मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पचनशक्ती मजबूत करण्यासाठी फॉलो करा या टिप्स; बद्धकोष्ठतेचा त्रास होईल दूर

पचनशक्ती मजबूत करण्यासाठी फॉलो करा या टिप्स; बद्धकोष्ठतेचा त्रास होईल दूर

पोट निरोगी असेल तर शरीर निरोगी राहते. त्यामुळे पोटाची काळजी घेणे अतिशय गरजेचे असते. काही टिप्स फॉलो करून तुम्ही पोटाची योग्य ती काळजी घेऊ शकता.

पोट निरोगी असेल तर शरीर निरोगी राहते. त्यामुळे पोटाची काळजी घेणे अतिशय गरजेचे असते. काही टिप्स फॉलो करून तुम्ही पोटाची योग्य ती काळजी घेऊ शकता.

पोट निरोगी असेल तर शरीर निरोगी राहते. त्यामुळे पोटाची काळजी घेणे अतिशय गरजेचे असते. काही टिप्स फॉलो करून तुम्ही पोटाची योग्य ती काळजी घेऊ शकता.

  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 16 जुलै : आपलं पोट (Healthy Stomach) हे आपल्या अनेक सस्यांचे मुळ असू शकते. पोट निरोगी (Healthy Stomach Tips) असेल तर संपूर्ण शरीर निरोगी राहते. आपल्या संपूर्ण शरीराचे आरोग्य (Stomach Health) पोटाच्या आरोग्याशी निगडीत असते. त्यामुळेच पोटाची व्यवस्थित काळजी घेतली तर अनेक आरोग्यविषयक समस्या दूर ठेवता येऊ शकतात. पोट चांगलं ठेवण्यासाठी आपला आहार (Food For Digestion) सकस आणि पौष्टीक असणे आवश्यक आहे. परंतु योग्य आहार घेऊन जरी पोट खराब (Digestive system) राहत असेल तर ढेकर येणे, गॅस आणि मळमळ अशा समस्या उद्भवतात. मात्र काही आयुर्वेदिक टिप्स फॉलो करून तुम्ही या समस्यांपासून दूर राहू शकता. जाणून घेऊया कोणत्या आयुर्वेदिक टिप्स (Ayurvedic Tips) फॉलो केल्याने करायला सुरुवात करावी.

या टिप्स फॉलो करून मजबूत करा पचनशक्ती

पचनक्रिया मजबूत करण्यासाठी तुम्हाला चरबीयुक्त पदार्थ सोडावे लागतील आणि आहारात जवस, चिया सीड्स आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. यामुळे पचनक्रिया मजबूत होण्यासाठी मदत होईल.

World Blood Donor Day: 14 जून जागतिक रक्तदाता दिन; रक्तदान करण्यापूर्वी प्रत्येकाला या गोष्टी माहीत असाव्यात

जेवणापूर्वी तुम्ही लिंबू पाण्याचा वापर करू शकता. यासाठी लिंबूच्या रसात आलं किसून टाकावे आणि चिमूटभर काळे मीठ घालून हे मिश्रण जेवणापूर्वी पिल्यास पोटाचा त्रास होत नाही आणि अन्नाचे पचनही चांगले होते.

जेवणानंतर नेहमी बडीशेप आणि खडीसाखर खाण्याची सवय लावा. यामुळे अन्नाचे पचन चांगले होते. तसेच तुम्ही त्रिफळा चूर्ण देखील खाऊ शकता. यामुळे अन्न पचन होण्यास मदत होते आणि पचनशक्ती मजबूत होते.

त्याचप्रमाणे अपचनाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी नियमितपणे आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. यासाठी तुम्ही ड्रायफ्रुट्स, ओट्स आणि दलिया इत्यादींचा आहारात समावेश करू शकता. यामुळे पचनाच्या समस्यांना दूर ठेवण्यास मदत होते.

भलतंच काहीतरी! 'या' व्यक्तीनं चक्क बिअर पिऊन वजन केलं कमी, पाहा फोटो

पचनक्रिया मजबूत करण्यासाठी तुम्ही जेवणासोबत दह्यापासून तयार केलेला रायता खाऊ शकता. यामुळे तुमच्या पोटाला थंडावा मिळेल आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. तसेच तुम्ही जेवणासोबत सलाद खात असाल तर ते जेवणानंतर काही वेळाने खावे. यामुळे तुमचे अन्न पचन होण्यास मदत होईल.

जेवताना कधीच फोनचा वापर करू नका. तसेच अनेकांना टीव्ही पाहण्याची सवय असते परंतु जेवताना टिव्ही देखील पाहू नका. यामुळे तुमचं जेवणावर लक्ष राहत नाही आणि त्याचा परिणाम थेट तुमच्या पचनक्रियेवर होतो. त्यामुळे जेवण करताना कधीच मोबाईलचा वापर आणि टीव्ही पाहू नका. यामुळे तुम्ही जेवणाला पुरेसा वेळ द्याल आणि तुमचे अन्न व्यवस्थीत पचन होईल. यामुळे शरीराला योग्य पोषण मिळते. तसेच तुम्ही हिंग आणि जिरे घालून ताक पिऊ शकता. यामुळे बद्धकोष्ठता आणि लूज मोशन होत नाही.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Stomach