मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोना रुग्णांनो हलगर्जीपणा नको! 2 लक्षणांकडे दुर्लक्ष बेतेल जीवावर

कोरोना रुग्णांनो हलगर्जीपणा नको! 2 लक्षणांकडे दुर्लक्ष बेतेल जीवावर

काही गंभीर लक्षणं अशी असतात, जी वेळेत ओळखली गेली, तरच रुग्णाचा जीव वाचवणं, परिस्थिती नियंत्रणात आणणं सोपं होऊ शकतं.

काही गंभीर लक्षणं अशी असतात, जी वेळेत ओळखली गेली, तरच रुग्णाचा जीव वाचवणं, परिस्थिती नियंत्रणात आणणं सोपं होऊ शकतं.

काही गंभीर लक्षणं अशी असतात, जी वेळेत ओळखली गेली, तरच रुग्णाचा जीव वाचवणं, परिस्थिती नियंत्रणात आणणं सोपं होऊ शकतं.

    मुंबई, 28 जुलै : कोरोना विषाणूचा (Corona Infection) संसर्ग झाल्यानंतर बाधित व्यक्तीला अनेक लक्षणं (Corona symptoms) जाणवतात. चव आणि वास न येणं, दमल्यासारखं वाटणं, ताप, थंडी वाजणं, अॅसिडिटी किंवा गॅस होणं, घशात खवखवणं अशा लक्षणांचा (Symptoms of Corona)  त्यात समावेश असतो. काही गंभीर लक्षणं अशी असतात, की जी वेळेत ओळखली गेली, तरच रुग्णाचा जीव वाचवणं, परिस्थिती नियंत्रणात आणणं सोपं होऊ शकतं. खासकरून घरी उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या बाबतीत हे अधिक महत्त्वाचं ठरतं आणि अशा दोन लक्षणांकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका, असा सल्ला देण्यात आला आहे.

    कोविड-19चा संसर्ग झालेल्या बऱ्याच जणांना सुरुवातीला सौम्य लक्षणं दिसतात. मात्र शरीरातला संसर्ग वाढत गेला तर आजाराचं रूप गंभीर होऊ शकतं आणि रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागू शकतं. कोरोना रुग्णांची प्रकृती कधी गंभीर/अत्यवस्थ होऊ शकते, याची दोन लक्षणं (2 Major Symptoms) अमेरिकेत झालेल्या अभ्यासातून पुढे आली आहेत. पहिलं लक्षण म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणं (Short of Breath) आणि त्यानंतर सातत्याने छातीत (Chest Pain) दुखणं, ही ती दोन लक्षणं आहेत. कोरोनाबाधित झालेल्या रुग्णाची प्रकृती गंभीर रूप धारण करत असल्याची ही दोन लक्षणं आहेत. या दोन लक्षणांकडे वेळीच लक्ष दिलं आणि त्यावर योग्य ते उपचार केले, तर कोरोना रुग्णांचे प्राण वाचू शकतात.

    हे वाचा - महत्त्वाची बातमी: कोरोनापासून बचावासाठी Covishield लस किती प्रभावशाली?

    एन्फ्लुएंझा अँड अदर रेस्पिरेटरी व्हायरसेस जर्नलमध्ये (Enfluenza & Other Respiratory Viruses Journal) या नव्या अभ्यासाबद्दलचा लेख प्रसिद्ध झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ही दोन लक्षणं दिसली, तर आजाराचं स्वरूप घातक असल्याचं समजावं, असं त्यात म्हटलं आहे. श्वासोच्छ्वासाला त्रास होत असला, तर त्याचा वेग कमी होतो. त्यामुळे पर्यायाने रक्तातली ऑक्सिजनची पातळीही (Blood Oxygen Level) कमी होते. योग्य वेळी लक्ष दिलं गेलं नाही, तर ही दोन्हीही लक्षणं घातक ठरू शकतात.

    खासकरून ज्या कोरोनाबाधितांवर घरीच उपचार सुरू आहेत, त्यांनी अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. छातीत सतत दुखत असेल, तर याचा अर्थ असा, की विषाणूचा संसर्ग फुप्फुसांत (Lungs) पोहोचला आहे. वयोवृद्ध व्यक्ती आणि लठ्ठ व्यक्तींना असा त्रास जास्त प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे त्याकडे लक्ष देणं अत्यावश्यक आहे, असं त्या अभ्यासात म्हटलं आहे.

    हे वाचा - सावध व्हा! ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट निश्चित, हे आकडे देताहेत संकेत

    तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोविड-19मध्ये (Covid-19) सायकोटाइन हॅपी हायपॉक्सिया (Happy Hypoxia) यामुळेही कमी कालावधीत रुग्णांची परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे संसर्ग झाल्याची शंका आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच काळजी घेणं, लक्षणांवर आणि त्यातल्या बदलांवर बारकाईने लक्ष ठेवणं अत्यावश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

    First published:

    Tags: Corona, Corona patient, Coronavirus, Coronavirus symptoms, Covid-19, Symptoms of coronavirus