मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /आवडतं म्हणून भरपूर वेळ Bathing नको; 'या' वेळेतच आटोपा अंघोळ नाहीतर...

आवडतं म्हणून भरपूर वेळ Bathing नको; 'या' वेळेतच आटोपा अंघोळ नाहीतर...

अंघोळ करण्याचीसुद्धा एक विशिष्ट वेळ असते.

अंघोळ करण्याचीसुद्धा एक विशिष्ट वेळ असते.

अंघोळ करण्याचीसुद्धा एक विशिष्ट वेळ असते.

  मुंबई, 03 सप्टेंबर : अंघोळीनं (Bath) शरीर आणि मन ताजंतवानं होतं. प्रत्येकाच्या अंघोळीच्या (Bathing) सवयी वेगवेगळ्या असतात (Correct Way of Bathing). बहुतांश लोक सकाळीच अंघोळ करतात पण काही सकाळशिवाय रात्रीही अंघोळ करण्याची सवय असते. कोणी अति गरम पाण्याने आंघोळ करतं तर कोणी थंड पाण्यानी आंघोळ करतं (Bathing Time). काहीजण अगदी काही वेळात अंघोळ आटोपतात तर काही जणांना अंघोळीसाठी खूप वेळ लागतो. पण तुम्हाला माहिती आहे का? अंघोळ करण्याचीही एक विशिष्ट वेळ असते. आयुर्वेदानुसार योग्य वेळेत अंघोळ न केल्याने त्याचे दुष्परिणाम होऊ शकता.

  आयुर्वेदानुसार, 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ आंघोळ करणं आरोग्याला हानिकारक ठरू शकतं. कारण, जितका जास्त वेळ तुम्ही वाहत्या पाण्याखाली रहाल तितके तुमच्या त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते. त्यामुळे दहा मिनिटात आंघोळ करावी.

  झी न्यूजच्या रिपोर्टनुसार आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. रेखा यांनी अंघोळीच्या योग्य पद्धतीबाबत मार्गदर्शन केलं आहे.  अंघोळ करण्यापूर्वी प्रत्येकाने किमान 10 मिनिटं अभ्यंग (Abhyanga) म्हणजे डोक्याला तेल मालिश (Hair Massage with Oil) करणं आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार बारीक लोकांनी म्हणजेच वात प्रकृती असलेल्या लोकांनी माशाचं तेल लावावं, पित्त प्रकृतीच्या लोकांनी क्षीरबला तेल लावावं. कफ प्रकृतीच्या लोकांनी तेलानं मालिश करू नये. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी तिळाचं तेल चांगलं आहे.

  हे वाचा - नाश्त्यानंतर किती वेळाने जेवावं? वेळेत जेवला नाहीत तर होतील गंभीर परिणाम

  तसंच अगदी थंड (Cold) किंवा अती गरम (Hot) पाण्यापेक्षा कोमट पाणी वापरणं अधिक फायदेशीर आहे. खूप गरम किंवा थंड पाण्याने आंघोळ केल्यानं त्वचा कोरडी होऊ शकते. गरम किंवा थंड पाण्याने आपल्या त्वचेतील नैसर्गिक तेल (Natural Oil) कमी होते.

  आंघोळीसाठी सौम्य शॉवर जेल (Shower Gel) किंवा नैसर्गिक साबण वापरावा. नैसर्गिक साबणाऐवजी त्रिफळा पावडर, बेल पावडर आणि डाळीचे पीठ एकत्र करून लावणंही अधिक लाभदायी ठरेल. यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल टिकून राहण्यास मदत होईल.

  त्याचप्रमाणे शॉवरऐवजी (Shower) बादलीने (Bucket) अंघोळ करणं अधिक योग्य आहे. कारण यामुळे डोक्यापासून पायापर्यंत हळूहळू पाणी जातं. शॉवरच्या वेगवान प्रवाहाच्या तुलनेत तांब्याने बादलीतील पाणी हळूहळू अंगावर ओतल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल टिकवून ठेवले जाते.

  हे वाचा - भारतात 'या' गोष्टीला 'काडी'चीही किंमत नाही; पण अमेरिकेत तब्बल 1800 आहे किंमत

  रोज आंघोळीनंतर ओल्या त्वचेवर तिळाचं तेल (Seasame Oil) लावावं आणि नंतर त्वचा मऊ टॉवेलने पुसावी. यामुळे आपली त्वचा तुकतुकीत आणि मऊ राहिल. असा सल्ला डॉ. रेखा यांनी दिला आहे.

  First published:

  Tags: Bathroom, Health, Health Tips, Lifestyle