Home /News /lifestyle /

Diabetes Tips : तुमच्या आहारात समाविष्ट करा मेथीची भाजी, Blood sugar राहते नियंत्रित

Diabetes Tips : तुमच्या आहारात समाविष्ट करा मेथीची भाजी, Blood sugar राहते नियंत्रित

हिरव्या पालेभाज्या आपल्याला वेगवेगळ्या आजारांसाठी खूप उपयुक्त ठरतात. मेथीची भाजीही (Fenugreek Leaves) त्यातलीच एक. तुम्हाला माहित आहे का की मेथीच्या दाण्यांप्रमाणेच मेथीची भाजीचाही वापर आपण औषध म्हणून करू शकतो.

  मुंबई, 25 जून : पौष्टिक आहारातून आपल्याला अनेक आजारांशी लढण्याची शक्ती मिळत असते. मात्र यासाठी आपला आहार पौष्टिक आणि संतुलित असणं गरजेचं असतं. हिरव्या पालेभाज्या खाणे सर्वानाच आवडतं असे नाही. मात्र या हिरव्या पालेभाज्या आपल्याला वेगवेगळ्या आजारांसाठी खूप उपयुक्त ठरतात. मेथीची भाजीही (Fenugreek Leaves) त्यातलीच एक. मेथीची पालेभाजी आपण कधी भाजी म्हणून खातो तर कधी त्याचे पराठे बनवून खातो. मात्र तुम्हाला माहित आहे का की मेथीच्या दाण्यांप्रमाणेच मेथीची भाजीही (Fenugreek Leaves Benefits) तितकीच फायदेशीर असते आणि तिचाही वापर आपण औषध म्हणून करू शकतो. मेथीच्या भाजीचे सेवन मधुमेह (Fenugreek Leaves For Diabetes) आणि हृदयासह इतर अनेक आजारांमध्ये खूप फायदेशीर आहे. यामध्ये लोह, सेलेनियम, कॅल्शियम, मॅंगनीज, मिनरल्स आणि झिंक सारखे पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. आज आम्ही तुम्हाला मेथीची भाजी कोणत्या रोगांवर फायदेशीर आहे याबद्दल माहिती देणार आहोत. हिरवी मेथीची पालेभाजी टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहामध्ये साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. याच्या सेवनाने रक्ताभिसरणही सामान्य राहते. मेथीची भाजी चांगले कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवण्यास आणि शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. उच्च रक्तदाबावरही (Fenugreek Leaves For High Blood Pressure) मेथीच्या पानांचा फायदा होतो. गॅलेक्टोमनन आणि पोटॅशियमची उपस्थिती ब्लड सर्क्युलेशन नियंत्रित करते.

  Ginger Benefits: कॅन्सरसह अनेक घातक आजारांवर 'आलं' फायदेशीर; असं करा सेवन

  मेथीच्या पानांमध्ये असलेले फायबर पचनक्रिया (Strong Metabolism) सुरळीत ठेवते. मेथीच्या पानांचे सेवन केल्याने अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटात अल्सर आणि आतड्यांसंबंधी जळजळ होण्याची समस्या देखील कमी होते. मेथीची पाने वजन कमी करण्यासही मदत करतात. रोज एक चमचा मेथीच्या पानांचा रस घेतल्याने पोटातील जंत नाहीसे होतात.

  किडनी इन्फेक्शन रोखायचंय? हे 5 सोपे घरगुती उपाय ठरतील उपयुक्त

  मेथीच्या पानांचे सेवन केल्याने शरीरातील जळजळदेखील कमी होते. त्यामुळे खोकला, ब्राँकायटिस, एक्जिमा यांसारख्या आजारांशी लढण्यास मदत होते. मेथीची पाने पुरुषांसाठीही खूप फायदेशीर असतात. यांच्या सेवनाने पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनचे (Fenugreek Leaves Helps To Increase Testosterones) उत्पादन वाढते. त्याचबरोबर नवीन आई झालेल्या महिलांनी मेथीची पाने खाल्ल्यास दूध तयार होण्यास मदत होते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Tips for diabetes

  पुढील बातम्या