मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Gudi Padwa 2023 : महाग आणि भेसळयुक्त श्रीखंडाला पर्याय, घरच्या घरी बनवा श्रीखंड, पाहा सोपी रेसिपी, Video

Gudi Padwa 2023 : महाग आणि भेसळयुक्त श्रीखंडाला पर्याय, घरच्या घरी बनवा श्रीखंड, पाहा सोपी रेसिपी, Video

X
Gudi

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्याला श्रीखंड खाण्याची पद्धत आहे. हे श्रीखंड घरच्या घरी करण्याची सोपी पद्धत पाहूया

Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्याला श्रीखंड खाण्याची पद्धत आहे. हे श्रीखंड घरच्या घरी करण्याची सोपी पद्धत पाहूया

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Kolhapur, India

  साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी

  कोल्हापूर, 20 मार्च :   गुढीपाडवा सण साजरा करताना घरी गोडधोड करणे आपसूकच येते. दारात उभ्या केलेल्या गुढीला देखील गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. पुरणाच्या पोळ्या आणि श्रीखंड या पदार्थांचा समावेश असतो. पाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात श्रीखंड बनवण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात आहे. हे श्रीखंड विकत न घेता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं कसं बनवता येतं, हे पाहूया. कोल्हापूरच्या सीमा पवार यांनी याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत.

  श्रीखंड बनवणं हे अनेकांना अवघड वाटतं. मात्र, योग्य प्रकारे पाककृती केली तर नक्कीच चविष्ठ श्रीखंड आपण बनवू शकतो, असं पवार यांनी सांगितलं. त्यांनी ताज्या दुधापासून राजभोग श्रीखंड बनवण्याची पद्धत सांगितली आहे.

  श्रीखंड बनवण्याची कृती

  राजभोग श्रीखंड बनवण्यासाठी आपल्याला एक लिटर ताजे दूध, साखर, इलायची, जायफळ, केसर, आवडीप्रमाणे सुकामेवा हे साहित्य लागतं. एक लिटर दुध वापरून आपण साधारण एक वाटी चक्क्याचे श्रीखंड बनवू शकतो.

  1) श्रीखंड बनवण्यासाठी सर्वात चक्का बनवून घ्यावा. त्यासाठी दही बनवताना ताजे दूध मध्यम आचेवर उकळून घ्यावे. उकळत असताना ते सतत चमच्याने ढवळत राहावे, जेणेकरून दुधाची साय एकत्र जमा होणार नाही. यामुळे या दुधापासून बनवले जाणारे दही एकजीव आणि घट्ट बनते.

  2) दुसऱ्या दिवशी तयार झालेले घट्ट दही हे एकत्र एका सुती कापडात काढून घ्यावे. या घट्ट दह्यातील शिल्लक पाणी देखील बाहेर कढण्यासतही वापरले जाणारे कापड हे पूर्णतः सुती आणि जीर्ण झालेले असायला हवे.

  पाडव्याला विशेष महत्त्व असलेली साखरेची गाठ कशी तयार करतात? पाहा Video

  3) कापडात दही काढून घेतल्यावर त्या कापडाची एक घट्ट पुरचुंडी बांधावी. त्यातील अतिरिक्त पाणी बाहेर येण्यास सुरुवात होईल.

  4) एका भांड्यात हे दही बांधलेले कापड ठेवून त्यावर किमान ५ तास एखादी वजनदार वस्तू (उदा. खलबत्ता, वरवंटा) ठेवून द्यावी.

  5) या वजनदार वस्तूमुळे दह्यातील सर्व पाणी बाहेर नितळून जाऊन या कापडात फक्त चक्का शिल्लक राहतो.

  6) साधारण चार-पाच तासानंतर या कापडाची गाठ सोडून त्यातील चक्का एका भांड्यात काढून घ्यावा.7) आता यात तयार चक्क्यापासून श्रीखंड तयार करता येते. त्यासाठी साखरेची बारीक पूड किंवा पिठीसाखर घ्यावी.

  8) श्रीखंडाला थोडी अजून चांगली चव येण्यासाठी जायफळ आणि इलायची दोन्ही साखरेबरोबर बारीक करून घ्यावेत.

  9) या छक्क्यामध्ये बारीक केलेली साखर किंवा पिठीसाखर इलायची जायफळ यांची पूड, सुका मेवा आणि कोमट दुधात भिजवून घेतलेले केशर हे सर्व एकत्र करून चांगले फेटून घ्यावे.

  10) हे मिश्रण भेटत असताना चक्क्यामध्ये गाठी शिल्लक राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर श्रीखंड तयार आहे.

  हे श्रीखंड घरच्या घरीच बनवत आहेत असल्यामुळे यातील साखरेचे प्रमाण हे आपण आपल्या आवडीनुसार ठरवू शकतो. त्याचबरोबर जितके जास्त यातील सर्व घटक मूर्ती तितके हे श्रीखंड चवीला अधिक स्वादिष्ट लागेल, असेही सीमा पवार यांनी सांगितले.

  First published:
  top videos

   Tags: Gudi Padwa 2023, Kolhapur, Local18, Local18 food, Recipie