नवी दिल्ली, 28 जुलै : वाढत्या उष्णतेचा (Heat) परिणाम आपल्या त्वचेवर (Effect On Skin) होतो. उन्हामुळे वांगाचे काळे डाग, डार्क सर्कल, टॅनिंग वाढतं आणि त्यामुळे चेहरा निस्तेज वाटायला लागतो. चेहऱ्याच्या काही समस्या (Skin Problem) असतील तर, सारखं लक्ष तिकडेच जातं. त्यामुळे आत्मविश्वास (Confidence) कमी होतो. चेहऱ्यावर आलेले डाग किंवा पिग्मीटेशनचे (Pigmentation) डाग लवकर जात नाहीत. त्यामुळे आपण कितीही ब्युटी प्रॉडक्ट (Beauty Product) लावले तरी त्यांचा परिणाम (Effect) चांगला होतोच असं नाही. चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी अनेक होम रेमेडी (Home Remedies) केल्या असतील तरीदेखील हे सोपे उपाय करून पहा. यामुळे त्वचा तजेलदार दिसायला लागेल. आपल्या किचनमध्ये सहजपणे मिळणारा बटाटा हा त्वचेच्या समस्यांसाठी (Skin Problem) उत्तम उपाय ठरू शकतो. बटाट्याचा वापर करून पिंपल्स, टॅनिंग आणि सुरकुत्या कमी करता येतात. चेहऱ्याची स्किन हेल्दी (Healthy Skin) बनवायची असेल तर या प्रकारे बटाटा वापरून बघा. ( दिवसभरात बदलावे लागतात 100 डायपर्स, 9 बाळांच्या आईचा संघर्ष ) बटाट्याचा वापर पिग्मींटेशन डार्क सर्कल आणि टॅनिंग झाले असेल तर बटाट्याचा वापर करून कमी करता येतं. बटाट्याच्या फेस पॅकमुळे (Face Pack) चेहरा चमकदार बनतो, बटाट्याचा किस वापरून स्क्रबिंग करता येतं. दररोज बटाट्याच्या किसने स्क्रबिंग केल्यानंतर चेहऱ्यावर दूध लावावं. या वापराने हळूहळू त्वचेवरचे डाग कमी होऊन स्किन चमकदार होईल. ( कोरोना रुग्णांनो हलगर्जीपणा नको! 2 लक्षणांकडे दुर्लक्ष बेतेल जीवावर ) नारळ पाणी नारळाचं पाणी डार्क सर्कल कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यामध्ये 1 चमचा हळद मिसळा व्यवस्थित एकत्र करून आईस ट्रेमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवा. दररोज 1 तुकडा आपल्या चेहऱ्यावर लावा 10 मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. यामधील कॅरोटीनमुळे त्वचा सुंदर होईल. ( Google वर या 5 गोष्टी सर्वाधिक सर्च करतात पुरुष; रिसर्चमधून हैराण करणारा खुलासा ) हळद आणि साय हळदीचे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. हळद अत्यंत आरोग्यदायक आहे. शरीराबरोबरच त्वचेसाठी हळद उपयुक्त आहे. हळदीचा वापर करून चेहऱ्याच्या समस्या कमी करता येतात. 1 चिमूट हळद, 1 चमचा साय आणि पाव चमचा गुलाब पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपले हात आणि चेहऱ्यावरती व्यवस्थित लावा. 20 मिनिटानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. त्याच्या नियमित वापरामुळे त्वचेवरचे डाग कमी होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.