वर्धा, 18 जुलै : अधिक महिन्याला सुरुवात झाली असून श्रावण महिन्याची चाहूल आता लागलीय. श्रावण महिन्यात असलेल्या वेगवेगळ्या सण आणि उत्सवाची आता घरोघरी तयारी सुरू झालीय. सणाच्या दिवशी घरात एखादा नवीन गोड पदार्थ करावा अशी गृहिणींची इच्छा असते. नेहमीच्या गोड पदार्थांपेक्षा हटके अशा चंपाकळी पदार्थाची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. वर्ध्यातल्या सीमा अतकर यांनी ही रेसिपी सांगितली आहे. काय साहित्य हवं? चंपाकळी बनविण्यासाठी दोन वाटी मैदा, एक वाटी रवा,एक वाटी पिठीसाखर, दोन चमचे वेलची पूड, तळण्यासाठी तेल आणि पाक बनविण्यासाठी साधी साखर, डालडा किंवा तूप आणि पीठ भिजवण्यासाठी पाणी या साहित्याची आवश्यकता आहे.
कृती चंपाकळी तयार करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एका परातीमध्ये मैदा,रवा वेलची पूड आणि पिठीसाखर एकत्र करून घ्यावी. त्यामध्ये डालडा किंवा तूप गरम करून मोहन टाकावे. पूर्ण कोरड्या वस्तूंना मोहनाने एकत्रित करून घ्यावे. आता हे मिश्रण लागेल तेवढ्याच पाण्याने भिजवून घ्यायचे आहे त्याचा गोळा बनवत असताना नेहमीच्या कणकेपेक्षा थोडे घट्ट मळून घ्यायचे आहे. 10-15 मिनिटे झाकून ठेवायचंय त्यानंतर मध्यम आकाराचे गोळे बनवून घेऊन पाती लाटून घ्यायची आहे पाती लाटून झाल्यानंतर व्हिडीओत दाखवल्यावर मध्यभागातून चिरावे. न चिरा करून घ्यायचे आहे त्यानंतर रोल करावे. आता ही चंपाकळी कच्ची तयार झाली. फक्त 5 मिनिटात बनवा पोह्यांचा डोसा, पाहा सोपी रेसिपी कच्ची चंपाकळी तेलातून सोनेरी रंग येईपर्यंत तळावी. त्यानंतर साखरेच्या पाकात बुडवून थोड्या वेळात काढून घ्यावी. ही गोड चंपाकळी खाण्यासाठी तयार आहे. आगामी सणाचा गोडवा या चंपाकळीनं तुम्ही नक्की वाढवू शकता.