नवी दिल्ली, 14 जून : दैनंदिन जीवनात वाढत चालेल्या वजनामुळे खूप त्रास सहन करावा लागतो. निरोगी वजन(Healthy Weight) तुम्हाला केवळ शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही तंदुरुस्त ठेवते. त्यामुळे लोक वजन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयत्न करतात. अशीच काहीशी बातमी सध्या समोर आली आहे. एका व्यक्तीनं वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे.
एका व्यक्तीनं आपलं वजन कमी करण्यासाठी बिअरचा वापर केला आहे. त्यानं फक्त बिअर पिऊन आपलं वजन कमी (Lose weight by drinking beer)करण्यात यश मिळवलं आहे. फक्त बिअर पिऊन वजन कसं कमी करता येईल, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येईल. मात्र अमेरिकेतील एका व्यक्तीने बिअर पिऊन आपले वजन कमी केल्याचं समोर आलं आहे. डेल हॉल (Dell Hall)नावाच्या अमेरिकेतील व्यक्तीनं ही गोष्ट करुन दाखवली आहे.
View this post on Instagram
Cincinnati.com नुसार, अमेरिकेतील सिनसिनाटी शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीचे नाव डेल हॉल आहे, ज्याने भूक लागल्यावर खाण्याऐवजी बिअर पिण्याचा निर्णय घेतला. तो दिवसातून 2 ते 5 वेळा बिअर प्यायचा आणि फक्त हिरव्या भाज्या आणि काही हलके अन्न खायचा. डेल हॉल त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या वजनाचे रोजचे फोटो क्लिक करून पोस्ट करतो. सुरुवातीला थोडा त्रास झाला पण नंतर जेव्हा त्याने वजन कमी करायला सुरुवात केली तेव्हा त्याला स्वतःला खूप आश्चर्य वाटलं.
हे ही वाचा - स्कीन केअरसाठी डाळिंबाची साल आहे जबरदस्त उपाय! असा वापर केल्यास दिसेल परिणाम
2018 मध्ये डेल हाॅलनं आपल्या आहारात बिअरचा समावेश केला होता. आतापर्यंत त्यानं 40 किलो वजन कमी केलं आहे. त्यामुळे त्याचे फाॅलोवर्सही चकित झाले आहेत. त्यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सगळे वजन कमी करण्याचे फोटो शेअर केले आहेत. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beer, Health, Health Tips, Weight, Weight loss