लखनऊ 05 डिसेंबर : सावित्रीची कहाणी तुम्ही अनेकदा ऐकली असेल. उत्तर प्रदेशा तील अलीगढमध्ये आता नव्या युगातील सावित्री समोर आली आहे. चार दिवसांपूर्वी या महिलेचा नवरा विहिरीत पडला होता, त्यात तो बेशुद्ध पडला होता. पोलिसातील सर्व लोक त्याचा शोध घेत होते, मात्र शेवटी त्याच्या पत्नीनेच त्याला विहिरीतून शोधून काढलं. सध्या महिलेच्या पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांची प्रकृती सुधारू लागली आहे. दारूच्या नशेत फिरत असताना तो विहिरीत पडल्याचं सांगण्यात येत आहे. गाडी अनियंत्रित होताच ड्रायव्हरने घेतली उडी; 1 KM चालकाशिवायच महामार्गावर धावत राहिला कंटेनर अन्.. मिळालेल्या माहितीनुसार, हातरस येथील हसायन गावात राहणारा योगेंद्र यादव हा ट्रक चालक आहे. चार दिवसांपूर्वी तो वाळूने भरलेला ट्रक घेऊन अलीगढच्या छपरा भागात आला होता. येथे त्याने ढाब्यावर बसून दारू प्यायली आणि जेवण करून चालायला सुरुवात केली. फिरत असताना अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीवर गेला. दारूच्या नशेत तो विहिरीत पडून बेशुद्ध झाला. दरम्यान, चार दिवसांपासून पोलिसांव्यतिरिक्त त्याच्या ओळखीचे लोक शक्य त्या ठिकाणी त्याचा शोध घेत होते, मात्र कोणतीही खबर मिळाली नाही. याच दरम्यान गावातून अलीगढ येथे पोहोचलेल्या पत्नीने विहिरीच्या आत आपल्या पतीचा शोध घेतला आणि पतीला शोधून काढलं. पोलिसांनी सांगितलं की ही घटना छर्रा परिसरातील आहे. योगेंद्र जेवण केल्यानंतर ढाब्यावरुन निघाला. मात्र, सकाळपर्यंतही घरी न आल्याने त्याच्या सहाय्यकाने ट्रक मालकाला याबाबत माहिती दिली. यानंतर ट्रक मालकाने आपल्या योगेंद्रला शोधण्याचे सर्व प्रयत्न केले आणि पोलिसांनाही याची माहिती दिली. साई बाबांच्या चरणी डोकं टेकवलं अन् उठलाच नाही; भक्ताचा हृदयद्रावक शेवट, Shocking Video खूप प्रयत्न करूनही योगेंद्र सापडला नाही. तेव्हा त्याच्या पत्नीला याबाबत माहिती देण्यात आली. शनिवारी छर्रा येथे जात पत्नीने आपल्या पतीचा अशा ठिकाणी शोध घेतला, ज्याचा कोणी विचारही केला नव्हता. काही वेळाने तिने विहिरीतून आपल्या पतीला बाहेर काढलं. महिला जेव्हा या विहिरीजवळ गेली तेव्हा तिला आतमध्ये कोणीतरी उलटं पडलेलं असल्याचं दिसलं. विहिरीत पाणी नव्हतं. महिलेनं या व्यक्तीच्या शरीरावरील स्वेटर ओळखला. महिलेनं सांगितलं की हा स्वेटर तिने स्वतः आपल्या हाताने शिवलेला होता. यानंतर तिने आरडाओरड करून आसपासच्या लोकांना बोलवलं आणि आपल्या पतीला बाहेर काढलं. नशेत हा व्यक्ती विहिरीत पडला होता. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.