• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • बापरे! लस घेताना तुटली सुई, तरुणाचा हात आणि पाय झाला जायबंदी

बापरे! लस घेताना तुटली सुई, तरुणाचा हात आणि पाय झाला जायबंदी

कोरोना प्रतिबंधक लस घेताना सुई तुटल्यामुळे एका तरुणाला जीवघेण्या (Needle broken while taking corona vaccine) समस्येला सामोरं जावं लागलं आहे.

 • Share this:
  लखनऊ, 20 सप्टेंबर : कोरोना प्रतिबंधक लस घेताना सुई तुटल्यामुळे एका तरुणाला जीवघेण्या (Needle broken while taking corona vaccine) समस्येला सामोरं जावं लागलं आहे. लस घेताना सुई तुटल्याचं त्याला समजलंही नाही. मात्र काही दिवसांतच त्याचा हात असा काही सुजला की त्याला डॉक्टरांकडे (Medical treatment) धाव घ्यावी लागली. जेव्हा सत्य समजलं, तेव्हा तरुणासह त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही (doctors shocked to see broken needle in the body) धक्का बसला. लस घेताना तुटली सुई उत्तर प्रदेशच्या ललितपूरमध्ये राहणाऱ्या इंद्रेश अहिरवार नावाच्या 22 वर्षांच्या तरुणाने 9 सप्टेंबर रोजी कोरोनाची पहिली लस घेतली. ही लस घेतल्यानंतर त्याच्या उजव्या हाताला वेदना होऊ लागल्या. दुसऱ्या दिवशी त्याचा हात प्रचंड सुजला आणि वेदनाही असह्य झाल्या. त्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याची अवस्था पाहिल्यानंतर त्याला काही टेस्ट करायला सांगितल्या. त्याच्या दंडाचा एक्सरे आणि सिटी स्कॅन करण्यात आला. त्याचे रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले. दंडात अडकली सुई इंद्रेशच्या दंडात इंजेक्शनच्या सुईचा एक भाग अडकून पडल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्याचा हात सुजला होता आणि त्याला प्रचंड वेदना होत होत्या. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्याच्या दंडातील सुई काढली आणि त्याला काहीसा दिलासा मिळाला. मात्र या काळात त्याच्या उजव्या पायालाही बधीरपणा आला होता. सुई काढल्यामुळे त्याच्या वेदना कमी झाल्या मात्र त्याचा हात आणि पाय हलत नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. पुढील उपचारांसाठी त्याला झाशीच्या मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकारामुळे इंद्रेशच्या शरीरावर काही दूरगामी परिणाम होण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. हे वाचा - श्वानासाठी मालकानं बुक केला विमानातील पूर्ण बिझनेस क्लास; मोजले इतके पैसे हलगर्जीपणाचा सिलसिला काही दिवसांपूर्वीच रावर स्कूलमध्ये आयोजित लसीकरण शिबिरात एका व्यक्तीला दोनदा लस देण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्यानंतर आता लस देताना सुई तुटल्याचा प्रकार घडला आहे.
  Published by:desk news
  First published: