मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Perfect Tea चं 'गणित'! 'या' फॉर्म्युल्याने चहा बनवाल तर कधीच बिघडणार नाही

Perfect Tea चं 'गणित'! 'या' फॉर्म्युल्याने चहा बनवाल तर कधीच बिघडणार नाही

हा टी फॉर्म्युला शिकणारी व्यक्ती प्रत्येक वेळी अगदी उत्तम चहा बनवू शकेल, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

हा टी फॉर्म्युला शिकणारी व्यक्ती प्रत्येक वेळी अगदी उत्तम चहा बनवू शकेल, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

हा टी फॉर्म्युला शिकणारी व्यक्ती प्रत्येक वेळी अगदी उत्तम चहा बनवू शकेल, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

  मुंबई, 04 सप्टेंबर : एखाद्या चहाप्रेमीला फक्कड असा (Tea lovers) चहा (Tea) हा अमृतापेक्षाही जास्त प्रिय असतो. आजकाल बाजारात चाहाच्या बऱ्याच व्हरायटी (Varieties of Tea) आहेत. काही जणांना तर एका विशिष्ट व्यक्तीच्याच हातचा चहा प्यायला आवडतो. कोणाला आईच्या हातचा चहा आवडतो, कोणाला बायकोच्या हातचा, कोणाला आपल्या नवऱ्याच्या हातचा चहा आवडतो तर कोणाला स्वतःच्याच हातचा (How to make tea) चहा आवडतो. कारण साधा चहा बनवणं हीसुद्धा एक कला आहे. सर्वांनाच परफेक्ट चहा (Make perfect tea) बनवता येतो असं नाही. पण आता तज्ज्ञांनी चहासाठी एक सॉलिड गणिती फॉर्म्युला तयार केला आहे. यामध्ये त्यांनी चहापत्ती, साखर, पाणी या सगळ्याचं एकदम ठराविक असं प्रमाण सांगितलं आहे.

  ब्रिटनमधील इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिक्स (Institute of Mathematics) या ठिकाणी असणाऱ्या संशोधकांनी चहाचा परफेक्ट फॉर्म्युला (Maths formula for perfect tea) तयार केल्याचा दावा केला आहे. त्यांचं म्हणणं आहे, की हा फॉर्म्युला आत्मसात करणारी कोणतीही व्यक्ती प्रत्येकवेळी अगदी उत्तम चहा बनवू शकेल. ‘दी मिरर’ने ब्रिटनच्या वैज्ञानिकांचा (Britain scientists tea formula) हा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. या फॉर्म्युलामध्ये चहामध्ये दूध कधी टाकावं, साखर कधी आणि किती टाकावी अशा छोट्या छोट्या गोष्टीही गणिताच्या (Maths formula tea) माध्यमातून सांगितल्या आहेत. संशोधकांनी दिलेला हा फॉर्म्युलाही एखाद्या गणिताप्रमाणेच दिसतो.

  हे वाचा - आवडतं म्हणून भरपूर वेळ Bathing नको; 'या' वेळेतच आटोपा अंघोळ नाहीतर...

  J = — D ▽ ρ + ρ v असा विचित्र दिसणारा हा फॉर्म्युला उत्तम चहासाठी तयार करण्यात आला आहे. यातील D चा अर्थ डिफ्यूजन असा होतो. तर, ρ v म्हणजे चहा ढवळण्याची कला. एकंदरीत या फॉर्म्युलामधून त्यांना म्हणायचं आहे, की चहाला तुम्ही जेवढं जास्त ढवळाल, तेवढाच तो जास्त परफेक्ट बनेल. एवढंच नाही, तर चहाचं योग्य तापमान (Mathematical formula for tea) काय असावं हेदेखील या संशोधकांनी मॅथ्स फॉर्म्युलाच्या मदतीने सांगितले आहे. चहाच्या कपाचा आकार, चहा बनवण्यासाठी वापरत असलेल्या पाण्याचे तापमान आणि न्यूटनच्या लॉ ऑफ कूलिंगचा (Law of cooling) वापर करुन हा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. T(t) = T1 + Ae-ct असा हा फॉर्म्युला आहे. तुम्ही जर गणित शिकला असाल, तर तुम्हाला हे समीकरण नक्कीच सोडवता येईल.

  हे वाचा - नाश्त्यानंतर किती वेळाने जेवावं? वेळेत जेवला नाहीत तर होतील गंभीर परिणाम

  एकंदरीत, जी व्यक्ती गणितामध्ये एक्सपर्ट आहे, ती या फॉर्म्युलाच्या (Make tea with maths formula) मदतीने अवघ्या काही मिनिटांमध्येच चहा बनवण्यात एक्सपर्ट होऊ शकते, तसेच तुम्ही जर गणितात एक्सपर्ट नसाल, तर आजच शिकायला सुरू करा, म्हणजे मग गणित (Formula of perfect tea) आणि फक्कड चहा दोन्हीही एकत्रच शिकता येईल. सध्या मात्र या संशोधकांनी दिलेले हे इक्वेशन्स सोडवण्यासाठी सोशल मीडियावरील गणिततज्ज्ञांमध्ये स्पर्धा लागली आहे.

  First published:

  Tags: Lifestyle, Tea, Tea drinker