जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कोरोना रिर्टन्स : या पाच सवयी विसरला असाल, तर पुन्हा एकदा कराव्या लागतील सुरू

कोरोना रिर्टन्स : या पाच सवयी विसरला असाल, तर पुन्हा एकदा कराव्या लागतील सुरू

या पाच सवयी पुन्हा एकदा कराव्या लागतील सुरू

या पाच सवयी पुन्हा एकदा कराव्या लागतील सुरू

चीनसह इतर काही देशांत कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव होत आहे. या पार्श्वभूमीवर देशात देखील सरकारकडून काळजी घेतली जात आहे. अशा स्थितीत तुम्ही कोरोनाचे हे नियम पाळून स्वतला सुरक्षित ठेवू शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 डिसेंबर : चीनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराने धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर चीनमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात रुग्णालयांमध्ये रुग्णांना ठेवण्यासाठी जागा देखील उपलब्ध नसल्याचा दावा केला जात आहे. चीनसह इतरही काही देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने प्रवेश केला आहे. भारतालाही या विषाणूचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आणि राज्यातील यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. केंद्र सरकारने मंगळवारी राज्यांना जिनोम सिंक्वेंसिंग वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूकीसाठी देखील नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा कोरोनाचे नियम पाळणे अनिवायर्य होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपल्या सुरक्षेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

जर घरात सुरु आहे लग्नाची तयारी, तर थांबा…नाही तर होऊ शकतं नुकसान, जाणून घ्या कारण

कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी अशी घ्या काळजी नियमित मास्क वापरा कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी नियमित मास्क वापरा. कारण कोरोनाविरुद्ध लढ्यात मास्क हे सर्वात मोठे शस्त्र आहे. तज्ञांनुसार N95 मास्क सुरक्षित मानले जाते. सैल किंवा अनफिट मास्क वापरू नका. तसेच खराब मास्क पुन्हा वापरू नका. एकमेकांचे मास्क वापरणे टाळा.

News18लोकमत
News18लोकमत

पाण्याची वाफ घ्या मास्क वापरण्यासोबत वाफ घेणे देखील महत्वाचे आहे. तुम्हाला कोरोनाचे सौम्य लक्षणं जाणवत असतील किंवा सर्दी, खोकला, ताप आणि अंगदुखी असे काही हंगामी आजारांचे लक्षणं जरी जाणवत असतील तरी वाफ घ्या. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. सॅनिटायझर वापरा कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आणि त्याचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी मास्क प्रमाणेच सॅनिटायझर देखील महत्त्वाचे शस्त्र आहे. घराबाहेर जाताना किंवा घरात देखील सॅनिटायझरचा वापर करा. शिंक किंवा खोकला आल्यास नाक आणि तोंड हाताने किंवा रुमालाने कव्हर करा आणि त्यानंतर सॅनिटायझर वापरा. लिफ्टमध्ये, प्रवासात, ऑफिसमधील डेस्कचा वापर करताना सॅनिटायझर वापरा यामुळे तुम्हाला कोरोनापासून सुरक्षित राहण्यास मदत होईल. काढा पिणे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती खूप महत्त्वाची आहे. ती वाढवण्यासाठी काढा प्या. तुम्ही दालचिनी, काळी मिरी, तुळस आणि आले यांचा काढा बनवू पिऊ शकता. यामध्ये तुम्ही चवीसाठी गूळ किंवा मध घालून शकता. सोशल डिस्टन्सिंग पाळा कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आणि त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळा. कार्यालयात, प्रवासात आणि सार्वजनिक ठिकाणी वावरताना लोकांपासून फिजिकल डिस्टन्स ठेवा. सुरक्षित अंतारावर राहून लोकांशी संवाद साधा. तुम्ही व्यवसायिक असाल तर सुरक्षित अंतरावरून देवाण-घेवाण करा. #BF7Variant Coronavirus : कोरोना पुन्हा येतोय, लसीच्या चौथ्या डोसची आवश्यकता आहे का? ही लक्षणं दिसल्यास डॉक्टरांना भेटा कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी सर्दी, खोकला, ताप, घास खवखवणे, जुलाब यांसारखी लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करा. तसेच अशी लक्षणे असलेल्या लोकांनी घरात देखील इतर सदस्यांपासून अंतर राखा. जेणेकरून तुमच्या संसर्ग इतरांना होणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात