मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

नाश्त्यानंतर किती वेळाने जेवावं? वेळेत जेवला नाहीत तर होतील गंभीर परिणाम

नाश्त्यानंतर किती वेळाने जेवावं? वेळेत जेवला नाहीत तर होतील गंभीर परिणाम

रात्री उपाशी पोटी झोपण्याने मिळतं आजारांना निमंत्रण

रात्री उपाशी पोटी झोपण्याने मिळतं आजारांना निमंत्रण

Breakfast आणि दुपारचं जेवण यात किती अंतर असावं? जेवणाची ideal वेळ काय असावी? तज्ज्ञांनी (Diet Guide) सांगितलेलं ऐका. जेवायची वेळ चुकली तर होतात गंभीर परिणाम

नवी दिल्ली, 4 सप्टेंबर: डॉक्टरांनी आपल्याला कित्येक वेळा सांगितलेलं असतं, की जेवण हे वेळच्या वेळी (Food habits for healthy life) केलं पाहिजे. मात्र, कित्येक लोक याकडे दुर्लक्ष करतात. कधी कामाच्या व्यापात जेवणाची वेळ चुकते, तर कधी अवेळी दुसरं काहीतरी खाल्ल्यामुळे जेवण उशिरा (Lunch time) केलं जातं. मात्र आहारतज्ज्ञांच्या मते, कितीही काम असेल, तरी जेवणाची वेळ चुकवणं टाळायला हवं. अन्यथा याचा तुमच्या आरोग्यावर (effects of eating late) गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

कित्येक वेळा आपण हेवी ब्रेकफास्ट (Heavy breakfast) केलेला असतो. भारतीय नाश्त्याचे पदार्थ हे बऱ्यापैकी हेवीच असतात. अशा वेळी दुपारी लवकर भूक लागत नाही. तेव्हा मात्र खरोखरच तुम्ही जेवण करणं (breakfast and dinner gap) टाळायला हवं. उगाच भूक नसली, तरी वेळ झाली म्हणून जबरदस्ती खाणंही बरं नाही. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही सकाळी आठच्या (ideal time for breakfast) दरम्यान नाश्ता केला असेल, तर दुपारी एकच्या सुमारास जेवण करावं. हेवी ब्रेकफास्ट केला असेल, तर दुपारी दोनच्या सुमारास जेवण (ideal time for lunch) करुन घ्यावं. तसंच, ब्रेकफास्ट अगदीच हलका असेल, तर दुपारी बारा वाजेच्या सुमारासही भूक लागल्यास तुम्ही जेवण करू शकता. म्हणजेच, सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण यामध्ये सुमारे चार ते पाच तासांचं अंतर असायला हवं.

स्वयंपाक करताना ही चूक केली तर ताजं शिजवलेलं खाऊनही काहीच फायदा होणार नाही

एकदा खाण्याच्या वेळा ठरल्या, की त्याच पुढे पाळाव्यात. दोन वेळेच्या खाण्यामध्ये तीन ते पाच तासांचं अंतर ठेवणं गरजेचं आहे. यामुळे एका वेळेच्या खाण्याला पचण्यासाठी पूर्ण वेळ मिळतो. तुम्ही किती वेळा खात आहात, याचा थेट संबंध तुमच्या वजनाशी (Food timing for weight loss) आणि हृदयाशी आहे. मधुमेह असणाऱ्यांनी (Food timing for better health) तर खाण्याच्या वेळा आजिबातच चुकवू नयेत. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी-जास्त होत राहते.

उपाशीपोटी चुकूनही करू नका ही 6 कामं; आरोग्यावर होईल वाईट परिणाम

एखाद्या वेळी जेवण स्किप (Is skipping lunch healthy) करुन, नंतर एकदमच भरपूर खाणं असा प्रकारही कितीतरी लोक करतात. मात्र, असं करणं तुमच्या शरीराला अपायकारक आहे. एकदमच भरपूर खाल्ल्यामुळे आपला कॅलरी इनटेक मोठ्या प्रमाणात होतो. त्यातच रात्रीच्या जेवणावेळी (ideal time for dinner) भरपूर खाणं अजूनही घातक ठरतं, कारण त्या हेवी मील नंतर तुम्ही थेट झोपायला जाता. त्यामुळे शरीराची आवश्यक तेवढी हालचाल न झाल्याने, ते अन्न पचण्यास अडचण येते. यामुळे कित्येक विकारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे रात्रीचा आहार हलका घ्यावा असंही तज्ज्ञ सांगतात. यानुसार तुम्ही व्यवस्थित आहार घेतलात तर तुमचं आरोग्य उत्तम राहील.

First published:

Tags: Health, Lifestyle