मुंबई, 28 डिसेंबर : सध्या जगभरात कोव्हीड-19 च्या नवीन प्रकार Omicron BF.7 बाबत घबराट आहे. त्यामुळे चीनमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे. तर या प्रकाराने जपान आणि भारतासह अनेक देशांमध्ये दार ठोठावले आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवरही कोव्हीडचा धोका आहे. गेल्या तीन वर्षांपासून कोरोनाने जनजीवन विस्कळीत केले असून पुन्हा एकदा त्याचा वाढता धोका लोकांच्या चिंतेत भर घालत आहे. प्रत्येकजण कोरोनाच्या भीतीमध्ये जगत आहे. तज्ञांच्या मते, कोव्हीडच्या नवीन प्रकाराचा प्रभाव भारतावर फारसा दिसणार नाही. परंतु यासाठी लोकांना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. आज नवी दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलच्या प्रतिबंधात्मक आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. सोनिया रावत यांच्याकडून कोविडचे नवीन प्रकार टाळण्याचे सोपे मार्ग जाणून घेऊया.
कोरोना रिर्टन्स : या पाच सवयी विसरला असाल, तर पुन्हा एकदा कराव्या लागतील सुरूया 5 टिप्स फॉलो करा, कोव्हीडचा धोका दूर होईल युनिव्हर्सल प्रिकॉशन्स सर्वात प्रभावी : कोविडच्या नवीन प्रकाराचा धोका टाळण्यासाठी लोकांना पूर्वीप्रमाणेच कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. घराबाहेर पडताना मास्क लावावा लागेल आणि हात वेळोवेळी स्वच्छ करावे लागतील. गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहणे देखील आवश्यक आहे. तुम्ही पूर्वीप्रमाणेच सामाजिक अंतर म्हणजेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करून संसर्गाचा धोका कमी करू शकता.
कोव्हीड लसीचा बूस्टर डोस घ्या : यावेळी कोव्हीड संसर्गाविरूद्ध लस हे एकमेव शस्त्र आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला आतापर्यंत कोविड-19 लसीचा बूस्टर डोस मिळाला नसेल, तर नक्कीच लस घ्या. विशेषत: ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, त्यांनी लसीकरण करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्यांना काही गंभीर आजार आहेत, त्यांनी लसीकरण करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सध्याच्या लसीचा नवीन प्रकारावर कितपत परिणाम होईल हे सांगणे कठीण आहे, परंतु लस घेण्यात काहीही नुकसान नाही. तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करा : कोणताही आजार टाळण्यासाठी लोकांनी त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत केली पाहिजे. जर प्रतिकारशक्ती मजबूत असेल, तर कोविडचे नवीन प्रकार देखील तुमचे नुकसान करू शकणार नाहीत. प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी भरपूर फळे आणि भाज्या खा. निरोगी आहार घ्या आणि दररोज व्यायाम करा. मोसंबी, आवळा यांसारखी लिंबूवर्गीय फळे खा. तुम्ही रात्री एक ग्लास दुधात चिमूटभर हळद टाकूनही पिऊ शकता. याशिवाय आले, मध आणि तुळशीच्या पानांचे सेवन हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. जर घरात सुरु आहे लग्नाची तयारी, तर थांबा…नाही तर होऊ शकतं नुकसान, जाणून घ्या कारण नवीन वर्षाच्या पार्टीला जाणे टाळा : नवीन वर्षाच्या पार्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतात आणि यामुळे कोव्हीडचा धोका वाढतो. आतापासूनच नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. त्यामुळे खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कोव्हीडचा धोका लक्षात घेता, तुम्ही पार्ट्यांमध्ये जाणे टाळून त्याऐवजी घरात राहून नवीन वर्ष साजरे केले तर बरे होईल. गर्दीत कोविडचा संसर्ग झपाट्याने पसरू शकतो. कोविड संसर्गानंतरही अनेकांना लक्षणे दिसत नाहीत, परंतु ते इतर लोकांमध्ये विषाणू पसरवण्याचे कारण बनू शकतात. अशा परिस्थितीत सेलिब्रेशनदरम्यान विशेष काळजी घ्या. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)