मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

आयुष्यात वडापाव नाही खाल्ला तर काय खाल्लं! मुंबई-पुण्यातील बेस्ट 10 वडापाव चुकूनही मिस करू नका!

आयुष्यात वडापाव नाही खाल्ला तर काय खाल्लं! मुंबई-पुण्यातील बेस्ट 10 वडापाव चुकूनही मिस करू नका!

Best Vadapav Near Me : मुंबई आणि पुणे शहरातले बेस्ट 5 वडापाव आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Best Vadapav Near Me : मुंबई आणि पुणे शहरातले बेस्ट 5 वडापाव आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Best Vadapav Near Me : मुंबई आणि पुणे शहरातले बेस्ट 5 वडापाव आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Onkar Danke

मुंबई, 19 जानेवारी :  वडापाव हा बदलत्या काळात वेगानं लोकप्रिय होणारा पदार्थ आहे. मुंबईच्या प्रत्येक भागात वडापावची गाडी असतेच. मुंबईची ओळख म्हणूनही वडापाव जगभर प्रसिद्ध आहे. मुंबईप्रमाणेच आता पुण्यातही वडापावची लोकप्रियता वाढलीय. पुण्यातही वडापावचे खास ब्रँड तयार झाले आहेत. मुंबई आणि पुणे शहरातले बेस्ट 5 वडापाव आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आराम वडापाव

मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरच सिग्नल ओलांडला की, समोरच एक गर्दी पाहायला मिळते. ही सर्व गर्दी आराम वडापाव खाण्यासाठी असते. 1939 पासून हा वडापाव लोकप्रियता टिकवून आहे. अतिशय खमंग आणि टेस्टी असा हा वडापाव शुद्ध तेलातून बनविला जातो. साधा वडापाव, मेयोनिज वडापाव, बटर वडापाव, शेजवान वडापाव, चीज वडापाव असे विविध प्रकार इथं मिळतात.

कुठे खाणार : आराम वडापाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्या समोर..

अशोक वडापाव (कीर्ती कॉलेज)

मुंबईतील मध्यवर्ती दादर भागात तुम्ही कुणालाही चांगला वडापाव कुठं मिळतो असं विचारलं तर ते किर्ती कॉलेजच्या जवळच्या वडापावचे नाव घेईल. अनेक सेलिब्रेटींचाही हा आवडता वडापाव आहे. या वडापावची चटणी आणि त्यासोबतच इथं मिळणारा चुरा पाव देखील फेमस आहे.

कुठे खाणार : अशोक वडापाव, किर्ती कॉलेज जवळ, दादर (पश्चिम)

ग्रॅज्युएट वडापाव

हा वडापाव त्याच्या नावाप्रमाणेच हटके आणि लोकप्रिय आहे. भायखळा स्टेशनच्या जवळ गेल्या 17 वर्षांपासून हा वडापाव मिळतो. इथं नेहमी असणारी गर्दी या वडापावची लोकप्रियता दाखवते.

वडापावचा 'जुगाडी अड्डा' एकाच ठिकाणी आहेत 30 पेक्षा जास्त पर्याय, Video

कुठे खाणार :  दुकान नंबर 29, हाजी घनी बिल्डिंग, रेल्वे स्टेशनच्या समोर, भायखळा (पूर्व)

आनंद वडापाव

मुंबईतील विलेपार्ले भागातील मिठीबाई कॉलेजजवळ असलेला आनंद वडापाव हा चांगलाच फेमस आहे. या वडापावचा आकार मोठा असतो. तसंच इथं वेगवेगळ्या फ्लेवरचं चीजही वडापावसोबत मिळते. आनंद वडापावचे सँडविचही चांगलेच प्रसिद्ध आहे.

