मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /काही केल्या चहा सुटेना! चहाचं व्यसन सोडण्यासाठी 'या' 3 गोष्टी करून पाहा

काही केल्या चहा सुटेना! चहाचं व्यसन सोडण्यासाठी 'या' 3 गोष्टी करून पाहा

चहा जेवढा चांगला तेवढाच तो वाईटही. त्यामुळे चहा प्यावा मात्र तो मर्यादित.

नवी दिल्ली, 25 जून : चहा (Tea)हे भारतीयांचे सर्वात लोकप्रिय पेय आहे. भारतात अनेक चहाप्रेमी (Tea lover)सहज मिळतील. 'चहाला वेळ नसली तरी चालेल पण वेळेला मात्र चहा हवाच', असंच काहीसं चहाप्रेमींचं असतं (Tea addiction). दिवसाची सुरुवात चहापासून केली जाते. त्यानंतर दिवसभरात अनेक वेळा चहा पिणारे लोक सापडतील. मात्र चहा जेवढा चांगला तेवढाच तो वाईटही. त्यामुळे चहा प्यावा मात्र तो मर्यादित. चहामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असल्याने ते रक्तदाब वाढवू शकते. इतकंच नाही तर रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास अपचनाच्या तक्रारीही वाढू शकतात.

चहाची तलप असणाऱ्या व्यक्तींसाठी तर चहा सोडलाही जात नाही मात्र प्यायल्याने त्रास होतो. त्यामुळे चहाचे व्यसन (tea addict) असणाऱ्यासांठी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

हेही वाचा - कोलेस्ट्रॉल-ब्लॉकेज होण्यापूर्वीच समजून घ्या सॅच्युरेटेड फॅट कशात असतात; निरोगी राहाल

चहाचं प्रमाण कमी करा -  चहा सोडायचा असेल तर रोजचा चहा कमी करा. चहाचा घोट घ्या आणि त्याऐवजी तुम्ही काहीतरी खाऊ किंवा पिऊ शकता, यामुळे तुम्हाला चहा लवकर सोडण्यास मदत होईल.

चहा ऐवजी ज्यूस घ्या - चहाऐवजी फळांचा रस प्यावा (Fruit juice), अनेकांना जेवणानंतर चहा प्यायला आवडते, परंतु त्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे चहा सोडून द्यावा लागतो. त्यामुळे जेवनानंतर फळांचा हेल्थी रस प्या. जेणेकरुन शरिराला त्रासही होणार नाही आणि जेवनानंतर काहीतरी पिलंही जाईल.

हेही वाचा - Diabetes Tips : तुमच्या आहारात समाविष्ट करा मेथीची भाजी, Blood sugar राहते नियंत्रित

हर्बल चहा - चहाप्रेमींना चहाच्या अति सेवनामुळे चहा सोडून देण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. त्रास होतोय माहिती असूनही अनेकांना चहा सोडवला जात नाही. जर तुम्हाला तो सोडायचा नसेल तर तुम्ही त्याऐवजी हर्बल चहाचे (herbal tea)सेवन करू शकता. जे तुमच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे, कारण त्यात कॅफिनचे प्रमाण जास्त नसते.

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips, Tea, Tea drinker