मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मद्यपान करताना 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका!

मद्यपान करताना 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका!

 दवांडे यांचं दारूचं व्यसन सोडवण्यासाठी त्याला जालन्यातील धावडा येथील तडवी बाबा या महाराजांकडे आणण्यात आलं होतं.

दवांडे यांचं दारूचं व्यसन सोडवण्यासाठी त्याला जालन्यातील धावडा येथील तडवी बाबा या महाराजांकडे आणण्यात आलं होतं.

कोणताही पदार्थ खाताना किंवा पेय पिताना कशाबरोबर खायचं किंवा कशाबरोबर खायचं नाही, याचे काही संकेत असतात.

कोणताही पदार्थ खाताना किंवा पेय पिताना कशाबरोबर खायचं किंवा कशाबरोबर खायचं नाही, याचे काही संकेत असतात. तसंच आहारशास्त्रानुसार विचार केल्यास कोणते पदार्थ दुसऱ्या कोणत्या पदार्थासोबत खाल्ले किंवा प्यायले तर चालत नाही, याचे काही नियमही असतात. हे नियम अर्थातच प्रकृतीला काही अपाय होऊ नये म्हणूनच केलेले असतात. उदाहरणार्थ, दुधासोबत मासे किंवा मांसाहारी पदार्थ किंवा खारट पदार्थ खाल्लेले चालत नाहीत. असेच काही नियम मद्यपानाबद्दलही आहेत. त्याबद्दलची माहिती 'टीव्ही नाइन हिंदी'ने दिली आहे.

मद्यपान (Drinking) केल्यानंतर त्याचा हँगओव्हर (Hangover) येऊ नये म्हणून त्यासोबत काही स्नॅक्स (Snacks) किंवा चटपटीत पदार्थ खाल्ले जातात. काही जणांना मद्याबरोबर वेगवेगळे पदार्थ कसे लागतात, याची चव घेऊन पाहायची असते; मात्र मद्याबरोबर काही अन्नपदार्थांची कॉम्बिनेशन्स शरीराला अपायकारक ठरतात. कारण त्यांचा पचनावर विपरीत परिणाम होतो. अशा काही पदार्थांबद्दलची माहिती घेऊ या.

अनेक जणांना मद्यासोबत खूप तेलकट, चटपटीत, मीठ जास्त असलेले पदार्थ खायला आवडतात; मात्र या कॉम्बिनेशनमुळे डिहायड्रेशन होतं, अर्थात शरीरातलं पाणी कमी होते. त्यामुळे शरीराची ऊर्जा कमी होते. त्यामुळे अशा पदार्थांऐवजी मद्यासोबत ग्रिल्ड चिकन (Grilled Chicken) आणि भाज्यांचा समावेश असलेल्या पदार्थांचं सेवन करणं श्रेयस्कर.

हे ही वाचा-भरपूर कॅलरीज देणाऱ्या केळ्यांनीही होतं नुकसान; होईल पोटदुखी,वाढेल वजन

काही जणांना मद्यानंतर किंवा मद्यासोबत कॉफीपान (Drinking Coffee with Alcohol) करायलाही आवडतं. कारण मद्यपानानंतर येणारी नशा कमी होऊन थोडी तरतरी येण्यासाठी काही जणांना त्याचा उपयोग होतो; मात्र मद्यासोबत कॉफीपान केल्यास डिहायड्रेशन होतं. जास्त प्रमाणात मद्यपान केलेलं असल्यास त्याचा त्रास होऊ शकतो.

मद्यासोबत चॉकलेट्स (Chocolates) हेदेखील अनेकांच्या आवडीचं कॉम्बिनेशन असतं; मात्र चॉकलेटमुळे अॅसिडिटी, गॅसेस आदी समस्या वाढीला लागतात. त्यामुळे त्याचा त्रासच होतो.

मद्य किंवा बीअरसोबत ब्रेड (Bear and Bread) खाणंही शरीराला हानिकारक ठरतं. कारण ब्रेडमुळे पोटात गॅसेस होतात आणि पोटफुगीची समस्या निर्माण होते. त्यामुळे शरीरातलं पाणीही कमी होतं. खूप जास्त प्रमाणात बीअर आणि ब्रेड एकत्रितपणे खाल्ल्यास उलट्याही होऊ शकतात.

अनेकांचं आणखी एक आवडतं कॉम्बिनेशन म्हणजे रेड वाइनसोबत (Red Wine) बीन्स; पण हे कॉम्बिनेशनही घातकच ठरतं. कोणत्याही कडधान्यांमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं. मद्यपान केलेलं असताना लोह शरीरात शोषलं जात नाही. लोह तसंच शरीरात साचून राहिलं तर अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच मद्यपानाच्या (Drinking) आधी किंवा मद्यपानादरम्यान कडधान्यं (Beans) खाऊ नयेत, असा सल्ला दिला जातो.

First published:

Tags: Alcohol