कुठे खाणार : आनंद वडापाव, मिठीबाई कॉलेजसमोर, विले पार्ले (पश्चिम)

कालिदास वडापाव, मुलुंड

मुलुंड पश्चिमेला असलेला हा वडापाव चांगलाच प्रसिद्ध आहे. येथील मसाला खाण्यासाठी मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून इथं गर्दी होत असते. मसाला वडापाव हे नाव वाचताच खूप तिखट झणझणीत असा वडापाव तुमच्या डोळ्यासमोर येईल मात्र हा वडापाव तिखट न खाणारे सुद्धा अगदी सहज खाऊ शकतात.

पुण्यातील वडापाव

खत्री  बंधू

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या येथे गेल्या पंचवीस वर्षापासून खत्री बंधू यांची वडापावची हातगाडी आहे. हा वडापाव अतिशय चविष्ट असून वडापावचा घाणा काढल्याबरोबरच मोजून पाच ते दहा मिनिटांमध्ये वडे फस्त होतात. एक वडापाव खाल्ल्यावर तुम्हाला दुसऱ्या वडापाव नक्कीच खायची इच्छा होते.

कुठे खाणार : महर्षी शिंदे पूल, शिवाजी नगर, पुणे

श्रीकृष्ण वडेवाले

पुण्यामधील वडापाव मध्ये स्वतःची वेगळी ओळख जपणारा वडापाव म्हणजे श्रीकृष्ण उपहारगृहाचा वडापाव म्हणजे श्रीकृष्ण वडेवाले .यांच्या वडापावची अशी खासियत आहे की यांचा पाव हा स्पेशल बनवला जातो. हा जंबो पाव असतो आणि एका पावमध्ये तुम्ही दोन वडे खाऊ शकता. याचा वडा हा गोली वडा ह्या प्रकारातला असून ह्या वडापावचे आवरण  थोडीशी जाड असते. गरम गरम हा वडापाव खायला प्रचंड टेस्ट लागतो.

कुठे खाणार:  सारंग सोसायटी, पर्वती दर्शन, पुणे

गार्डन वडापाव

पुण्यातील सर्वात सुप्रसिद्ध वडापाव म्हणून गार्डन वडापाव ओळखला जातो. ह्या वडापावची चव इतर कोणत्याही वडापावला नाही हे सर्वजणच म्हणतात. इथे एकाच वेळेस कमीत कमी 100 वडे तळले जातात. आणि दिवसाला चार ते पाच हजार  वडे पाव इथे विकले जातात.

या वडापावची टेस्ट तर न्यारी आहेच मात्र ह्यांच्या वड्यासोबत मिळणारी मिरची ही अतिशय वेगळी आहे. ही किंचितशी आंबट आणि उकडलेली मिरची असते. त्याच्यामुळे ह्या मिरची चव वेगळी लागते. हा वडापाव गरम गरम खाण्याची मजा असते त्यासोबतच हा वडापावची चटणी देखील खूप प्रसिद्ध आहे.

कुठे खाणार : 7 गार्डन वडापाव, जेजे गार्डन, कॅम्प, पुणे

अन्नपूर्णा स्नॅक्स

पुण्यातील तपकीर गल्ली बुधवार पेठ येथे अन्नपूर्णा स्नॅक्स आहे. इथं वडापावसोबत मिरचीच्या ऐवजी चटणी दिली जाते. आकाराने मोठा असलेला हा वडापाव खाण्यासाठी इथं नेहमी गर्दी असते.

कुठे खाणार : बुधवार पेठ बस स्टॉप, तपकीर गल्ली, पुणे

जोशी वडेवाले

पुण्यात  जोशी वडेवाल्यांचे वडे खाल्ले नाही असं फार क्वचितच घडत. पुण्यात अनेक ठिकाणी  जोशी वडेवालेच्या ब्रँच आहेत.  पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या समोर जोशी वडेवाल्यांची मेन ब्रांच आहे. इथे मिळणारा वडापाव हा खास आहे. यासोबतच या वडापाव सोबत तुम्हाला लसणाची चटणी देखील मिळते. हा वडा कमी तेलकट असतो. त्यासोबत मिळणारी चविष्ट अशी आंबट-गोड चटणी ग्राहकांना तृप्त करते.

First published:

Tags: Local18, Local18 food, Mumbai, Pune, Vadapav