मुंबई, 22 एप्रिल : आजकाल 30 ते 35 वयोगटातील लोकांमध्येसुद्धा हाडे दुखणे, सांधेदुखी, अर्थराइटिस, हाडे लगेच फ्रॅक्चर होणे अशा समस्या होत आहेत. वाढत्या वयानुसार हाडांची घनता कमी होऊ लागते, त्यामुळे हाडे दुखायला लागतात, कमकुवत होतात. वृद्धापकाळात ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता वाढते. दीर्घायुष्य हाडे निरोगी ठेवण्यासाठी (Measures to keep longevity bones healthy) काही गोष्टी लक्षात ठेवा.
हाडे का खराब होतात?
MayoClinic.org मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, हाडांच्या आरोग्यावर विविध घटकांचा परिणाम होतो. तुमच्या आहारात कॅल्शियम (Calcium) किती आहे, तुम्ही किती शारीरिक हालचाल करता, तुम्ही किती धूम्रपान करता आणि मद्यपान करता, शरीरातील हार्मोन्सची पातळी काय आहे. जर थायरॉईड संप्रेरक जास्त असेल तर महिलांमध्ये हाडांची झीज होण्याची शक्यता असते. अन्नाचे प्रमाण कमी होणे, खाण्याचे विकार आणि जास्त वजन कमी होणे यामुळे देखील हाडे कमकुवत होतात. विशिष्ट प्रकारच्या औषधांमुळंही हाडे हळूहळू कमकुवत होऊ (Tips For Strong Bones) लागतात.
हाडे निरोगी आणि मजबूत ठेवण्याचे उपाय -
आहारात कॅल्शियम घ्या -
कॅल्शियम आहारात घेतल्यानं हाडे मजबूत राहतात. 19 ते 50 वयोगटातील प्रौढ आणि 51 ते 70 वयोगटातील पुरुषांना दररोज 1,000 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते. 51 वर्षे वयोगटातील महिला आणि 71 वर्षे आणि त्यावरील पुरुषांसाठी 1,200 मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यक असते. कॅल्शियमचे मुख्य स्त्रोत म्हणजे दुग्धजन्य पदार्थ, बदाम, ब्रोकोली, सार्डिन, टोफू, सोयाबीन.
व्हिटॅमिन डीची कमतरता -
कॅल्शियम शोषण्यासाठी शरीराला व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. व्हिटॅमिन डी दररोज घेणे खूप महत्त्वाचे आहे. व्हिटॅमिन डीचे मुख्य स्त्रोत म्हणजे ऑईली फिश जसे की ट्युना, सॅल्मन, व्हाईट फिश, मशरूम, अंडी, फोर्टिफाइड पदार्थ, दूध, तृणधान्ये इ. याशिवाय व्हिटॅमिन डीचा सर्वात महत्त्वाचा स्त्रोत सूर्यप्रकाश आहे, त्यामुळे सकाळी किमान 10 ते 15 मिनिटे सूर्यप्रकाशात बसा.
शारीरिक हालचाली -
वजन कमी करणारे व्यायाम जसे की चालणे, जॉगिंग करणे आणि पायऱ्या चढणे हे तुम्हाला मजबूत हाडे तयार करण्यात आणि हाडांची झीज कमी करण्यास मदत करू शकतात.
हे वाचा - किरकोळ वाटणाऱ्या या 5 सवयी आरोग्य बिघडवतात; भविष्यात होतात गंभीर आजार
धूम्रपान आणि अल्कोहोल कमी करा -
हाडे निरोगी ठेवण्यासाठी धूम्रपान करू नका. दारू पिणे घातक आहे, महिलांनी दररोज एक ग्लासपेक्षा जास्त अल्कोहोल पिऊ नये. तर पुरुषांनी एका दिवसात दोन पेगपेक्षा जास्त दारू पिणं टाळावं.
भाज्या खाल्ल्याने हाडे मजबूत होतात -
तुम्हाला दीर्घायुष्यापर्यंत गुडघेदुखी होऊ नये, नीट चालता यावं, आरामात धावता येईल, असं वाटत असेल, तर आजपासूनच आहारात सर्व प्रकारच्या भाज्यांचा समावेश करा. भाजीपाला हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे हाडे तयार करणाऱ्या पेशींची निर्मिती वाढते. व्हिटॅमिन सीचा अँटिऑक्सिडंट प्रभाव हाडांच्या पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवतो. यासोबतच भाज्या हाडांची घनता वाढवतात.
हे वाचा - मजबूत, घनदाट केसांसाठी काळ्या तिळाचं तेल वापरा; चांगला परिणाम काही दिवसात दिसेल
मीठ कमी खा -
जास्त मीठ खाऊ नका. आजकाल लोक जंक फूड, चिप्स, पिझ्झा, बर्गर, चीज, प्रोसेस्ड फूड इत्यादी गोष्टी जास्त प्रमाणात खातात. त्यात मीठ जास्त असतं. काही लोक वरून जेवणात मीठही टाकतात, असं केल्यानं हाडांना इजा होऊ शकते. मीठ मर्यादित प्रमाणात खाल्लं गेलं तर रक्तदाब फारसा वाढणार नाही. तसेच, जास्त सोडा पेये आणि कॅफिनचे सेवन हाडांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यात फॉस्फरस असते, जे हाडांसाठी चांगले नाही.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Healthy bones