Home /News /lifestyle /

अरे बापरे! खोकला झाला म्हणून डॉक्टरकडे गेली आणि छातीतून निघालं चक्क कंडोम

अरे बापरे! खोकला झाला म्हणून डॉक्टरकडे गेली आणि छातीतून निघालं चक्क कंडोम

महिलेच्या फुफ्फुसातील कंडोम (condom in woman's lung) पाहून डॉक्टरांना धक्का बसला.

    मुंबई, 23 मार्च : एका 27 वर्षीय महिलेला सहा महिने सतत खोकला (woman cough) आणि ताप होता. भरपूर कालावधीपासून खोकला असल्याने सुरुवातीला तिला अँटिबायोटिक्स औषधं देण्यात आली. शिवाय टीबी असावा म्हणून टीबीचीही औषधं देण्यात आली. चार महिने उपचार करूनही तिच्यावर कोणत्याच औषधाचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. अखेर तिच्या छातीचा एक्स-रे काढण्यात आला तेव्हा डॉक्टरांना धक्काच बसला. टीबी झाला असावा म्हणून महिलेने चाचणी करून घेतली पण तिच्या टीबीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मग तिच्या छातीचा एक्स-रे काढण्यात आला तेव्हा छातीच्या उजव्या बाजूला सूज आल्याचं दिसलं. फुफ्फुसात काहीतरी अडकल्याचंही दिसलं. छोट्या बॅगेसारखं काहीतरी होतं. डॉक्टरांनी तिच्या छातीतील ही छोटी बॅग बाहेर काढली. ही बॅग म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर चक्क कंडोम होतं. तिच्या फुफ्फुसांमध्ये हे कंडोम अडकलं होतं. हे वाचा - बालपणापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत, प्रत्येक टप्प्यात कसा असावा महिलांचा आहार आता प्रश्न होता की फुफ्फुसात कंडोम नेमकं गेलं तरी कसं? डॉक्टरांनी मग महिलेला आणि तिच्या पतीला काही प्रश्न विचारले त्यावेळी फुफ्फुसात कंडोम कसं गेलं याचं नेमकं कारण समजलं. या महिलेच्या छातीत कंडोम गेलं ते मूख मैथुनावेळी.  महिलेनं आणि तिच्या पतीने आपण मुखमैथून केल्याचं सांगितलं. त्यावेळी कंडोम सैल झाला होता, तसंच तेव्हा महिलेला शिंकही आली होती आणि खोकलाही आला होता. आता कदाचित तिने कंडोम गिळल्याचं तिला माहिती असावं पण लाजेमुळे त्यांनी कोणाला याबाबत सांगितलं नसावं किंवा महिलेने हे कंडोम नकळतही गिळलं असावं, असं डॉक्टर म्हणाले. हे वाचा - मी डायबेटिक, ब्लड प्रेशर, हार्ट पेशंट रुग्ण आहे; मला कोरोना लस घेता येईल का? अजूनही या महिलेच्या छातीत कंडोमचे छोटे तुकडे असल्याचं सांगितलं आहे. आता जो कंडोमचा भाग सापडला तो फाटलेल्या स्थितीत होता. त्यामुळे आता त्याचे फुफ्फुसातील इतर भाग काढण्यासाठी महिलेची पुढे ब्रोन्कोस्कोपी केली जाणार आहे. नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसीनमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle, Sexual health

    पुढील बातम्या