मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Ice Cream : घरगुती पद्धतीचं बीडचं फेमस आईस्क्रीम! बाराही महिने असते ग्राहकांची गर्दी, Video

Ice Cream : घरगुती पद्धतीचं बीडचं फेमस आईस्क्रीम! बाराही महिने असते ग्राहकांची गर्दी, Video

X
famous

famous bansi icecream

आईस्क्रीमचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. त्यात आईस्क्रीमचे अनेक प्रकार तुमच्या समोर असतील तर भारीच.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

    रोहित देशपांडे

    बीड, 03 फेब्रुवारी : सध्या उन्हाचा कडाका वाढत आहे. अशा वातावरणात आईस्क्रीमचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. त्यात आईस्क्रीमचे अनेक प्रकार तुमच्या समोर असतील तर भारीच. बीडमधील एका आईस्क्रीम पार्लरमध्ये वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीम मिळतात. याठिकाणी लोकं गर्दी करून आईस्क्रीमचा आनंद घेताता. 

    अनेक खाद्यपदार्थ किंवा विशिष्ट थंड, पेय मिळण्याचे वेगवेगळे ठिकाण आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. आईस्क्रीम हा पदार्थ उन्हाळ्यामध्ये आवर्जून खाल्ला जातो. मात्र बीडमध्ये एक असं ठिकाण आहे की त्या ठिकाणी तिन्ही ऋतूमध्ये आईस्क्रीम खाण्यासाठी खवय्ये मोठी गर्दी करतात.

    घरगुती आईस्क्रीम

    बीड शहरातील जालना रोड परिसरातमध्ये राजस्थान येथून आलेल्या प्रजापती बन्सी यांनी तीस वर्षांपूर्वी आईस्क्रीमच्या व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला त्याकाळी आईस्क्रीम हा पदार्थ कमी प्रमाणात खाल्ला जायचा मात्र यांनी घरगुती पद्धतीने बनवलेल्या आईस्क्रीमची चव खवय्यांना आकर्षित करू लागली आणि हळूहळू या आईस्क्रीमच्या विक्रीमध्ये वाढ देखील झाली.

    अनेक फ्लेवर

    अनेक ठिकाणी आईस्क्रीम मिळतात मात्र या ठिकाणी घरगुती पद्धतीने आईस्क्रीम तयार केले जाते. यामध्ये बटरस्कॉच, मॅंगो, चॉकलेट, अमेरिकन ड्रायफ्रूट, पान मसाला, या फ्लेवरचे आईस्क्रीम या ठिकाणी उपलब्ध असून ग्राहकांची सर्वच वेगवेगळ्या फ्लेवरची अधिक मागणी असते. विशेष म्हणजे तिन्ही ऋतूंमध्ये या ठिकाणी आईस्क्रीम खाण्यासाठी बिडकर आवर्जून येतात.

    500 प्लेटची विक्री

    सुरुवातीला ज्यावेळी आईस्क्रीमचा व्यवसाय बन्सी यांनी सुरू केला त्यावेळी दीडशे ते दोनशे आईस्क्रीमच्या प्लेटची विक्री व्हायची व त्यावेळी त्याचा दर दहा रुपये देखील होता, मात्र आता दिवसाकाठी 400 ते 500 प्लेटच्या आईस्क्रीमची विक्री होत असून आणि आता याचाच दर 25 रुपये देखील झाला आहे.

    First published:

    Tags: Beed, Local Food, Local18