॉपवर जाण्यासारखी व्हर्च्युअल कृती असो दोन्ही क्रियांमध्ये हा विसरण्याचा परिणाम होऊ शकतो,असं या अभ्यासात म्हटलं आहे. हे वाचा - 31 मार्चपूर्वी करा हेल्थ चेकअप, अशाप्रकारे मिळेल करामध्ये सवलत चार प्रयोगांद्वारे हा अभ्यास करण्यात आला. यामध्ये सहभागी व्यक्तीचे त्याच खोलीतील किंवा आधीच्या खोलीतील वस्तू आठवण्याची क्षमता आणि चुकीचे अलार्म लावून लक्षात ठेवण्याच्या बाबतीत झालेला परिणाम नोंदवण्यात आला. पहिल्या आणि दुसऱ्या प्रयोगात आभासी वास्तवाचाही वापर करण्यात आला. या वेळी डोअरवे परिणाम होत असल्याचं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं. सहभागी लोक वस्तू विसरत होते. अनेक वस्तू लक्षात ठेवण्याचं त्यांच्या स्मरण शक्तीवरील दडपण त्यांना जास्तच विसराळू बनवत होतं. त्यांची मेंदूच्या संदेशाला प्रतिसाद देण्याची क्षमता कमी होती. परस्पराशी न जुळणाऱ्या वस्तू लक्षात ठेवताना हा परिणाम अधिक तीव्र असल्याचं स्पष्ट झालं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना होणाऱ्या हस्तक्षेपाचा स्मरणशक्तीवर अधिक परिणाम होतो असंही यातून स्पष्ट झालं. हे वाचा - अरे बापरे! खोकला झाला म्हणून डॉक्टरकडे गेली आणि छातीतून निघालं चक्क कंडोम आपल्या मनावर कामाचा अधिक ताण(Stress)असेल तर हा विसरण्याचा परिणाम तीव्र असतो. हे टाळण्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे एखाद्या खोलीत जात असताना तिथं गेल्यावर जे काम करायचं आहे त्या एकाच कामावर लक्ष केंद्रित करायचं. कदाचित याचा उपयोग होईल. मानवी मेंदूची(Brain Complex)रचना अत्यंत गुंतागुंतीची आहे,तुम्ही नेहमीच त्यावर नियंत्रण ठेवू शकाल असं नाही,हे देखील लक्षात घ्यायला हवं,असं संशोधकांनी या अभ्यासात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.