नीलम कराळे, प्रतिनिधी पुणे, 1 मार्च : उन्हाळा सुरू झाला की आईस्क्रीम खायला सर्वांनाच आवडतं. पुण्यात आईस्क्रीमध्ये मस्तानी हा विशेष प्रकार चांगलाच फेमस आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात अनेक आईसक्रीम पार्लर आहेत. तिथं मस्तानी आईस्क्रीम खाण्यासाठी मोठी गर्दी असते.
पुण्यात
108 वर्ष जुनं आईस्क्रीम पार्लर आजही लोकप्रियता टिकवून आहे. शहरातील तुळशीबाग या गजबजलेल्या भागात असलेल्या या दुकानात ग्राहक आवर्जुन येत असतात. 108 वर्षांची परंपरा महिलांच्या शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या तुळशीबागेत 108 वर्ष जुनं कावरे आईस्क्रीम आहे. 1915 च्या आसपास गणपत मारूती कावरे यांनी हा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला गणपत कावरे यांचे पानाचे दुकान होते तिथे ते सुरुवातीला सोडा वॉटर लेमन वॉटर विकायचे त्यांच्या पानाच्या दुकानासमोर जागा भाड्याने घेऊन तिथे त्यांनी थंडपेय विक्रीला सुरुवात केली. त्यावेळेस त्यांनी पुढे जाऊन सुगंधी दूध देखील विकायला सुरुवात केली. आणि त्यानंतर पॉट आईस्क्रीम ही कावऱ्यांनी या जागेवर सुरू केले, अशी माहिती या पार्लरचे सध्याचे मालक दत्तात्रय तावरे यांनी दिली.
घरगुती पद्धतीचं बीडचं फेमस आईस्क्रीम! बाराही महिने असते ग्राहकांची गर्दी, Video
आईस्क्रीमच्या सुरुवातीच्या काळामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम, मँगो आईस्क्रीम असे विविध फ्लेवर सुरुवातीपासूनच होते. तसेच गेला 70 वर्षांपूर्वी त्यांनी बाजीराव मस्तानी हा आईस्क्रीमचा प्रकार त्यांनी सुरू केला. यामध्ये आईस्क्रीमच्या लिक्विडमध्येच आईस्क्रीमचा घट्टसर गोळा दिला जातो. ह्या आईस्क्रीमची चव सर्वात टेस्टी असल्यामुळे अनेक पुणेकर इथं आवर्जुन येत असतात. बदलत्या हवामानाचा फायदा ‘पुण्यात पूर्वी भरपूर पाऊस पडत असे. त्यामुळे पावसाळ्यात धंदा अजिबात चालायचा नाही. थंडीमध्येही तुरळक गर्दी असे. उन्हाळ्यातच व्यवसाय होत असे. त्या व्यवसायावर संपूर्ण वर्ष काढावं लागत असे. आता पुण्याचे हवामान बदलले आहे. त्यामुळे तिन्ही ऋतूमध्ये आईस्क्रीम खाणारी मंडळी आहेत. विशेषत: उन्हाळ्यात तर इथं रोज हजारो जण येतात,’ अशी माहिती दत्तात्रय कावरे यांनी दिली.
… म्हणून पुण्यातील कॅफेनं सुरू केले 13 प्रकारचे वेगन आईस्क्रीम, पाहा Video
संपूर्ण पत्ता कावरे आईस्क्रीम मस्तानी हाऊस, 75 तुळशीबाग , बुधवार पेठ, 411002
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.