नीलम कराळे, प्रतिनिधी
पुणे, 24 मार्च : मुंबईसह राज्यातील सर्वच शहरात वडापाव हे फेमस फास्ट फुड आहे. झटपट तयार होणारा, खाण्यासाठी कमी वेळ लागणारा तरीही अतिशय लज्जतदार असा हा पदार्थ आहे. पुणे शहरातील अनेक वडापाव स्टॉल चांगलेच फेमस आहेत. या स्टॉलवर नेहमी गर्दी असते. पुण्यातील कोथरुडमध्ये गेल्या 30 वर्षांपासून काका वडेवाल्यांचा स्टॉल फेमस असून येथील वडापाव खाण्यासाठी चक्क रांग लागलेली असते.
वडापाव खाण्यासाठी रांग
कोथरुड परिसरातील शिवतीर्थ नगर आणि गुजरात कॉलनी या परिसरात नामदेव कुंभार यांच्या वडिलांनी हा व्यवसाय सुरू केला. आता वडिलांच्या वयामुळे नामदेव आणि त्याचा भाऊ हा व्यवसाय सांभाळतात. गेल्या 30 वर्षापासून आजतागायत आमच्या वडापावची चव आबादीत आहे. त्यामुळे आवर्जून लोक इथे वडापाव खायला येतात.आमच्याकडं वडापाव खाण्यासाठी ग्राहक रांगेत उभे असतात,'अशी माहिती नामदेव कुंभार यांनी दिली.
आयुष्यात वडापाव नाही खाल्ला तर काय खाल्लं! मुंबई-पुण्यातील बेस्ट 10 वडापाव चुकूनही मिस करू नका!
'वडयाचा एक घाणा काढला की तो चक्क पाच ते दहा मिनिटांमध्ये कमीत कमी 40 ते 50 वडे आमचे लगेचच संपतात. आमच्या वड्याची खासीयत तशी आहे की आमच्या वड्यांमध्ये सुरुवातीला थोडासा गोडसर लागणारा वडा हळू तिखट लागत जातो. आणि त्याच्या कुरकुरीतपणामुळे हा वडापाव अतिशय टेस्टी असतो,' असे कुंभार यांनी स्पष्ट केलं.
येथील गरम-गरम वडापाव खाण्याची मजा ती औरच असते त्यामुळे अनेक जण एक वडापाव नंतर दुसऱ्या वडापावची मागणी अनेकजण करतात,असं इथं नेहमी येणारा ग्राहक यश मारणेनं सांगितलं.
Video: तात्या विंचू, कुबड्या खविस... मराठी व्हिलनला खायला 'इथं' होते गर्दी, पाहा काय आहे प्रकार
हा वडापाव पॉकेट फ्रेंडली असून 15 रुपयांना मिळतो. त्यामुळे कॉलेजच्या तरुणांची इथं मोठी गर्दी असते.सोमवार ते शनिवार दुपारी एक ते रात्री साडेनऊपर्यंत काका वडेवाले यांचा स्टॉल सुरू असतो. रविवारी त्यांना सुटी असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Local18 food, Pune, Vadapav