चुकीच्या कॉम्बिनेशनमुळे (Wrong Food Combination) अपचन ,बद्धकोष्ठता, गॅसेसचाही त्रास होतो. शिवाय असे विषाक्त पदार्थ पोटात गेल्यामुळे अनेक आजारांचं कारण बनू शकतात. त्यामुळे चुकीचे फूड कॉम्बिनेशन्स घेऊ नयेत.
लवकर पचणारे आणि हळूहळू पचणारे अन्नपदार्थ या दोन पद्धतीमध्ये त्यांचं विभाजन करता येतं. हे दोन्ही पदार्थ एकत्र करून खाल्ल्याने अनेक समस्या निर्माण होतात. डॉक्टरांच्या मते वेगवेगळे खाद्यपदार्थ पचवण्यासाठी वेगवेगळ्या PH लेव्हलची गरज असते आणि हे वेगवेगळी PH लेव्हल आवश्यक असणारे पदार्थ एकत्र खाल्ल्याने अडचणी येतात.
एक्सरसाइज करणारे लोक दूध आणि केळी एकत्र घेतात. मात्र दूध आणि केळ हे कॉम्बिनेशन अतिशय भयंकर आहे. दुधामुळे शरीरात विषाक्त पदार्थ वाढतात.
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार्या लोकांसाठी हे कॉम्बिनेशन नुकसानदायक आहे. यामुळे स्टोरींग हार्मोन आणि इन्सुलिन वाढतं.
लोकांना दुध घातलेला चहा प्यायला आवडतो मात्र, अशा प्रकारचा चहा पिण्यामुळे पोटावर वाईट परिणाम होतो. चहामध्ये anti-inflammatory गुण असतात दूध आणि चहा एकत्र घेण्यामुळे हे गुण संपून जातात.
काही जणांना दही रायता खायला आवडतो. दह्यामध्ये काही फळ घालून देखील रायता बनवला जातो. मात्र दही आणि फळं एकत्र खाणं धोकादायक आहे. फळं आणि दही एकत्र झाल्यानंतर विषाक्त पदार्थांची निर्मिती होते. त्यामुळे ऍलर्जी देखील होऊ शकतं.
फळं आणि भाज्या एकत्र खाल्ल्यामुळे देखील पोट खराब होतं. फळांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे जेवण पचायला अडचण निर्माण होते.
फळ, भाज्या वेगवेगळे प्रकारचे पदार्थ आहेत. त्यामुळे पचायला लागणारा कालावधी वेगवेगळा असतो. त्यामुळे एकत्र खाऊ नयेत असं डॉक्टरही सांगतात.
प्रोटीन पचायला अतिशय जड असतं. त्यामुळे दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीनयुक्त पदार्थ एकत्र खाऊ नये. कारण त्यांना पचण्यासाठी लागणारा वेळ जास्त असतो आणि त्यामुळे डायजेशन सिस्टीमवरती परिणाम होतो.
तांदूळ आणि संत्र आणि ओट्स, केळं, मनुका आणि दूध, एनर्जी ड्रिंक आणि मद्य, ड्रायफ्रूट, अंड,दूध आणि दही हे सुद्धा धोकादायक कॉम्बिनेशन्स आहेत.