मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

माश्यांनी उद्ध्वस्त केले कित्येक संसार! नवऱ्यांना सोडून पळाल्या बायका, अविवाहितांचं लग्न जमेना

माश्यांनी उद्ध्वस्त केले कित्येक संसार! नवऱ्यांना सोडून पळाल्या बायका, अविवाहितांचं लग्न जमेना

माश्यांमुळे संसार तुटण्याच्या मार्गावर. (प्रतीकात्मक फोटो - सौजन्य - Canva)

माश्यांमुळे संसार तुटण्याच्या मार्गावर. (प्रतीकात्मक फोटो - सौजन्य - Canva)

या गावांत माश्यांनी इतका त्रास दिला आहे की हे गाव आता चर्चेत आलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India
  • Published by:  Priya Lad

लखनऊ, 06 डिसेंबर : संसार उद्ध्वस्त होण्याची तशी बरीच कारणं असतात. पण कधी माश्यांमुळे संसार उद्ध्वस्त झाल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? असंच एक प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. माश्यांनी एक ना दोन कित्येक संसार उद्ध्वस्त केले आहेत. विवाहित दाम्पत्यांचा संसार मोडण्याच्या मार्गावर आहे आणि जे अविवाहित आहेत त्यांचं लग्नही जमत नाही आहे. उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातील हे विचित्र प्रकरण आहे.

हरदोई जिल्ह्यातील काही गावात माश्यांनी उच्छांद मांडला आहे. ग्रामस्थ माशांना वैतागले आहे. जवळपास 5 हजारपेक्षा जास्त माश्या आहेत.  इथल्या लोकांचं खाणंपिणं, रात्री झोपणंही मुश्किल झालं आहे. घरांच्या छतांवरही माश्याच माशा आहे. माश्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी अनेक ठिकाणी तक्रारी दिल्या. मागण्या केल्या, आंदोलनं केली. पण कुणीच दखल घेतली नाही. स्थानिक प्रशासन प्रदूषण विभागाची जबाबदारी असल्याचं सांगून आपले हात वर करत आहे.

आता माश्यांचा परिणाम असा झाला आहे की, कित्येक दाम्पत्याचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.  लग्न झालेल्या काही महिला माहेरी गेल्या त्या आता सासरी परतायला तयारच नाहीत.

हे वाचा - धक्कादायक! 'या' गावात एका मृत्यूनंतर 24 तासांत होतो दुसरा मृत्यू

सागवान पोल्ट्री फार्मच्या निर्मितीनंतर ही समस्या उद्भवत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. अहिरोरीचील कुईया गावात 2014 साली केंद्र सरकारच्या वित्त पोषित कुक्कुट योजनेअंतर्गत साहवान पोल्ट्री फार्मची स्थापना झाली. 2017 सालापासून इथं उत्पादन सुरू झालं. सध्या दर दिवशी दीड लाख कोंबड्यांच्या अंड्यांचं उत्पादन होतं. पोल्ट्री फार्मची क्षमता वाढली तशी ग्रामस्थांची समस्या वाढली.

पोल्ट्री फार्मपासून 300 मीटर दूर बढ़ईनपुरवा गावातील ग्रामस्थ माश्यांना वैतागले आहेत.  या गावातील ग्रामस्थ श्रवण कुमार वर्मा यांच्या नेतृत्वात ग्रामस्थ आंदोलन करत आहेत.  श्रवण कुमार वर्मा म्हणले, बढ़ईनपुरवा, डही, झाला पुरवा, नया गाव, देवरिया आणि एकघरा गावात माश्यांचा सर्वात जास्त त्रास आहे. गावातील काही पुरुषांच्या पत्नी वैतागून माहेरी गेल्यात त्या पुन्हा सासरी यायला तयार नाहीत. त्यांचं नातं तुटण्याच्या मार्गावर आहे.  गेल्या वर्षी गावात 7 लग्न झाली. त्यापैकी 4 तरुणी आणि 3 तरुण आहेत. यावर्षी एकही लग्न झालं नाही. ना कुणआाच्या लग्नाची बोलणी सुरू आहे. माश्यांच्या उद्रेकामुळे कुणीच आपली मुलगी या गावात द्यायला तयार नाही.

हे वाचा - 4 दिवसांपासून विहिरीत पडलेला व्यक्ती; पोलीसही शोधून थकले, शेवटी पत्नीने केलं असं काही की सगळेच शॉक

आज तकच्या वृत्तानुसार पोल्ट्री फार्मचे मालक दलवीर सिंह यांनी सांगितलं की त्यांनी फार्म सुरू केलं तेव्हा प्रदूषण विभागाची एनओसी घेतली होती. लोकवस्तीपासून दूर पोल्ट्री फार्म तयार केलं. पण त्यानंतर काही लोकांनी पोल्ट्री फार्मजवळ आपली घरं बांधली. माश्यांना कंट्रोल करण्याची सर्व व्यवस्था आहे. कित्येक वेळा तपासणीही झाली, त्यात काहीच कमतरता दिसून आली नाही. माश्यांमुळे संसार उद्ध्वस्त होत नाही आहेत. याची कारणं दुसरी असावीत.

First published:

Tags: Couple, Marriage, Uttar pradesh, Viral, Wedding