• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Health Tips : मूड खराब झाला आहे तर खा 'ही' फळं; वाटेल ताजेतवाने

Health Tips : मूड खराब झाला आहे तर खा 'ही' फळं; वाटेल ताजेतवाने

आपल्याला आपल्या आयुष्यात दररोजच्या घडणाऱ्या काही गोष्टींमुळे वाईट वाटते. त्यामुळे आपण आपला मूड खराब (Bad mood) करून बसतो. त्यातून स्वभावातील चिडचिडपणा आणि राग येतो. अशावेळी आपल्याला खराब मूडमुळे काहीच करू वाटत नाही.

 • Share this:
  दिल्ली, 20 सप्टेंबर : आपल्याला आपल्या आयुष्यात दररोजच्या घडणाऱ्या काही गोष्टींमुळे वाईट वाटते. त्यामुळे आपण आपला मूड खराब (Bad mood) करून बसतो. त्यातून स्वभावातील चिडचिडपणा आणि राग येतो. अशावेळी आपल्याला खराब मूडमुळे काहीच करू वाटत नाही. त्यामुळे तो वेळ वाया जातो. त्यामुळे आता अशा पद्धतीने आपल्या आयुष्यातील खराब होणाऱ्या मूडला आणि त्या वेळेला चांगलं बनवण्यासाठी आपल्याला त्या वेळी काही तरी कृती करण्याची गरज असते. त्यातून आपल्याला चांगलं वाटावं हा हेतू असतो. त्यामुळे आपल्याला खराब झालेल्या मूडच्या वेळी काय करायला हवं आणि काय खायला हवं याविषयी आपण काही माहिती जाणून घेऊयात. आपल्या चांगल्या स्वभावासाठी आपला आहार हा महत्वाची भूमिका बजावत असतो. जर सकाळी तुमचा आहार योग्य प्रकारे झाला असेल तर येणारा दिवस हा ऊर्जावान (Energised) पद्धतीने जातो. त्यामुळे सकाळचा नाष्टा आणि जेवन हे योग्य पद्धतीने आणि हेल्दी होणे फार गरजेचे असते. त्यातून आपला खराब झालेला मूडही चांगला होण्याची शक्यता असते. इंडियन एक्सप्रेस या वेबसाईटने दिलेल्या रिपोर्टनुसार जसलोक हॉस्पिटल अॅंड रिसर्च सेंटरच्या डाएटेशियन (Dietitian) डॉ. ज्योति भट्ट यांच्या मते, आपण कितीही रागात असोत परंतु जेव्हा आपल्यासमोर आपल्या आवडीचे पदार्था खायला येतात, तेव्हा आपला राग हा काही क्षणांसाठी गायब होत असतो. त्यामुळे आपला मूड ठिक करण्यात आहाराची मोठी भूमिका असते. बापरे! लस घेताना तुटली सुई, तरुणाचा हात आणि पाय झाला जायबंदी आपल्या दररोज मिळणाऱ्या आहारात फार फार तर अन्नपदार्थ असतात, परंतु आपल्याला कोको (Cocoa) म्हणजे डार्क चॉकलेट खाणे फार आवडत असेल तर तुमचा मूड हा काही क्षणांतच ठिक होऊ शकतो. कारण त्यात  बीन्स ट्रिप्टोफॅंन (tryptophan) असतात, ज्यामुळे आपल्या मेंदूद्वारे सेरोटोनिनच्या (Serotonin) माध्यमातून न्यूरोट्रांसमीटरचे प्रमाण वाढवले जाते. ज्यामुळे आपले मूड हे स्थिर राहते. मानसिक तणावामुळे कमी होतोय चेहऱ्यावरचा 'Glow'? घ्या अशी काळजी त्याचबरोबर आपल्याला ग्रिन टी हा ही एक मूड ठिक करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. त्यामुळे आपल्याला फ्रेश वाटते. संध्याकाळच्या वेळी आपण आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करायला हवा, कारण त्यात बी-विटामिन फोलेटचे प्रमाण हे अधिक असते. भाजीपाल्यांमध्ये पोषकतत्वे चांगल्या प्रमाणात असल्याने आपल्या अंगात ऊर्जा संचारते. त्यामुळे भाजीपाल्यांच्या सेवनामुळे आपण आपला मूड चांगला करू शकतो. (Disclaimer - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
  Published by:Atik Shaikh
  First published: