नवी दिल्ली, 25 मार्च: कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीच्या काळात प्रत्येकच जण आरोग्याबद्दल जागरूक झाला आहे. त्यामुळे थोडसं आजारी पडल्यानंतरही अनेकजणं डॉक्टरांकडे जातात. या काळात जरी सगळीकडे चिंतेचं वातावरण असलं तरीही काही सवलती पण मिळत आहेत. तुम्ही जर 31 मार्च 2021 पर्यंत आपलं किंवा आपल्या कुटुंबाचं हेल्थ चेकअप (family checkup)करून घेतलं तर तुम्हाला या सवलतींचा लाभ मिळू शकतो. सध्या अनेक हॉस्पिटल्सनी इम्युनिटी पॅकेज (immunity package) तसंच महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळी पॅकेज डिझाइन केली आहेत. तुम्ही जर या तपासण्या केल्यात तर तुमची इम्युनिटी कशी आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला इन्कम टॅक्समध्येही बेनिफिट (Tax benefit) मिळू शकतो.
इन्कम टॅक्स कायद्याच्या सेक्शन 80 डी (Income tax section 80D)
या अतंर्गत मेडिकल इन्शुरन्सवर दिल्या जाणाऱ्या प्रीमियमवर टॅक्स वाचवला जाऊ शकतो. जर तुम्ही स्वत:साठी, जोडीदारासाठी किंवा मुलांसाठी प्रीमियम भरत असाल तर तुम्हाला 25 हजार रुपयांपर्यंत करसवलत मिळू शकते. त्याचबरोबर जर तुम्ही तुमच्या 60 वर्षांहून अधिक वय असलेल्या आईवडिलांसाठी इन्शुरन्स प्रीमियमची रक्कम भरत असाल तर तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंतची करसवलत मिळू शकते.जर तुमची आई आणि वडील दोघंही ज्येष्ठ नागरिक असतील तर एका आर्थिक वर्षामध्ये जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंत करात सवलत मिळवण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाकडे अर्ज करता येतो.
(हे वाचा-एप्रिलमध्ये 17 दिवस सुरू असणार बँका, मार्चचा शेवटचा आठवडाही सुट्ट्यांचा)
रोख रक्कम भरल्यास नाही मिळणार सवलत
ही सवलत उपलब्ध आहे पण सगळ्यात महत्त्वाची बाब ही लक्षात घ्यायला हवी की तुम्ही यापैकी कोणतीही पॉलिसी रोख खरेदी करत असाल तर तुम्हाला या करसवलतीचा फायदा घेता येणार नाही. या सवलतीचा फायदा तुम्हाला तेव्हाच घेताल येईल जेव्हा तुम्ही चेक (Cheque), नेट बँकिंग (Net Banking) किंवा इतर डिजिटल पर्यायांचा वापर प्रीमियम भरायला कराल. तसंच हेल्थ चेकअपची रक्कम भरण्यासाठी रोख पाच हजार रुपये भरत असल्यास कर सवलत मिळू शकते. तरीही तुम्हाला जर हेल्थ चेकअपसाठी पैसे खर्च करायचे नसतील तर अनेक विमा कंपन्या दर तीन ते चार वर्षांनी एकदा मोफत हेल्थ चेकअप करण्याचा पर्याय उपलब्ध करून देत असतात. त्यासाठी अट एवढीच असते की विमा पॉलिसीवर कुठलाही दावा केलेला नसावा. तसं असेल तर तुम्ही मोफत संपूर्ण बॉडी चेक-अप करून घेऊ शकता.
(हे वाचा-31 मार्चपूर्वी पूर्ण करा ‘ही’ महत्त्वाची कामं; अन्यथा बसेल मोठा फटका)
विमा कंपन्यापण करतात टेस्ट
मेडिकल टेस्टबद्दल (Medical Tests) बोलायचं झालं तर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी देण्याआधी विमा कंपनी पॉलिसी घेणाऱ्याचं मेडिकल चेक-अप करून घेत असते. जेव्हा पॉलिसी घेणाऱ्याचं वय 45 वर्षांहून अधिक असतं तेव्हा तर मेडिकल चेकअप केला जातोच. जर विम्याची रक्कम मोठी असेल तर 45 वर्षांच्या व्यक्तीचंही चेकअप केलं जाऊ शकतं. तुम्ही तुमचा मेडिकल रिपोर्ट विमा कंपनीकडे मागू शकता तसं विमा कंपनीही पॉलिसीधारकाला त्याचा रिपोर्ट पाठवतच असते. अशा पद्धतीने तुम्ही हेल्थ चेकअप करून तुमचा कर वाचवू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Insurance