मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /जर घरात सुरु आहे लग्नाची तयारी, तर थांबा...नाही तर होऊ शकतं नुकसान, जाणून घ्या कारण

जर घरात सुरु आहे लग्नाची तयारी, तर थांबा...नाही तर होऊ शकतं नुकसान, जाणून घ्या कारण

कोरोना

कोरोना

सध्या लगीनसराई सुरु आहे. अनेकजण लग्नबंधनात अडकत आहेत. जर तुम्हीही लग्नगाठ बांधण्याच्या तयारीत असाल किंवा लग्नाची तयारी सुरु असेल तर तुम्हीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 डिसेंबर : सध्या लगीनसराई सुरु आहे. अनेकजण लग्नबंधनात अडकत आहेत. जर तुम्हीही लग्नगाठ बांधण्याच्या तयारीत असाल किंवा लग्नाची तयारी सुरु असेल तर तुम्हीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण चिंताजनक बातमी समोर आलीये. पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. चीन, जपान, ब्राझील, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये संसर्ग झपाट्याने पसरू लागला आहे. जगभरातील वाढत्या केसेस पाहता केंद्र सरकारनंही महत्त्वाची पावलं उचलायला सुरुवात केली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता भारत सरकारही आता सतर्क झालं आहे.

कोरोनानं पुन्हा तोंड वर काढलं असून पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. चीनमागोमाग पुन्हा एका एका देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. वाढत असलेल्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार सतर्क झाले आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र लिहून नवीन प्रकरणांचे जीनोम सिक्वेन्सिंग करण्याचे निर्देश दिले आहेत. एवढंच नाही तर लोकसभेचं कामकाज सुरू असताना सर्व खासदारांनी मास्कचा वापर करावा असं आवाहन लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आलं आहे.

हेही वाचा -  #BF7Variant Coronavirus : कोरोना पुन्हा येतोय, लसीच्या चौथ्या डोसची आवश्यकता आहे का?

कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता पुन्हा कोरोना नियमावली लागू होऊ शकते. त्यामुळे पुन्हा सण, कार्यक्रम, लग्नसराईवर काही बंधनं लागू शकतात. भारतात सध्या फारसा धोका नाहीये परंतु खबरदारी म्हणून पुन्हा प्रोटोकॉल लागू करण्याचा विचार केला जात आहे. यामध्ये कोणकोणते नियम लागू होऊ शकतात ते पाहुया.

- कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता, सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क घालणे अनिवार्य केले जाऊ शकते.

- कोरोनाची प्रकरणे कमी झाल्यानंतर लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणेही बंद केले होते. आता पुन्हा एकदा त्याची काटेकोर अंमलबजावणी होऊ शकते.

- बुस्टर डोस जलद केला जाईल

- अधिकाधिक लोकांची चाचणी केली जाईल आणि जर एखाद्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले, तर त्याच्या संपर्कात येणाऱ्या बहुतेक लोकांची चाचणी केली जाईल. यासोबतच कोरोना रुग्णांवर वेळेवर उपचार केले जातील.

-  देशातील अनेक प्रयोगशाळांमध्ये जीनोम सिक्वेन्सिंगची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. येथे कोरोना रुग्णांचे नमुने आणले जातात आणि संसर्गाचा नवीन प्रकार आला आहे का ते तपासले जाते.

First published:
top videos

    Tags: Corona, Corona patient, Corona spread, Corona virus in india, Coronavirus